सोलापूरात सिटीबस डेपोला आग, सात गाड्या जळून खाक, आग विझवण्यासाठी सात बंबांचा वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क on Tue, January 02, 2018 1:03pm

बुधवारपेठेतील सिटी डेपोला आग लागून सात गाड्या जळाल्याची घटना सोमवारी रात्री ११.१५ सुमारास घडली. घटनास्थळी अग्निशामक दलाचे पथक तातडीने धावल्याने तासाभरात सव्वा बाराच्या सुमारास आग आटोक्यात आली. 

आॅनलाइन लोकमत सोलापूर सोलापूर दि २ : बुधवारपेठेतील सिटी डेपोला आग लागून सात गाड्या जळाल्याची घटना सोमवारी रात्री ११.१५ सुमारास घडली. घटनास्थळी अग्निशामक दलाचे पथक तातडीने धावल्याने तासाभरात सव्वा बाराच्या सुमारास आग आटोक्यात आली.  सोमवारी ११ वाजून २७ मिनिटांनी अग्निशामक दलाचे अधीक्षक केदार आवटे यांना बुधवार पेठेतून सिटीबस डेपोला आग लागल्याची खबर मिळाली. लागलीच भवानी पेठेतून एक गाडी तातडीने घटनास्थळी पोहोचली. यावेळी चार गाड्यांच्या आतील सीट कव्हर आणि फायबर बॉडी जळत असल्याने आगीच्या ज्वाला खिडकीतून बाहेर पडत होत्या. तातडीने जवानांनी पाण्याचा फवारा मारला मात्र आग आटोक्यात येईनाशी झाली. दरम्यान एकापाठोपाठ अन्य सहा गाड्या धावल्या. चौफेर पाण्याचा फवारा करण्यात आला. काही गाड्यांच्या टायरने पेट घेतल्याने  आग आटोक्यात आणण्यासाठी फोब केमिकलचा वापर करण्यात आल्याचे अग्निशामकचे अधीक्षक केदार आवटे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. दरम्यान, पोलीस आयुक्त महादेव तांबडे, पोलीस उपायुक्त अपर्णा गीते, पोलीस निरीक्षक संजय पवार यांच्यासह पोलिसांची कुमकही घटनास्थळी दाखल झाली. मनपाचे सहा. आयुक्त तथा परिवहन व्यवस्थापक अभिजित हराळे, कार्यशाळा व्यवस्थापक एम. एस. पडगानूरसह अधिकाºयांनीही भेट दिली.  --------------- कारण समजले नाही - आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. पोलीस आयुक्तांनी तक्रार देण्याचे आदेश परिवहन विभागास दिले असून, नेमका नुकसानीचा आकडा समजू शकला नाही. 

संबंधित

रानमसले येथील २२ वर्षांच्या युवा शेतकºयाने ‘शतावरी’च्या उत्पादनातून साधले आर्थिक स्थैर्य
...आणि माझं निसर्गाशी नातं जुळलं !
मी कात टाकली...बदलत्या वस्तींची कहाणी; कारगिल युद्धातील शिलेदार, फौजदार अन् यशस्वी गुणवान क्रीडापटूंची कल्याण नगर वसाहत
गोड बोला..ग़ुड बोला; गोड बोलण्यासाठी अंत:करणात प्रेम, आपुलकी असावी लागते : विजयकुमार देशमुख
सोरेगाव येथे वाळू माफियांनी केली दगडफेक; दोन पोलीस जखमी, आरोपी पळाले !

सोलापूर कडून आणखी

आणखी वाचा