मोदी सरकारची सत्ता न आल्यास ऊस उत्पादक शेतकºयांना गळफास घ्यावा लागेल; सहकारमंत्र्यांनी व्यक्त केली भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2019 10:04 AM2019-04-01T10:04:59+5:302019-04-01T10:08:32+5:30

सोलापूर लोकसभा मतदारसंघातील भाजप-सेना महायुतीचे उमेदवार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांच्या प्रचाराचा शुभारंभ भंडारकवठे येथून करण्यात आला.

If the Modi government does not come to power then the sugarcane growers will have to go to jail; Fear of the co-minister expressed | मोदी सरकारची सत्ता न आल्यास ऊस उत्पादक शेतकºयांना गळफास घ्यावा लागेल; सहकारमंत्र्यांनी व्यक्त केली भीती

मोदी सरकारची सत्ता न आल्यास ऊस उत्पादक शेतकºयांना गळफास घ्यावा लागेल; सहकारमंत्र्यांनी व्यक्त केली भीती

Next
ठळक मुद्देकाँग्रेसवाले अलीकडे बाजार समितीच्या निवडणुकीत मला हिसका दाखविल्याचा वारंवार उल्लेख करतात - सहकारमंत्रीआमच्या पालकमंत्र्यांना फसविले, त्यांच्या स्वभावाचा गैरफायदा घेतला - सहकारमंत्रीशेतकºयांची फसवणूक करणाºया कोणाचीही गय केली जाणार नाही. फसवणूक केल्याचे सिद्ध झाल्यास व्यापाºयांचे परवाना रद्द करू - सहकारमंत्री

सोलापूर : साखरेला किमान आधारभूत किंमत जाहीर केल्यामुळे साखर कारखानदारीला काहीअंशी स्थिरता आली आहे. भविष्यात इथेनॉल निर्मितीवर भर दिला जाईल; मात्र केंद्रातील मोदी सरकार जर सत्तेतून पायउतार झाले तर ऊस उत्पादक शेतकºयांचे हाल होतील, त्यांना गळफास घ्यावा लागेल अशी भीती सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी व्यक्त केली.

सोलापूर लोकसभा मतदारसंघातील भाजप-सेना महायुतीचे उमेदवार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांच्या प्रचाराचा शुभारंभ रविवारी सकाळी भंडारकवठे येथून करण्यात आला. ख्वाजा कुतुबुद्दीन दर्गाह आणि पीर महासिद्ध   मंदिरात श्रीफळ वाढवून हा शुभारंभ करण्यात आला. त्यानंतर झालेल्या प्रचारसभेत सहकारमंत्री देशमुख बोलत होते. 

वर्षानुवर्षे शेतकºयांची फसवणूक करणारे,  त्यांची पिळवणूक करणारे आता सत्ता गेल्यानंतर शेतकºयांच्या नावावर गळा काढत आहेत. शेतकºयांच्या प्रश्नांचे भांडवल करून पुन्हा सत्तेत येऊ पाहत आहेत, असा आरोप काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर करताना सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी दोन्ही काँग्रेसला आता शेतकरी फसणार नाहीत, असा दावाही केला. 

ते म्हणाले, पेट्रोलमध्ये दहा टक्के इथेनॉल मिसळण्याचे धोरण तत्कालीन पेट्रोलियम मंत्री राम  नाईक यांनी स्वीकारले होते. काँग्रेसच्या काळामध्ये ते धोरण गुंडाळण्यात आले. त्यामुळेच ऊस उत्पादकांची अवस्था दयनीय झाली आहे. 

डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी मानव कल्याणासाठी आपली उमेदवारी असल्याचे सांगितले. भाजपचे जिल्हा सरचिटणीस हणमंत कुलकर्णी, मंद्रुपच्या सरपंच कलावती खंदारे, नागणसूर मठाचे श्रीकंठ शिवाचार्य महास्वामी यांनी मनोगत व्यक्त केले. व्यासपीठावर मैंदर्गी मठाचे शांतवीर महास्वामी, मनीष देशमुख , सभापती सोनाली कडते , उपसभापती संदीप टेळे, झेडपी सदस्या प्रभावती पाटील, रामप्पा चिवडशेट्टी, आप्पासाहेब पाटील -वडकबाळकर, सरपंच मीनाक्षी जंगलगी,  गौरीशंकर मेंडगुदले आदींची उपस्थिती होती .

हमीभावाचा कायदा गुंडाळला
- शेतीमालाला हभीभाव देण्याचा कायदा १९६३ साली अस्तित्वात आला.  बाजार समितीचे संचालक आणि व्यापारी यांचे लागेबांधे असल्याने शेतकºयांच्या पिळवणूक करण्यासाठी कायदा गुंडाळून ठेवला. हमीभावापेक्षा कमी भाव देणाºया किती व्यापाºयांचे परवाने रद्द केले असा सवाल सहकारमंत्री देशमुख यांनी केला. यापुढच्या काळात शेतकºयांची फसवणूक करणाºया कोणाचीही गय केली जाणार नाही. फसवणूक केल्याचे सिद्ध झाल्यास व्यापाºयांचे परवाना रद्द करू. त्याचे अधिकार आता सरकारकडे घेण्यात येणार आहेत.

काँग्रेसवाल्यांनी पालकमंत्र्यांना फसविले
- काँग्रेसवाले अलीकडे बाजार समितीच्या निवडणुकीत मला हिसका दाखविल्याचा वारंवार उल्लेख करतात.त्यांनी  आमच्या पालकमंत्र्यांना फसविले, त्यांच्या स्वभावाचा गैरफायदा घेतला म्हणून ते सारे घडले.अजूनही माझ्या हातात खूप आहे.त्यांनी समितीच्या आणि शेतकºयांच्या हिताचे प्रस्ताव द्यावेत केवळ अंतर्गत रस्त्याचे नकोत असा सल्लाही सहकारमंत्र्यांनी दिला. 

Web Title: If the Modi government does not come to power then the sugarcane growers will have to go to jail; Fear of the co-minister expressed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.