सहकारमंत्र्याच्या संपर्क कार्यालयावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2018 02:45 PM2018-09-20T14:45:20+5:302018-09-20T14:49:09+5:30

मोर्चाला परवानगी नसल्याने पोलीसांनी मोर्चेकरांना सात रस्ता परिसरात ताब्यात घेतले होते.

A front-runner of Swabhimani Shetkari Sanghatana on the Co-operative's contact office | सहकारमंत्र्याच्या संपर्क कार्यालयावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा मोर्चा

सहकारमंत्र्याच्या संपर्क कार्यालयावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा मोर्चा

googlenewsNext
ठळक मुद्देसहकारमंत्री यांच्या निवासस्थानी व संपर्क कार्यालयासमोर मोठा पोलीस बंदोबस्तपोलीसांनी मोर्चेकरांना सात रस्ता परिसरात ताब्यात घेतलेविकास नगर येथील संपर्क कार्यालयावर मोर्चा

सोलापूर : ऊसाची थकीत एफआरपी रक्कम व्याजासकट त्वरीत मिळावी यासह अन्य मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने शेतकºयांसह ऊस उत्पादकांसह राज्याचे सहकार, पणन मंत्री सुभाष देश्मुख यांच्या विकास नगर येथील संपर्क कार्यालयावर मोर्चा काढला.

दरम्यान, मोर्चाला परवानगी नसल्याने पोलीसांनी मोर्चेकरांना सात रस्ता परिसरात ताब्यात घेतले होते. मात्र त्यांच्या शिष्टमंडळातील प्रमुखांना संपर्क कार्यालयावर पोलीस गाडीत आणून सहकारमंत्री देशमुख यांचे स्वीय सहाय्यक अमोल काळे यांना निवेदन देऊन शिष्टमंडळांनी आपल्या तक्रारी मांडल्या.

यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महामुद पटेल, सिद्राम अब्दुलपूरकर, संघटक विजय रणदिवे, कार्याध्यक्ष शिवाजी पाटील, जिल्हाध्यक्ष समाधान फाटे, जिल्हा कार्याध्यक्ष वसंत गायकवाड, पप्पू पाटील, इकबाल मुजावर, नवनाथ माने, किसान सभेचे शिवानंद झळके, सचिव उमाशंकर पाटील आदी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते. शेतकरी संघटनेच्या आंदोलनामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शहर पोलीसांनी सहकारमंत्री यांच्या निवासस्थानी व संपर्क कार्यालयासमोर मोठा पोलीस बंदोबस्त ठेवला होता़

Web Title: A front-runner of Swabhimani Shetkari Sanghatana on the Co-operative's contact office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.