भीमा नदीपात्रातील अवैध वाळू वाहतुकीवर पंढरपूर महसूलची धडक कारवाई, १ कोटी २७ लाखांचा मुद्देमाल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 09:48 AM2018-02-22T09:48:54+5:302018-02-22T09:49:43+5:30

बादलकोट (ता. पंढरपूर) हद्दीतील भीमा नदीपात्रातून बेकायदेशीर अवैध वाळू उपसा करून वाहतूक सुरू असताना महसूल व पोलिसांच्या पथकाने संयुक्तपणे छापा टाकून ७ टिपर व १ जे.सी.बी. ताब्यात घेतला. यामध्ये १ कोटी २७ लाखांचा मुद्देमाल जप्त केला असल्याची माहिती प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी दिली.

Due to the illegal sand movement of Bhima river bank, the action of Pandharpur revenue, involving an amount of Rs.1 crore 27 lakh | भीमा नदीपात्रातील अवैध वाळू वाहतुकीवर पंढरपूर महसूलची धडक कारवाई, १ कोटी २७ लाखांचा मुद्देमाल जप्त

भीमा नदीपात्रातील अवैध वाळू वाहतुकीवर पंढरपूर महसूलची धडक कारवाई, १ कोटी २७ लाखांचा मुद्देमाल जप्त

googlenewsNext
ठळक मुद्देबादलकोट येथे बेकायदेशीर यांत्रिक बोटीच्या साहाय्याने अवैध वाळू उपसा सुरु असताना पथकाने छापा टाकून ७ टिपर व १ जेसीबी जप्त संबंधितांवर करकंब पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असल्याची माहिती प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी दिली


आॅनलाइन लोकमत सोलापूर
पंढरपूर दि २२: बादलकोट (ता. पंढरपूर) हद्दीतील भीमा नदीपात्रातून बेकायदेशीर अवैध वाळू उपसा करून वाहतूक सुरू असताना महसूल व पोलिसांच्या पथकाने संयुक्तपणे छापा टाकून ७ टिपर व १ जे.सी.बी. ताब्यात घेतला. यामध्ये १ कोटी २७ लाखांचा मुद्देमाल जप्त केला असल्याची माहिती प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी दिली.
भीमा नदीपात्रात बेकायदेशीर अवैध वाळू उपसा करुन वाहतूक सुरु असल्याची माहिती महसूल प्रशासनाला मिळाली. 
जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या निर्देशानुसार प्रांताधिकारी सचिन ढोले व सहायक पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्या मार्गदर्शनानुसार तहसीलदार मधुसूदन बर्गे यांनी पथके तयार केली. बादलकोट येथे बेकायदेशीर यांत्रिक बोटीच्या साहाय्याने अवैध वाळू उपसा सुरु असताना पथकाने छापा टाकून ७ टिपर व १ जेसीबी जप्त केला आहे. संबंधितांवर करकंब पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असल्याची माहिती प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी दिली.
या कारवाईत नायब तहसीलदार एस. पी. तिटकारे, मंडल अधिकारी सादिक काझी, ढवळे, औसेकर, तलाठी शिंदे, काझी, व्ही. बी. जाधव, खंडागळे, वाहनचालक विजय घाडगे, योगेश अनंतकवळस यांच्यासह महसूल व पोलीस प्रशासनाचे कर्मचारी सहभागी होते.

Web Title: Due to the illegal sand movement of Bhima river bank, the action of Pandharpur revenue, involving an amount of Rs.1 crore 27 lakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.