मोहोळजवळ अवैध वाळु वाहतुक करणाºया आठ वाहनांसह साडेचार ब्रास वाळू जप्त,  नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल, मोहोळ पोलीसांची कारवाई !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2018 11:59 AM2018-01-12T11:59:41+5:302018-01-12T12:02:15+5:30

तालुक्यातील सीना नदीवरील बोपले बंधाºयातून बेकायदा वाळू उपसा व वाहतूक करण्यात येत असलेल्या तक्रारीवरून जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाने छापा मारून ८ वाहनांसह (किंमत ७४ लाख १८ हजार रुपयांची वाहने) साडेचार ब्रास वाळू ताब्यात घेऊन ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Four brilliant sand bars seized with 8 vehicles transporting illegal liquor near Mohol, 9 cases filed against Mohol police! | मोहोळजवळ अवैध वाळु वाहतुक करणाºया आठ वाहनांसह साडेचार ब्रास वाळू जप्त,  नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल, मोहोळ पोलीसांची कारवाई !

मोहोळजवळ अवैध वाळु वाहतुक करणाºया आठ वाहनांसह साडेचार ब्रास वाळू जप्त,  नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल, मोहोळ पोलीसांची कारवाई !

Next
ठळक मुद्देजिल्हा पोलीस अधीक्षक वीरेश प्रभू यांच्याकडे बेकायदा वाळू उपसा व वाहतूक संदर्भात तक्रारी आल्या होत्यापोलीस नाईक राजेंद्र बाबर यांनी मोहोळ पोलिसात फिर्याद दिली


आॅनलाइन लोकमत सोलापूर
मोहोळ दि १३  : तालुक्यातील सीना नदीवरील बोपले बंधाºयातून बेकायदा वाळू उपसा व वाहतूक करण्यात येत असलेल्या तक्रारीवरून जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाने छापा मारून ८ वाहनांसह (किंमत ७४ लाख १८ हजार रुपयांची वाहने) साडेचार ब्रास वाळू ताब्यात घेऊन ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
यासंदर्भात पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार जिल्हा पोलीस अधीक्षक वीरेश प्रभू यांच्याकडे बेकायदा वाळू उपसा व वाहतूक संदर्भात तक्रारी आल्या होत्या. त्या अनुषंगाने विशेष पथकाने सीना नदीपात्रातील बोपले बंधारा येथे छापा मारला असता ८ वाहनांसह साडेचार ब्रास वाळू तसेच मिनाज दाऊद सय्यद (वय २४, रा. खिरनीमळा, ता. उस्मानाबाद), वसीम हुसेन शेख (वय २२ रा. फकीरानगर, उस्मानाबाद), शंकर मल्हारी गायकवाड (वय ३५, रा. माळुंब्रा ता. तुळजापूर), महेश नामदेव पाचपुंड (वय २२, रा. अनगर, ता. मोहोळ), आण्णा हरिदास थिटे (वय २४, रा. नालबंदवाडी), सुधीर अरुण काकडे (वय ३१), मंगेश बाळासाहेब थिटे (वय ३० दोघे रा. अनगर, ता. मोहोळ), विठ्ठल बाळू माने (वय २७, रा. गलंदवाडी, ता. मोहोळ), सुनील सत्यवान नागटिळक (वय ३२, रा. कुंभेज, ता. माढा) यांना  ताब्यात घेऊन व वाहनांचे मालक सचिन लोखंडे, तौसिफ हुसेन शेख (दोघे रा. उस्मानाबाद), नाना अमृतराव (रा. शुक्रवार पेठ, ता. तुळजापूर)  यांच्याकडून एकूण ७४,१७,५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई विशेष पथकाचे पोलीस उपनिरीक्षक गणेश निंबाळकर, हवालदार मनोहर माने, श्रीकांत बुरजे, सोमनाथ बोराटे, अक्षय दळवी, पांडुरंग केंद्रे, विष्णू बडे, सिद्धाराम स्वामी यांनी केली. या प्रकरणी पोलीस नाईक राजेंद्र बाबर यांनी मोहोळ पोलिसात फिर्याद दिली असून अधिक तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजू राठोड करीत आहेत.
------------------------
 पाच ब्रास वाळूसह डंपर जप्त
अरबळीच्या भीमा नदीच्या पात्रातून अवैधपणे वाळू घेवून निघालेला पाच ब्रास वाळूसह डंपर कामती पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. ही कारवाई ९ जानेवारी सकाळी सहाच्या सुमारास करण्यात आली. डंपर क्र. एम. एच. १३/ ए. एक्स २७७० हा मंगळवेढा-सोलापूर मार्गावरुन निघाला होता. मुन्ना उर्फ खानसाहेब गुडू उर्फ हुसेनी शेख (बरूर, ता. द. सोलापूर) फरार झाला होता. त्याला आज अटक करण्यात आली. फिर्याद पो.हे.कॉ. सुरेश मणुरे यांनी दिली असून तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक एस.एस. गायकवाड हे करित आहेत.

Web Title: Four brilliant sand bars seized with 8 vehicles transporting illegal liquor near Mohol, 9 cases filed against Mohol police!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.