उजनी धरणातील पाणीसाठयात घट, महिन्याभरात ४ टीएमसी पाणी घटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2018 02:57 PM2018-10-10T14:57:14+5:302018-10-10T14:59:12+5:30

Due to the reduction in water storage in Ujani Dam, 4 TMC water has declined in the month | उजनी धरणातील पाणीसाठयात घट, महिन्याभरात ४ टीएमसी पाणी घटले

उजनी धरणातील पाणीसाठयात घट, महिन्याभरात ४ टीएमसी पाणी घटले

googlenewsNext
ठळक मुद्दे१ सप्टेंबरला उजनीमध्ये १०६.४९ टक्के इतका पाणीसाठा होतापुणे जिल्ह्यातील पावसाच्या भरवशावर पडलेल्या पावसाचा फायदा उजनी धरणाला झाला ४० दिवसांत पाणीसाठा सुमारे ८ टक्क्यांनी कमी झाला

भीमानगर : सप्टेंबर ते आॅक्टोबर या एका महिन्यात उजनी धरणातीलपाणीसाठा आठ टक्क्यांनी कमी झाला. म्हणजे एका महिन्यात सुमारे चार टीएमसी इतक्या पाण्याचा वापर झाला. अर्थात बाष्पीभवनाने वाया गेलेल्या पाण्याचाही यात समावेश आहे.

१ सप्टेंबरला उजनीमध्ये १०६.४९ टक्के इतका पाणीसाठा होता. म्हणजे १२०.७१ टीएमसी पाणीसाठा होता. इतर जिल्ह्यांच्या तुलनेत अत्यंत कमी पाऊस होऊनसुद्धा पुणे जिल्ह्यातील पावसाच्या भरवशावर पडलेल्या पावसाचा फायदा उजनी धरणाला झाला. ९ आॅक्टोबरला ११६.५२ टीएमसी पाणीसाठा आहे. म्हणजे ९८.६८ टक्के इतका पाणीसाठा आहे. ४० दिवसांत पाणीसाठा सुमारे ८ टक्क्यांनी कमी झाला. 

सध्या असणाºया अल्प पावसाच्या परिस्थितीमुळे जिल्ह्यातील सर्वांनाच उजनीच्या पाण्यावर अवलंबून राहणे गरजेचे आहे. पाणी वाटप योग्य तºहेने न झाल्यास शेतकºयांच्या रोषाला सामोरे जावे लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

त्याशिवाय अनेक गावांचा पाणीपुरवठाही याच उजनीवर अवलंबून असल्याने त्यांचाही विचार करावा लागणार आहे. पाच आॅक्टोबर रोजी जनहित संघटनेने भीमानगर येथे उजनी धरण व्यवस्थापन विभागाच्या अधिकाºयांना कोंडून कुलूप लावले होते. अशा घटना येणाºया काळात घडू नयेत यासाठी प्रशासनाला दखल घ्यावी लागणार आहे.

येणाºया काळात पाण्याचे राजकारण होणार असून, त्यासाठी धरण प्रशासनाने प्रत्येक उपसा सिंचन योजना किंवा कालवा यांना नियोजनाप्रमाणे पाणी वाटप करावे लागणार आहे. अन्यथा वर्षभरात त्यांना संघर्षाला सामोरे जावे लागेल, अशी स्थिती निर्माण झाली आहे.

Web Title: Due to the reduction in water storage in Ujani Dam, 4 TMC water has declined in the month

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.