नोकरीचे अमिष तरूणांना भोवले, राज्यातील चौघे मलेशियाच्या तुरूंगात, सोलापूरच्या एकाचा समावेश 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2017 01:02 PM2017-12-08T13:02:03+5:302017-12-08T13:05:11+5:30

सांगली येथील पोलीसपुत्र एजंटाने नोकरीचे आमिष दाखवून केलेल्या फसवेगिरीमुळे अक्कलकोट तालुक्यातील युवक गुरुनाथ ईरण्णा कुंभार (वय २०, रा.शिरवळ) यासह महाराष्ट्रातील चार तरुण क्लालालंपूर, मलेशियातील तुरुंगात अटकेत आहेत. यामुळे नातेवाईकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

Employed by young men in the job, four in the state include one in Malaysia's jail, Solapur | नोकरीचे अमिष तरूणांना भोवले, राज्यातील चौघे मलेशियाच्या तुरूंगात, सोलापूरच्या एकाचा समावेश 

नोकरीचे अमिष तरूणांना भोवले, राज्यातील चौघे मलेशियाच्या तुरूंगात, सोलापूरच्या एकाचा समावेश 

googlenewsNext
ठळक मुद्देइमिग्रेशन आॅफिसर्सने छापा टाकून त्याला अटक केलीगेल्या पंचवीस दिवसांपासून गुरुनाथसह चौघेजण मलेशियाच्या तुरुंगात अटकेत गुरुनाथच्या सुटकेसाठी शासनाकडून वेळोवेळी माहिती प्राप्त होत आहे


आॅनलाइन लोकमत सोलापूर
अक्कलकोट दि ७ : सांगली येथील पोलीसपुत्र एजंटाने नोकरीचे आमिष दाखवून केलेल्या फसवेगिरीमुळे अक्कलकोट तालुक्यातील युवक गुरुनाथ ईरण्णा कुंभार (वय २०, रा.शिरवळ) यासह महाराष्ट्रातील चार तरुण क्लालालंपूर, मलेशियातील तुरुंगात अटकेत आहेत. यामुळे नातेवाईकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. ही घटना दि. १३ नोव्हेंबर २०१७ रोजी मध्यरात्री घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, मलेशियात अटकेत असलेला गुरुनाथ कुंभार हा बारावी शिक्षणानंतर कराड येथे हॉटेल मॅनेजमेंट प्रशिक्षण घेण्यासाठी राहत होता. त्याठिकाणी पूर्वी कामावर असलेल्या सांगली येथील पोलीसपुत्र एजंट कौस्तुभ सदानंद पवार याच्याशी त्याची ओळख झाली होती. तो कुंभारसह अनेकांकडून प्रत्येकी दीड ते दोन लाख रुपये घेऊन मलेशियात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून एक महिना मुदतीचा पर्यटक व्हिसा काढून दिला होता. त्या माध्यमातून हा एजंट कुंभारसह अन्य चार जणांना घेऊन मलेशियात गेला होता. दरम्यान, १० नोव्हेंबर २०१७ रोजी व्हिसा संपला. यामुळे मध्यरात्री रुमवर झोपलेले असताना इमिग्रेशन आॅफिसर्सने छापा टाकून त्याला अटक केली होती. त्या दरम्यान बाहेर असलेल्या चौघांनी ही माहिती फोनव्दारे गावाकडे त्याच्या नातेवाईकांना दिली होती. यामुळे नातेवाईकांमध्ये एकच खळबळ उडाली. 
अटकेत असलेल्या चौघांची पोलीस कोठडी १२ डिसेंबर २०१७ रोजी संपणार आहे. त्या दिवशी त्यांना तेथील न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. गेल्या पंचवीस दिवसांपासून गुरुनाथसह चौघेजण मलेशियाच्या तुरुंगात अटकेत आहेत. 
सदर घटनेची माहिती अक्कलकोट नगरपालिकेतील भाजपाच्या नगरसेविका, गुरुनाथची बहीण भागुबाई नागराज कुंभार यांनी तालुकाध्यक्ष सचिन कल्याणशेट्टी यांना भेटून सांगितली असता कल्याणशेट्टी यांनी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज व भारतीय उच्चायुक्त कुसुम यादव, (मलेशिया) यांना टिष्ट्वट  केले होते. त्याला तत्काळ   प्रतिसाद देत संबंधितांची सर्व कागदोपत्रांची  ई-मेलव्दारे मागणी केली. त्यानुसार त्यांची सर्व कागदपत्रे पाठविण्यात आली. यामुळे कल्याणशेट्टी यांना भारत सरकारकडून वेळोवेळी ई-मेलद्वारे माहिती प्राप्त होत आहे.
---------------------
प्रत्येकाकडून घेतले दीड ते दोन लाख रुपये
एजंट कौस्तुभ सदानंद पवार यांनी अधिकृत व्हिसा न देता तात्पुरता व्हिसा दिला होता. त्याची मुदत संपल्याने दि. १३ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री इमिग्रेशन आॅफिसर्सनी गुरुनाथ रुममध्ये झोपलेला असताना छापा टाकून गुरुनाथसह चौघांना अटक केली आहे. त्या चौघांना लेबर व्हिसाविषयी काहीच कल्पना नव्हती. सर्वांचे तात्पुरते पासपोर्ट एजंटने त्यांच्याकडून काढून घेतले आहेत. त्यांना अटक झाल्यापासून एजंट त्यांच्याकडे फिरकलासुद्धा नाही.  त्याने प्रत्येकाकडून दीड ते दोन लाख रुपये घेतले असल्याचे सांगण्यात आले. 
-------------------
तालुक्यातील शिरवळ गावचे गुरुनाथ कुंभार यास पोलीसपुत्र कौस्तुभ सदानंद पवार (एजंट) यांनी नोकरीचे आमिष दाखवून फसविल्याप्रकरणी संबंधिताच्या विरोधात नामदेव कुंभार यांनी दिलेल्या तक्रारीवरुन सांगली पोलीस ठाण्यात ४२० कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पो. नि. रवींद्र शेळके यांनी दिली आहे.
- नामदेव कुंभार, (गुरुनाथचे भावजी, इस्लामपूर)
--------------------------
गुरुनाथच्या सुटकेसाठी शासनाकडून वेळोवेळी माहिती प्राप्त होत आहे. याबाबत परराष्ट्र मंत्रालय संवेदनशील असून दि. १२ डिसेंबर रोजी यावर निर्णय होण्याची शक्यता आहे. आपण स्वत: याप्रकरणी परराष्टÑ मंत्री सुषमा स्वराज यांच्याशी संपर्क ठेवून आहोत. तरी नातेवाईकांनी घाबरुन न जाता संयम पाळावा.
- सचिन कल्याणशेट्टी तालुकाध्यक्ष, भाजपा
-------------------------

Web Title: Employed by young men in the job, four in the state include one in Malaysia's jail, Solapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.