मुख्यमंत्र्यांचा ताफा अडविण्याचा प्रयत्न, राष्ट्रवादीने काळे झेंडे दाखवून फेकले गाजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2018 03:56 PM2018-10-17T15:56:06+5:302018-10-17T16:26:43+5:30

भाजप सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी ताफ्यात घुसलेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना बाजूला करण्यासाठी पोलिसांची चांगलीच धांदल उडाली.

The efforts of the Chief Minister to obstruct the flag, the NCP has shown black flags and the carrot thrown out | मुख्यमंत्र्यांचा ताफा अडविण्याचा प्रयत्न, राष्ट्रवादीने काळे झेंडे दाखवून फेकले गाजर

मुख्यमंत्र्यांचा ताफा अडविण्याचा प्रयत्न, राष्ट्रवादीने काळे झेंडे दाखवून फेकले गाजर

Next
ठळक मुद्दे- राष्ट्रवादीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात- घटनेनंतर परिसरात उडाला गोंधळ- वाहतूक व्यवस्था काही काळाकरिता कोलमडली

सोलापूर : जिल्हाधिकारी कार्यालयातील दुष्काळी आढावा बैठक संपवून सोलापूर विमानतळाकडे निघालेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ताफा राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अडविण्याचा प्रयत्न केला़ याचवेळी राष्ट्रवादीच्या पदाधिकाºयांनी ताफ्याला काळे झेंडे दाखवित भाजप सरकारविरोधी घोषणाबाजी केली.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बुधवारी सोलापूर जिल्ह्याचा दुष्काळ आढावा बैठकीसाठी सोलापूर दौºयावर होते़ सकाळी १० वाजता दुष्काळी आढावा बैठक, १२ वाजता महापालिकेच्या विकास कामांविषयी बैठक त्यानंतर १ वाजता कायदा व सुव्यवस्थेची आढावा बैठक मुख्यमंत्र्यांनी घेतली़ त्यानंतर पत्रकार परिषद आटोपून ते मुंबईला रवाना होण्यासाठी सोलापूर विमानतळाकडे मार्गस्थ झाले होते़ सोलापूर विमातनळ मार्गाकडे जाणाºया एका हॉटेलसमोर राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवित मुख्यमंत्र्यांचा ताफा अडविण्याचा प्रयत्न केला.

याचवेळी ताफ्यावर गाजर फेकत भाजप सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी ताफ्यात घुसलेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना बाजूला करण्यासाठी पोलिसांची चांगलीच धांदल उडाली.



Web Title: The efforts of the Chief Minister to obstruct the flag, the NCP has shown black flags and the carrot thrown out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.