Former Minister Anandrao Devkate's death, incident in Solapur | माजी दुग्धविकास व पशुसंवर्धनमंत्री आनंदराव देवकते यांचे निधन
माजी दुग्धविकास व पशुसंवर्धनमंत्री आनंदराव देवकते यांचे निधन

सोलापूर : दक्षिण सोलापूरचे माजी आमदार तथा  राज्याचे माजी दुग्ध व मत्स्य विकास मंत्री आनंदराव देवकते यांचे राजूर (ता़ द़ सोलापूर) येथे आज सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास निधन झाले.

दक्षिण सोलापूरमधून देवकते यांनी १९८० सालचा अपवाद वगळता १९७८ सालापासून २५ वर्षे विधानसभेवर प्रतिनिधित्व केले होते. १९९२-९३ साली तत्कालीन मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्या विरोधात पक्षांतर्गत झालेल्या उठावात देवकते यांनी आक्रमक भूमिका बजावली होती. १९९९ ते २००३ या कालावधीत त्यांनी दुग्धविकास व पशुसंवर्धन खात्याचे कॅबिनेट मंत्रिपदही सांभाळले होते. त्याच काळात महानंदचे अध्यक्षपदही भूषविले होते.

२००३ साली सुशीलकुमार शिंदे हे मुख्यमंत्री झाले. तेव्हा देवकते यांनी शिंदे यांच्यासाठी आमदारकी सोडली होती. नंतर सोलापूर लोकसभा पोटनिवडणुकीत देवकते यांना काँग्रेसने संधी दिली असता त्यांचा पराभव झाला होता. प्रतापसिंह मोहिते-पाटील यांनी त्यांचा पराभव केला होता.


Web Title: Former Minister Anandrao Devkate's death, incident in Solapur
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.