जिद्द, चिकाटी अन् मनगटातील ताकदीच्या जोरावर जिल्ह्यातील शेतकºयांनी केली दुष्काळावर मात; राजेंद्र भारूड याचे मत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2019 11:48 AM2019-02-14T11:48:55+5:302019-02-14T11:50:57+5:30

पंढरपुरात ‘लोकमत अ‍ॅग्रोत्सव’ कृषी प्रदर्शनाचे दिमाखात उद्घाटन

The farmers of the district overcome the drought due to the power of perseverance and wrists; Rajendra Bharud's opinion | जिद्द, चिकाटी अन् मनगटातील ताकदीच्या जोरावर जिल्ह्यातील शेतकºयांनी केली दुष्काळावर मात; राजेंद्र भारूड याचे मत

जिद्द, चिकाटी अन् मनगटातील ताकदीच्या जोरावर जिल्ह्यातील शेतकºयांनी केली दुष्काळावर मात; राजेंद्र भारूड याचे मत

Next
ठळक मुद्दे‘लोकमत’ने पंढरपूरसारख्या साखरपट्ट्यात अ‍ॅग्रोत्सवाचे आयोजन करून परंपरागत शेती करणाºया शेतकºयांना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्याचे खुले व्यासपीठ निर्माण करून दिले या प्रदर्शनामध्ये बी-बियाणांपासून विविध प्रकारची खते, कृषी अवजारे यांचा वापर कसा करावयाचा, त्यामुळे उत्पादन खर्चात होणारी कपात व उत्पादनात होणारी वाढ आदींची माहिती शेतकºयांना उपलब्ध होणार

पंढरपूर : सोलापूर तसा अवर्षण प्रवण क्षेत्रात येणारा जिल्हा, मात्र येथील शेतकºयांनी जिद्द, चिकाटी अन् मनगटातील ताकदीच्या जोरावर खडकाळ, मुरमाड जमिनीवर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला़ परंपरागत ऊस पिकासह डाळिंब, द्राक्षसारख्या पिकांमधून लाखो रुपयांचे उत्पादन घेत दुष्काळावर मात करण्याचा प्रयत्न केला, असे प्रतिपादन झेडपीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ़ राजेंद्र भारुड यांनी व्यक्त केले.

‘लोकमत’च्या वतीने पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विस्तीर्ण मैदानावर १३ ते १६ दरम्यान आयोजित सोलापुरी डाळिंब, ऊस, द्राक्षाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणाºया ‘लोकमत अ‍ॅग्रोत्सवा’च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते़ अध्यक्षस्थानी माजी आ़ सुधाकरपंत परिचारक होते़ 

व्यासपीठावर अ़ भा़ डाळिंब उत्पादक संघाचे अध्यक्ष प्रभाकर चांदणे, कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ़ लालासाहेब तांबडे, विभागीय कृषी अधिकारी राजेंद्र कांबळे, पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप घाडगे, झेडपी सदस्य वसंतराव देशमुख, जैन इरिगेशन कंपनीचे आनंद भोगल उपस्थित होते़ 

डॉ़ राजेंद्र भारुड म्हणाले, जिल्ह्यात ३९ साखर कारखाने, काही सूतगिरण्या कार्यरत आहेत़ या सर्व उद्योगाला कच्चा माल पुरविण्याची जबाबदारी शेतकºयांवरच आहे़ दुष्काळाशी दोन हात करताना केंद्र व राज्य सरकारकडून कोणत्याही मदतीची अपेक्षा न करता कष्टाच्या जोरावर प्रतिकूल परिस्थितीतही शेतकरी सावरताना मी पाहिले आहे़ ‘लोकमत’ने पंढरपूरसारख्या साखरपट्ट्यात अ‍ॅग्रोत्सवाचे आयोजन करून परंपरागत शेती करणाºया शेतकºयांना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्याचे खुले व्यासपीठ निर्माण करून दिले आहे.

या प्रदर्शनामध्ये बी-बियाणांपासून विविध प्रकारची खते, कृषी अवजारे यांचा वापर कसा करावयाचा, त्यामुळे उत्पादन खर्चात होणारी कपात व उत्पादनात होणारी वाढ आदींची माहिती शेतकºयांना उपलब्ध होणार आहे़ ही स्वागतार्ह बाब असल्याचे डॉ़ भारुड म्हणाले़ 
लोकमतने सामाजिक कार्यात राज्य सरकार व प्रशासनाला नेहमीच मार्गदर्शकाची भूमिका बजावली आहे़ लोकमतच्या पुढाकारामुळेच अनेक विकास योजना मार्गी लागल्या आहेत.

दुष्काळाशी लढा यासारख्या आव्हानात्मक विषयात लोकमतच्या मार्गदर्शनामुळे फायदा झाला आहे़ यापुढेही शेतकºयांच्या फायद्याच्या गोष्टीसाठी लोकमतने पुढाकार घेतल्यास प्रशासन कायम त्यांच्यासोबत असेल़ ‘पाणी अडवा पाणी जिरवा’ याचे महत्त्व शेतकºयांनी जाणून घेतले आहे़ भविष्यातही पाण्याचा काटकसरीने वापर केल्यास शेतीसह उद्योग, पिण्याचे पाणी यांचा समन्वय साधत उत्पादन वाढ करणे शक्य आहे़ पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आयोजित केलेल्या या अ‍ॅग्रोत्सवाचा फायदा बागायत जिरायतमधील सर्व शेतकºयांना होणार आहे़ या प्रदर्शनाला आवर्जून शेतकºयांनी भेट द्यावी यासाठी आपण ग्रामसेवक, तलाठी, सर्कल, कृषी सेवकांना आवाहन करीत आहे.

