मुळेगांव तांडा येथील अवैध दारू भट्टी उध्वस्त, ११ लाख ५५ हजार ६०० रूपयांची रसायन नष्ट, सोलापूर तालुका पोलीसांची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क on Fri, February 09, 2018 7:16pm

सोलापूर तालुका पोलीस ठाणे हद्दीतील मुळेगांव तांडा (ता़ द़ सोलापूर) येथे अवैध दारू भट्टीवर अचानकपणे धाड टाकली़ या धाडीत ११ लाख ५५ हजार ६०० रूपयांची दारू तयार करण्यासाठी लागणारे रसायन नष्ट करण्यात आले़ 

आॅनलाइन लोकमत सोलापूर सोलापूर दि ९ : सोलापूर तालुका पोलीस ठाणे हद्दीतील मुळेगांव तांडा (ता़ द़ सोलापूर) येथे अवैध दारू भट्टीवर अचानकपणे धाड टाकली़ या धाडीत ११ लाख ५५ हजार ६०० रूपयांची दारू तयार करण्यासाठी लागणारे रसायन नष्ट करण्यात आले़  दरम्यान, मुळेगांव तांडा येथे शुक्रवार ९ फेबु्रवारी रोजी अचानक छापा मारला़ या छाप्यात १७८ बॅरेलमधील २०० लिटर प्रमाणे एकूण ३५ हजार ६०० लिटर दारू तयार करण्यासाठी लागणारे गुळमिश्रित रसायन व ६० बॅरेलमधील प्रत्येकी २०० लिटर प्रमाणे १२ हजार रूपये किंमतीचे गुळपाक मळी नष्ट केले़  याप्रकरणी गोपाळ पांडू पवार व भट्टी मालक जितू उर्फ सत्यजीत धनसिंग पवार (दोघे रा़ मुळेगांव तांडा, ता़ द़ सोलापूर), सुरेश जाधव व भट्टी मालक सरजीत मनोज चव्हाण यांच्याविरूध्द सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे़  ही कारवाई पोलीस अधिक्षक एस़ विरेश प्रभू़ अप्पर पोलीस अधिक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी अभय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर नावंदे, पोहेकॉ गायकवाड, चवरे, फुलारी, गुंडाळे, टिंगरे, गवळी, पोना व्होनमाने, कोरे, पवार, करे, मपोना कोकणे, फुलारी, मपोकॉ शेख, पोकॉ फडतरे, नरळे, चंदनशिवे, चापोना कासविद तसेच पोलीस मुख्यालयाकडील आरसीपी पथकचे पोलीस कर्मचारी यांनी पार पाडली़ 

संबंधित

सोलापूर तालुका पोलीस ठाण्याचे किशोर नावंदे यांची पुण्याला बदली
सोलापूर जिल्ह्यातील अवैध वाळू तपासणीसाठी आरटीओचे पथक
सोलापूरचे अतुल गोतसुर्वे उत्तर कोरियात राजदूत
तीन हजाराची लाच स्वीकारताना पंढरपूरच्या पोलीस हवालदारास पकडले
सोलापूरात पालकमंत्र्याच्या विरोधात बहुजन समाज पार्टीचे आंदोलन

सोलापूर कडून आणखी

राज्यातील तूर खरेदी मुदतवाढीस केंद्राची अनुकूलता, सहकारमंत्र्याची माहिती
सोलापूर जिल्ह्यातील अवैध वाळू तपासणीसाठी आरटीओचे पथक
अभिनेता आमीर खानला सोलापूर महापालिका मानपत्र देणार
लाच सोलापूर जिल्हा परिषदेतील सहाय्यक शिक्षण उपनिरीक्षक अटकेत
तीन हजाराची लाच स्वीकारताना पंढरपूरच्या पोलीस हवालदारास पकडले

आणखी वाचा