विषबाधा झाल्याने सोलापूरातील चार मुले रुग्णालयात दाखल 

By लोकमत न्यूज नेटवर्क on Thu, November 09, 2017 2:29pm

बदाम समजून एरंडीच्या बिया खाल्याने त्रास होऊ लागल्याने चार बालकांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना बुधवारी सायंकाळी भोगाव (ता. उत्तर सोलापूर) येथे घडली. मात्र ही घटना गुरुवारी सकाळी समोर आली.

आॅनलाइन लोकमत सोलापूर सोलापूर  दि ८ : बदाम समजून एरंडीच्या बिया खाल्याने त्रास होऊ लागल्याने चार बालकांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना बुधवारी सायंकाळी भोगाव (ता. उत्तर सोलापूर) येथे घडली. मात्र ही घटना गुरुवारी सकाळी समोर आली.  फरजान गुलाम मोहम्मद मदारी (वय ७), नर्गीस दिलशाद मदारी (वय ८), सोनी वरकत मदारी (वय ५), ज्योती गुलाम मोहम्मद मदारी (वय ६, सर्व रा. भोगाव) अशी उपचारासाठी दाखल झालेल्या बालकांची नावे आहेत. बुधवारी दुपारी भोगाव येथील शेती गट नं. १३२ मध्ये वरील चौघां बालकांनी बदाम समजून नजरचुकीने एरंडीच्या बिया खाल्या. त्यामुळे सायंकाळी या सर्वांना त्रास होऊ लागल्याने पालकांनी उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले. याबाबत सिव्हील पोलिस चौकीत नोंद करण्यात आली आहे.

संबंधित

शैक्षणिक खर्चाच्या चिंतेने विद्यार्थिनीची आत्महत्या
बेभरवशाच्या पावसाने खरीप क्षेत्र जैसे थे!
सहकारमंत्र्यांचा बंगला बेकायदेशीर! सोलापूर महापालिकेचा उच्च न्यायालयात अहवाल
रत्नागिरी : कष्टाला मार्केटिंगची जोड : सोलापूरचे कांदाव्यापारी रत्नागिरीत पोहोचले
सोलापूर जिल्हा बँक संचालक मंडळ बरखास्त, रिझर्व्ह बँकेच्या शिफारशीनंतर सरकारची कारवाई

सोलापूर कडून आणखी

लोकशाहीचे शुध्दीकरण सुरू झाले : पाशा पटेल
आता प्रत्येक शेतकरी विकास सोसायटी सभासद  : सहकारमंत्री
शेतकºयांचे शोषण करणाºयांना ठेचून काढणार : सहकारमंत्री
दोषी असल्यास कोणतीही शिक्षा द्या - सुभाष देशमुख
विकी गायकवाड खुन प्रकरण; अडीच महिन्यांपासून कुर्डूवाडीत सुरू होती धगधग

आणखी वाचा