डॉ. लालासोा तांबडे यांनी वारकºयांची पंढरी ही आता शेतकºयांची पंढरी होत आहे. पंढरपूर परिसरातील शेतकरी हे नावीन्यपूर्ण शेतीसाठी प्रसिद्ध आहेत. त्यांच्या जोडीला आता ‘लोकमत’ने अ‍ॅग्रोत्सवाद्वारे आधुनिक तंत्रज्ञान आणून ठेवले़ याचा फायदा घेतल्यास डाळिंब, ऊस, द्राक्ष आदी पिकांच्या उत्पादनात ते दुपटीने वाढ करू शकतील, याचा विश्वास आहे. शेतकºयांनी कमी पाण्याचा वापर करताना ऊस पाचटाचे व्यवस्थापन करावे. त्यामुळे एकरी ६ टन खतांचे उत्पादन होईल. ठिबक व पोटॅशचा वापर करावा. त्यामुळे ताण सहन करण्याची क्षमता वाढेल. या परिसरात आता शेतकरी शेवग्यासारख्या पिकाचे उच्चांकी उत्पादन घेत आहेत, असे सांगितले़
प्रभाकर चांदणे म्हणाले, डाळिंब संघ यापूर्वी डाळिंब उत्पादक शेतकºयांना मार्गदर्शकाची भूमिका बजावायचा. मात्र आता ही भूमिका लोकमतने बजावली आहे.

देशामध्ये सध्या सव्वा दोन लाख हेक्टर डाळिंबाचे उत्पादन घेतले जाते. यामध्ये सव्वा लाख हेक्टर डाळिंबाचे उत्पादन फक्त आपल्या परिसरात होते़ यामध्ये एक हजार कोटीपेक्षा जास्त उलाढाल सांगोल्यात होते. यापूर्वी १९७२ च्या दुष्काळात ७५ हजार पेक्षा जास्त शेतकरी दुष्काळी कामावर जात होते. ते शेतकरी आज डाळिंब उत्पादक शेतकरी बनले आहेत. त्याच्या जोरावरच डाळिंबाची क्रांती सांगोल्यात झाली आहे. सध्या डाळिंबाचे उत्पादन दुप्पट झाल्याने दर गडगडले आहेत. मात्र ही परिस्थिती भविष्यात राहणार नसून डाळिंब उत्पादक शेतकºयांना अच्छे दिन येणार असल्याचे सांगितले. डाळिंब क्रांतीला लोकमतने दिलेल्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या जोडीमुळे फायदा होणार असल्याचेही ते म्हणाले.

यावेळी रवींद्र कांबळे यांनीही शेतकºयांना आधुनिक तंत्रज्ञानाचा उत्पादन वाढीसाठी वापर करावा, याबाबतची माहिती दिली़ प्रास्ताविक निवासी संपादक सचिन जवळकोटे यांनी केले. सूत्रसंचालन सुधाकर कवडे यांनी केले तर सहायक सरव्यवस्थापक रमेश तावडे यांनी आभार मानले. 

आता मागेल त्याला सोलर कृषीपंप़...
राज्य सरकारने यापूर्वी पाणी टंचाईवर मात करण्यासाठी शेतकरी तळ्याची योजना राबविली़ मागेल त्याला शेततळे या योजनेद्वारे शेततळ्यासाठी शेतकºयांना भरीव अनुदान देण्यात येत होते़ त्यामुळे अनेकांनी त्याचा लाभ घेत शेततळ्यांची निर्मिती केली़ उन्हाळ्यात त्याचा फायदा शेतकºयांना झाला़ आता त्याच धर्तीवर शेतकºयांना मागेल त्याला सोलर कृषीपंप योजना सुरू केली आहे. या योजनेद्वारे सर्वसामान्य शेतकºयांना ७० टक्क्यांपर्यंत तर मागासवर्गीय शेतकºयांना ९० टक्क्यांपर्यंत सबसिडी देण्यात येत आहे. या योजनेचाही शेतकºयांनी लाभ घेतल्यास विजेच्या मागणीत मोठी बचत होणार असल्याचे डॉ. राजेंद्र भारूड म्हणाले.

विविध उपक्रमांद्वारे ‘लोकमत’ने जोपासली सामाजिक बांधिलकी
- ‘लोकमत’ने राज्य सरकार, प्रशासनाला दिशादर्शक भूमिका बजावताना सरपंच अवॉर्ड, जळगाव येथे केळी महोत्सव, नागपूरला संत्रा महोत्सव, औरंगाबादला कृषी महोत्सव, सोलापूरमध्ये दुष्काळाशी लढा, कृषी आयडॉल यासारखे विविध उपक्रम राबवून शेतकरी, शिक्षण, क्रीडा, राजकारण विभागातील प्रत्येकाला समाजात मानाचे स्थान देण्याची भूमिका जोपासली आहे. हे काम त्यांचे उल्लेखनीय असून ‘लोकमत’च्या पाठबळामुळे अनेक जणांनी आज त्यांच्या त्यांच्या क्षेत्रामध्ये मोठी क्रांती केली असल्याचे डॉ. राजेंद्र भारूड यांनी सांगितले.

Web Title: The farmers of the district overcome the drought due to the power of perseverance and wrists; Rajendra Bharud's opinion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.