पाण्यासाठी अधिकाºयांना कोंडले, उजनी धरण परिसरातील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2018 11:01 AM2018-10-06T11:01:45+5:302018-10-06T11:03:04+5:30

Events in Kondale, Ujni dam area near the water authorities | पाण्यासाठी अधिकाºयांना कोंडले, उजनी धरण परिसरातील घटना

पाण्यासाठी अधिकाºयांना कोंडले, उजनी धरण परिसरातील घटना

Next
ठळक मुद्दे- पोलीसांच्या मध्यस्थीनंतर आंदोलन मागे- अधिकाºयांनी दिले दोन दिवसात पाणी सोडण्याचे आश्वासन- अधिकाºयांनी पाणी सोडण्याचे आश्वासन पाळले नाही

भीमानगर: पाणी सोडण्याच्या मागणीसाठी भीमानगर कार्यकारी अभियंता कार्यालयातील अधिकाºयांना जनहित शेतकरी संघटनेचे संस्थापक प्रभाकर देशमुख यांच्यासह शेतकºयांनी कुलूप घालून कार्यालयातच कोंडले. पाणी सोडण्याचे आश्वासन अधिकाºयांनी न पाळल्याने त्यांच्यावर ही नामुष्की ओढवली. दरम्यान, पोलिसांनी मध्यस्थी करून चर्चा घडवून आणली. दोन दिवसात पाणी सोडण्याचे आश्वासन दिल्याने हे आंदोलन मागे घेण्यात आले.

कवे, रोपळे, उपळाई बुद्रुक, उपळाई खुर्द, विठ्ठलवाडी या गावांना पाणी सोडण्याबाबत अभियंता जगताप यांनी लेखी आश्वासन दिले होते, पण पाणी न सोडल्याने कोंडण्याचा पवित्रा घेण्यात आला. यात उपकार्यकारी अधिकारी एस. के. गोरे व कर्मचारी अडकले होते.
यावेळी रमेश शिंदे, विजय मोरे, दीपक बोसकर, विलास भांगे, सरपंच सुशील पाटील, किशोर पाटील, अभिजित डोईफोडे, वरुण पाटील, नानासाहेब शिंदे, दादा डोईफोडे, दादा गायकवाड, रामा पाटील, भैय्या डोईफोडे, आनंता शिंदे, सतीश पवार, विठ्ठल पाटील, समाधान पाटील, रणजित पाटील, हनुमंत लोंढे, अतुल माळी, समाधान सलगर, पडसाळीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

आंदोलन तीन तास चालले. 
यावेळी टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आनंद खोबरे मोठा पोलीस बंदोबस्त घेऊन त्या ठिकाणी दाखल झाले. खोबरे यांनी विभागीय अभियंता आलाट यांच्याशी  चर्चा करून दोन दिवसात पाणी सोडतो, असे लेखी आश्वासन दिले. त्यानंतर अधिकाºयांना मुक्त करण्यात आले.


 

Web Title: Events in Kondale, Ujni dam area near the water authorities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.