हिवरे बाजार मॉडेल प्रत्येक खेड्यात व्हावे, के. पी. विश्वनाथा यांचा आवाहन, कृषी संशोधन केंद्रातर्फे रंगभवन येथे राष्टÑीय चर्चासत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2018 03:27 PM2018-01-12T15:27:19+5:302018-01-12T15:29:58+5:30

भारत देश पूर्वीपेक्षा अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला आहे. महाराष्टÑात कांदा व द्राक्ष उत्पादनामुळे कोरडवाहू शेतकºयांना भरपूर फायदा झाल्याने सोलापूर जिल्ह्यात एकाही शेतकºयाने आत्महत्या केली नाही.

The Hivey Bazar model should be in every village. P. Vishwanatha's appeal, organized by the National Research Center for Agricultural Research at Rangbhavana | हिवरे बाजार मॉडेल प्रत्येक खेड्यात व्हावे, के. पी. विश्वनाथा यांचा आवाहन, कृषी संशोधन केंद्रातर्फे रंगभवन येथे राष्टÑीय चर्चासत्र

हिवरे बाजार मॉडेल प्रत्येक खेड्यात व्हावे, के. पी. विश्वनाथा यांचा आवाहन, कृषी संशोधन केंद्रातर्फे रंगभवन येथे राष्टÑीय चर्चासत्र

googlenewsNext
ठळक मुद्देकृषी विषयाबद्दल शास्त्रज्ञांनी लिहिलेल्या नियतकालिक, पुस्तके आणि घडीपत्रिकांचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन प्रगतिशील शेतकºयांचे संशोधनाचे प्रसारण व्हायला पाहिजे : कुलगुरु विश्वनाथायुवकांनी कृषी क्षेत्राकडे आकर्षित व्हावे : आमदार प्रणिती शिंदे


आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि १२ : भारत देश पूर्वीपेक्षा अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला आहे. महाराष्टÑात कांदा व द्राक्ष उत्पादनामुळे कोरडवाहू शेतकºयांना भरपूर फायदा झाल्याने सोलापूर जिल्ह्यात एकाही शेतकºयाने आत्महत्या केली नाही; मात्र शेतकºयांच्या मालास बाजारभाव मिळत नाही, ही खंत वाटते. आपण शेतकºयांमध्ये आत्मविश्वास निर्माण केला पाहिजे. महाराष्टÑात हिवरे बाजार मॉडेल प्रत्येक खेड्यात तयार झाले पाहिजे, अशी अपेक्षा महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरीचे कुलगुरु के. पी. विश्वनाथा यांनी केले. 
महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत विभागीय कृषी संशोधन केंद्र सोलापूर, दयानंद महाविद्यालय व कॉन्टेपररी रिसर्च इन इंडिया नियतकालिक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्टÑीय चर्चासत्राच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून आमदार प्रणिती शिंदे, व्यासपीठावर म. फुले कृषी विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. ए. एल. फरांदे, संशोधक संचालक डॉ. आर. एस. गडाख, इंडियन पोटॅश इन्स्टिट्यूटचे एस. के. बन्सल, आत्माचे संचालक विजयकुमार बरबडे, कृषी महाविद्यालय पुणेचे प्राचार्य डॉ. प्रमोद रसाळ, डॉ. गजानन खोत (कोल्हापूर), आनंद कोठाडिया, पोलीस उपायुक्त नामदेव चव्हाण, जिल्हा अधीक्षक बसवराज बिराजदार यांची उपस्थिती होती.
चर्चासत्राचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. विजय अमृतसागर यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाचा हेतू विशद केला. मान्यवरांचा सत्कार केला. यावेळी कृषी विषयाबद्दल शास्त्रज्ञांनी लिहिलेल्या नियतकालिक, पुस्तके आणि घडीपत्रिकांचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. 
कुलगुरु विश्वनाथा यांनी आपल्या भाषणातून कृषी पदवीधरांनी शेतीकडे वळावे, असे आवाहन करताना प्रगतिशील शेतकºयांचे संशोधनाचे प्रसारण व्हायला पाहिजे. युवकांनी कृषी क्षेत्राकडे वळावे यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
 पोलीस उपायुक्त नामदेव चव्हाण यांनी कृषी विद्यापीठाच्या कार्याचे कौतुक करताना ही कृषी पदवीधारकांची पंढरी असल्याचे गौरवोद्गार काढले. डॉ. फरांदे यांनी राष्टÑीय परिसंवाद घेऊन अमृतमहोत्सवाची चांगली सुरुवात केल्याबद्दल आनंद व्यक्त केला. सोलापूरच्या संशोधन केंद्राचे कोरडवाहू तंत्रज्ञान भारतभर प्रसिद्ध असून त्याचा लाभ शेतकºयांनी घ्यावा, असे आवाहन केले. एस. के. बन्सल यांनी दिल्लीच्या इंडियन पोटॅश इन्स्टिट्यूटचा महात्मा फुले कृषी विद्यापीठाशी गेल्या ३० वर्षांपासून संबंध असून, पालाश संशोधन करण्यास सहकार्य करीत असल्याचे स्पष्ट केले. 
प्रमुख पाहुणे आमदार प्रणिती शिंदे यांनी युवकांनी कृषी क्षेत्राकडे आकर्षित व्हावे, असे आवाहन केले. महापालिकेची पडीक एक एकर जमीन घेऊन युवकांनी त्यामध्ये कोथिंबीर, मेथी, मुळा, टोमॅटो आदी भाजीपाल्यांचे उत्पादन घेऊन रोजगार निर्मिती केली आहे. यातून त्यांना ९०० ते १००० रुपये मिळतात. अशा प्रकारे आदर्श मॉडेल सोलापूर शहरातील पडीक जमिनीत राबवणार असल्याचे स्पष्ट केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हवामानशास्त्रज्ञ डॉ. जे. डी. जाधव यांनी तर आभार अर्थशास्त्रज्ञ डॉ. व्ही. एन. शिंदे यांनी मानले. 
या चर्चासत्रास देशभरातून शास्त्रज्ञ, प्राध्यापक, पदव्युत्तर विद्यार्थी, विविध विभागाचे अधिकारी, समन्वयक, प्रगतिशील शेतकरी उपस्थित होते.
--------------------
पंचसूत्रीद्वारे ज्वारीचे ४० टक्के उत्पादन वाढते 
- डॉ. शरद गडाख यांनी आपल्या भाषणातून विद्यापीठाने २५७ विविध पिकांच्या जाती, ३४ नवीन अवजारे आणि १४३१ शिफारशी दिलेल्या असून, कृषी संशोधन केंद्र सोलापूर येथे विद्यापीठात सर्वात जास्त काम झाले आहे. त्यात १२ नवीन वाण, २०० विविध तंत्रज्ञान शिफारशी, दिलेल्या आहेत. म. फुले कृषी विद्यापीठाने होप प्रकल्प अंतर्गत दक्षिण सोलापूरमधील पाच गावांमध्ये ज्वारी प्रात्यक्षिकांमध्ये पंचसूत्राचा वापर करून ४० टक्के उत्पादन वाढ होते, असे दाखवून दिल्याचे सांगितले.
------------------
तंत्रज्ञानाद्वारे उत्पादन वाढवा
शेतकºयांनी आपले उत्पादन दामदुप्पट करण्यासाठी शेतीकडे व्यवसाय म्हणून पाहायला हवे. संकल्प ते सिद्धी या कार्यक्रमामध्ये सन २०१७ ते २०२२ पर्यंत शेतकºयांनी एकात्मिक शेती पद्धत, सेंद्रिय शेती, सूक्ष्म सिंचनातून फर्टिगेशन तंत्रज्ञान, बियाणे तंत्रज्ञान, शीतगृह व धान्यकोठार याचा वापर कन  उत्पादन वाढवू शकतो, असा सल्ला कुलगुरु के. पी. विश्वनाथा यांनी शेतकºयांना दिला.

Web Title: The Hivey Bazar model should be in every village. P. Vishwanatha's appeal, organized by the National Research Center for Agricultural Research at Rangbhavana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.