अपहार, सतत गैरहजेरीमुळे सोलापूर जिल्हा बँकेचे आठ कर्मचारी बडतर्फ, दोघांचे निलंबन केले निलंबन !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2017 12:24 PM2017-12-27T12:24:24+5:302017-12-27T12:27:27+5:30

अपहार व गैरहजेरीच्या कारणामुळे सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या (डी.सी. सी) ८ कर्मचाºयांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले असून, दोघांवर निलंबनाची कारवाई केली आहे.

Emergency and continuous absence of eight employees of Solapur District Bank, both suspended and suspension! | अपहार, सतत गैरहजेरीमुळे सोलापूर जिल्हा बँकेचे आठ कर्मचारी बडतर्फ, दोघांचे निलंबन केले निलंबन !

अपहार, सतत गैरहजेरीमुळे सोलापूर जिल्हा बँकेचे आठ कर्मचारी बडतर्फ, दोघांचे निलंबन केले निलंबन !

Next
ठळक मुद्देकाहींवर अन्य स्वरुपाच्या कारवाया करण्यात आल्याजिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कामकाजात प्रशासकीय शिस्त आणण्याचा प्रयत्न मालमत्तेवर बोजा चढविण्याची कारवाई जिल्हा बँक करणार कामात कुचराई करणाºया व अपहार करणाºया कोणाचीही गय केली जाणार - राजन पाटील


आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि २७ : अपहार व गैरहजेरीच्या कारणामुळे सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या (डी.सी. सी) ८ कर्मचाºयांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले असून, दोघांवर निलंबनाची कारवाई केली आहे. काहींवर अन्य स्वरुपाच्या कारवाया करण्यात आल्या.
मागील दोन वर्षांत सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कामकाजात प्रशासकीय शिस्त आणण्याचा प्रयत्न अध्यक्ष राजन पाटील यांनी केला आहे. यासाठी सातत्याने सुधारणा करण्याची संधी देऊन कारवाईचा बडगा उगारला जात आहे. सांगोला तालुक्यातील घेरडी शाखेत कार्यरत असलेल्या कर्मचाºयांनी सव्वादोन कोटींच्या दरम्यान गैरप्रकार केला होता. खातेदार रक्कम काढताना दिलेल्या स्लिपवरील रकमेपेक्षा अधिक रक्कम काढली जात असे, त्याच्या पासबुकवर मात्र बरोबर रक्कम लिहिली जात असे, मात्र खात्यावरुन अधिक रक्कम काढली जात असे. यातून अपहार केलेली रक्कम शाखाधिकारी सेवानिवृत्त झाल्याने उघडकीला आली. बँकेने सेवानिवृत्त शाखाधिकारी व कार्यरत असलेल्या पाच कर्मचाºयांवर गुन्हा दाखल केला होता. शिवाय कामावरील पाच कर्मचाºयांना निलंबित केले होते. या सर्व कर्मचाºयांना सेवेतून बडतर्फ करण्याची कारवाई मंगळवारी झालेल्या कार्यकारी समितीच्या सभेत करण्यात आली. बडतर्फ केलेल्यांमध्ये बँक इन्स्पेक्टर एस.बी. आलदर, रोखपाल एस.बी. गावडे, लिपिक एस.डी.कुलकर्णी, एस.एम. घुणे, शिपाई एस.एन. करे व एस.जे. गावडे यांचा समावेश आहे. पी.डी. सातपुते हे वांगी-३ शाखेत असताना त्यांची खातेनिहाय चौकशी पूर्ण झाली असून, सततच्या गैरहजेरीमुळे त्यांच्यावर बडतर्फीची कारवाई केली आहे. एस.ए. कदम यांनी इंदरगाव व माढा शाखेत असताना खातेदारांच्या खात्यावरील २२ लाख रुपयांचा अपहार केला होता. त्या रकमेचे व्याज जवळपास १५ लाख रुपये इतके होते. हा अपहार ते रोपळे(क) शाखेला असताना उघडकीला आला. त्यांची चौकशी झाली. चौकशीच्या दरम्यान त्यांच्याकडून १५ लाख रुपयांचा भरणा झाला. उर्वरित रक्कम ते कामावर येत नसल्याने वसूल करता आली नाही. त्यामुळे कदम यांना बडतर्फ केले आहे. 
माळशिरस तालुक्यातील माणकी शाखेचे शाखाधिकारी के.एन. फडतरे व लिपिक डी. वाय. दळवी यांना कामकाजात केलेल्या चुकांमुळे निलंबित केले आहे. ए.डी. माने व ए.के. भोसले या दोघांनी खातेदारांना ११ हजार रुपये आगाऊ रक्कम दिली असून, ही रक्कम दोघांकडून वसूल करण्यात येणार आहे. एच. आर. पाटील हे लिपिक गैरहजर होते, चौकशीदरम्यान कामावर आल्याने त्यांना कामावर घेतले आहे. 
---------------------------
कदम यांच्या मालमत्तेवर बोजा
- अपहार केलेल्या एस. ए. कदम यांना बडतर्फ केले असून, या रकमेपोटी त्यांच्या मालमत्तेवर बोजा चढविण्याची कारवाई केली जाणार असल्याचे सांगण्यात आले. त्यांना बँकेकडील देणे असलेली रक्कम या अपहारापोटी जमा केली जाणार आहे. त्यामुळे त्यांना एक रुपयाही मिळणार नाही उलट मालमत्तेवर बोजा चढविण्याची कारवाई जिल्हा बँक करणार आहे. 
च्बँक डाटा सेंटरसाठी बी.एस.एन.एल. कडून घेतलेल्या कनेक्शनसाठी दर महिन्याला दोन लाख ५५ हजार रुपये खर्च करीत होती. बँकेने पैसे वाचविण्यासाठी अन्य कंपनीचे कनेक्शन घेतले व त्यामुळे दर महिन्याला बँकेचे ९३ हजार रुपये वाचले असल्याचे सांगण्यात आले. याशिवाय लिपिक व्ही.डी. पाटील व बँक इन्स्पेक्टर एस.एम. माशाळे यांनी दिलेले राजीनामे कार्यकारी समितीने मंजूर केले.
--------------------
कामात कुचराई करणाºया व अपहार करणाºया कोणाचीही गय केली जाणार नाही. बँकेचा कारभार पारदर्शक होण्यासाठी जे-जे करता येईल ते-ते केले जाईल. आमच्याकडे सर्वसामान्य नागरिकांनीही संपर्क साधला तरी त्याची दखल घेतो.
-राजन पाटील, अध्यक्ष, जिल्हा बँक

Web Title: Emergency and continuous absence of eight employees of Solapur District Bank, both suspended and suspension!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.