सोलापूरच्या औद्योगिक वसाहतजवळील चिंचोलीकाटी परिसरात बेकायदेशीर मुरूम उपसा सुरू!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2017 10:52 AM2017-11-25T10:52:16+5:302017-11-25T10:54:12+5:30

कोंडी-चिंचोली औद्योगिक वसाहतीतील रिकामी जाग्या, लगतच्या कोंडी-अकोलेकाटी-बीबीदारफळ-गुळवंची परिसरातील गायरान जमिनी तसेच याच गावातील खासगी जागेतील मुरुमाचा मोठ्या प्रमाणात उपसा करुन त्याची विक्री केली जात आहे. 

Illegal moor fodder in Chincholi Kati area near industrial colony of Solapur! | सोलापूरच्या औद्योगिक वसाहतजवळील चिंचोलीकाटी परिसरात बेकायदेशीर मुरूम उपसा सुरू!

सोलापूरच्या औद्योगिक वसाहतजवळील चिंचोलीकाटी परिसरात बेकायदेशीर मुरूम उपसा सुरू!

googlenewsNext
ठळक मुद्दे खासगी जागेतील मुरुमाचा मोठ्या प्रमाणात उपसा कोंडी-गुळवंची हद्दीतील शासकीय जमिनीतील मुरुमाचाही बेकायदेशीर उपसाकंपन्यासाठी मोठ्या दराने विक्री होणाºया या मुरुमाची रॉयल्टी मात्र भरली जात नाही


आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि २५ : कोंडी-चिंचोली औद्योगिक वसाहतीतील रिकामी जाग्या, लगतच्या कोंडी-अकोलेकाटी-बीबीदारफळ-गुळवंची परिसरातील गायरान जमिनी तसेच याच गावातील खासगी जागेतील मुरुमाचा मोठ्या प्रमाणात उपसा करुन त्याची विक्री केली जात आहे. 
चिंचोलीकाटी औद्योगिक वसाहतीमधील चिंचोलीकाटी, बीबीदारफळ व कोंडी गावाच्या बाजूला बरीचशी जागा रिकामी आहे. या जागेतीत मुरुमाचा उपसा मोठ्या प्रमाणावर केला जात आहे. याशिवाय कोंडी-गुळवंची हद्दीतील शासकीय जमिनीतील मुरुमाचाही बेकायदेशीर उपसा केला जातो. याशिवाय अकोलेकाटी, बीबीदारफळ, गुळवंची व कोंडी हद्दीतून खासगी शेतजमिनीतूनही मुरुमाचा मोठ्या प्रमाणावर उपसा केला जात आहे. हा मुरुम औद्योगिक वसाहतीमधील विविध कंपन्यांना विक्री केला जातो. कंपन्यासाठी मोठ्या दराने विक्री होणाºया या मुरुमाची रॉयल्टी मात्र भरली जात नाही.  कोणी तक्रार केली की त्याची दखलही घेतली जात नाही.
----------------------------
मंडल अधिकाºयाचा हद्दीचा वाद...
उत्तर सोलापूर तालुक्यातील गावोगावचे मंडल अधिकारी व तलाठी रंगभवनमध्ये बसूनच कारभार करीत आहेत. गावाची अन् तलाठ्याची कधी-कधी ओळख होते मात्र मंडल अधिकाºयांचे तर गावाला पाय लागणे कठीणच आहे. कारभार सगळा कोतवाल किंवा खासगी व्यक्तीवरच सुरू असतो. कोणी तक्रार केली तर कारवाई करण्यापेक्षा तक्रारदाराचे नाव सांगून त्याचीच अडचण करण्याला प्राधान्य दिले जात आहे. मुरुम उपसा करणारे पैशाच्या जिवावर कोणाला घाबरतही नाहीत. मागील आठवड्यापासून कोंडी-गुळवंची हद्दीतून उपसा होणाºया मुरुमाबाबत कारवाई करताना मंडल अधिकाºयांनी हद्दीचे कारण सांगून कारवाई केलीच नाही.
-----------------------
वाहने सोडून दिली़़़
मागील आठवड्यात चिंचोली हद्दीतून होणाºया मुरुम चोरीची तक्रार मोहोळ तहसीलदारांकडे गेल्यानंतर  मंडल अधिकारी व तलाठ्यांना कारवाई करण्यास सांगितले. मंडल अधिकारी व तलाठी ज्या ठिकाणी मुरुम उपसा सुरू होता त्या ठिकाणी आले मात्र वाहने सोडून तक्रारदाराचे नाव मुरुम चोरट्यांना सांगून निघून गेले.
------------------
मुरुम उचलण्यासाठी मागील काही महिन्यात मॉडर्न रोड मेकर्स यांनी हगलूर हद्दीतून पाच हजार व एन. राजशेखर रेड्डी यांनी अकोलेकाटी हद्दीतून ४०० ब्रास मुरुम उपसण्यासाठी आमचा नाहरकत दाखला घेतला आहे. अन्य कोणाचाही मागणी अर्ज आमच्याकडे आला नाही. अवैधरित्या मुरुम उचलणाºयावर कारवाई करु.
- विनोद रणवरे
तहसीलदार उत्तर सोलापूर  

Web Title: Illegal moor fodder in Chincholi Kati area near industrial colony of Solapur!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.