सोलापूरात सिटीबस डेपोला आग, सात गाड्या जळून खाक, आग विझवण्यासाठी सात बंबांचा वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2018 01:03 PM2018-01-02T13:03:26+5:302018-01-02T13:05:17+5:30

बुधवारपेठेतील सिटी डेपोला आग लागून सात गाड्या जळाल्याची घटना सोमवारी रात्री ११.१५ सुमारास घडली. घटनास्थळी अग्निशामक दलाचे पथक तातडीने धावल्याने तासाभरात सव्वा बाराच्या सुमारास आग आटोक्यात आली. 

Fire at Sultanpur Citibus Depot, seven burnt fire and seven bombs used for fire extinguishing | सोलापूरात सिटीबस डेपोला आग, सात गाड्या जळून खाक, आग विझवण्यासाठी सात बंबांचा वापर

सोलापूरात सिटीबस डेपोला आग, सात गाड्या जळून खाक, आग विझवण्यासाठी सात बंबांचा वापर

Next
ठळक मुद्देअग्निशामक दलाचे पथक तातडीने धावल्याने तासाभरात आग आटोक्यातआगीचे नेमके कारण समजू शकले नाही. पोलीस आयुक्तांनी तक्रार देण्याचे आदेश परिवहन विभागास दिले नेमका नुकसानीचा आकडा समजू शकला नाही. 


आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि २ : बुधवारपेठेतील सिटी डेपोला आग लागून सात गाड्या जळाल्याची घटना सोमवारी रात्री ११.१५ सुमारास घडली. घटनास्थळी अग्निशामक दलाचे पथक तातडीने धावल्याने तासाभरात सव्वा बाराच्या सुमारास आग आटोक्यात आली. 
सोमवारी ११ वाजून २७ मिनिटांनी अग्निशामक दलाचे अधीक्षक केदार आवटे यांना बुधवार पेठेतून सिटीबस डेपोला आग लागल्याची खबर मिळाली. लागलीच भवानी पेठेतून एक गाडी तातडीने घटनास्थळी पोहोचली. यावेळी चार गाड्यांच्या आतील सीट कव्हर आणि फायबर बॉडी जळत असल्याने आगीच्या ज्वाला खिडकीतून बाहेर पडत होत्या. तातडीने जवानांनी पाण्याचा फवारा मारला मात्र आग आटोक्यात येईनाशी झाली. दरम्यान एकापाठोपाठ अन्य सहा गाड्या धावल्या. चौफेर पाण्याचा फवारा करण्यात आला. काही गाड्यांच्या टायरने पेट घेतल्याने  आग आटोक्यात आणण्यासाठी फोब केमिकलचा वापर करण्यात आल्याचे अग्निशामकचे अधीक्षक केदार आवटे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.
दरम्यान, पोलीस आयुक्त महादेव तांबडे, पोलीस उपायुक्त अपर्णा गीते, पोलीस निरीक्षक संजय पवार यांच्यासह पोलिसांची कुमकही घटनास्थळी दाखल झाली. मनपाचे सहा. आयुक्त तथा परिवहन व्यवस्थापक अभिजित हराळे, कार्यशाळा व्यवस्थापक एम. एस. पडगानूरसह अधिकाºयांनीही भेट दिली. 
---------------
कारण समजले नाही
- आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. पोलीस आयुक्तांनी तक्रार देण्याचे आदेश परिवहन विभागास दिले असून, नेमका नुकसानीचा आकडा समजू शकला नाही. 

Web Title: Fire at Sultanpur Citibus Depot, seven burnt fire and seven bombs used for fire extinguishing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.