आता गोड बोलणाºया पोपटाला फसू नका; सुशीलकुमार शिंदे याचा सल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2019 12:15 PM2019-02-11T12:15:40+5:302019-02-11T12:16:52+5:30

मंगळवेढा :  देशाचे नेते शरद पवार यांनी आपली उमेदवारी जाहीर केली आहे. मलाही आग्रह होत आहे. मी हायकमांड सांगेल तेच ...

Do not be fooled by the nostalgia; Advice from Sushilkumar Shinde | आता गोड बोलणाºया पोपटाला फसू नका; सुशीलकुमार शिंदे याचा सल्ला

आता गोड बोलणाºया पोपटाला फसू नका; सुशीलकुमार शिंदे याचा सल्ला

Next
ठळक मुद्देदेशाचे नेते शरद पवार यांनी आपली उमेदवारी जाहीर केली आहे. मलाही आग्रह होत आहे. मी हायकमांड सांगेल तेच करणार - सुशीलकुमार शिंदे तुमची साथ असायला हवी. नाहीतर पोपट येऊन गोड बोलून जातात. आपण अशा पोपटांच्या बोलण्याला फसतो - सुशीलकुमार शिंदे

मंगळवेढा :  देशाचे नेते शरद पवार यांनी आपली उमेदवारी जाहीर केली आहे. मलाही आग्रह होत आहे. मी हायकमांड सांगेल तेच करणार, त्यास तुमची साथ असायला हवी. नाहीतर पोपट येऊन गोड बोलून जातात. आपण अशा पोपटांच्या बोलण्याला फसतो. आपल्या तालुक्यातही एक पोपट आहे. तो तुम्हाला गोड बोलून फसविण्याची शक्यता आहे. गोड बोलणाºयांपेक्षा काम करणाºयांकडे आपण लक्ष दिले पाहिजे. असे मत माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केले.

येथील जगदंब बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने आ़ भारत भालके यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत सर्वरोगनिदान आरोग्य शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते़ अध्यक्षस्थानी माजी आमदार राजन पाटील हे होते़ यावेळी विठ्ठल कारखान्याचे संचालक भगीरथ भालके, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील, नगराध्यक्षा अरुणा माळी, उपनगराध्यक्ष चंद्रकांत घुले, रतनचंद शहा बँकेचे चेअरमन राहुल शहा, काँग्रेसचे पक्षनेते चेतन नरोटे, तालुकाध्यक्ष सुरेश कोळेकर, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य अजित जगताप, मुख्याधिकारी पल्लवी पाटील, युवराज शिंदे, महेश दत्तू, अ‍ॅड. मनीष मर्दा उपस्थित होते.

सुशीलकुमार शिंदे म्हणाले, आज दुष्काळाची परिस्थिती आहे. माणसांना पाण्याची भ्रांत आहे. आरोग्याच्या अनंत अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अशा परिस्थितीत आपल्या लाडक्या नेत्याचा वाढदिवस मोफत आरोग्य शिबिराने करणे ही अभिनंदनीय बाब आहे. 
या कार्यक्रमासाठी पै़ मारुती वाकडे, विजयकुमार खवतोडे, नगरसेवक प्रवीण खवतोडे, अ‍ॅड. मनीष मर्दा, दिलीप मर्दा, सचिन शिंदे, सचिन घुले, युवराज घुले, अशोक गुंगे, चंद्रकांत काकडे, मेजर मुरलीधर घुले, कैलास कोळी, युवराज घुले, रवींद्र घुले, संदीप घुले, संदीप फडतरे, दीपक घुले, डॉ. नंदकुमार शिंदे, नंदकिशोर मालाणी आदी उपस्थित होते. प्रास्ताविक संयोजक चंद्रकांत घुले यांनी केले. सूत्रसंचालन कवी इंद्रजित घुले यांनी केले. 

यांनी केली रुग्णांची तपासणी
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुमेध अंदूरकर, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी एस. पी. कुलकर्णी, हृदयविकार तज्ज्ञ डॉ. एम. के. इनामदार, सर्जन डॉ. एम. आर.टकले, डॉ. अमित गुंडेवार, डॉ. नंदकुमार शिंदे, डॉ. करण व्होरा, डॉ. मेनकुदळे, डॉ. प्रवीण सारडा, डॉ. प्रसाद कोरुलकर, डॉ. देवदत्त पवार, डॉ. स्वप्नील कोठाडिया, डॉ. अतुल भालके, डॉ. पुष्पांजली शिंदे, डॉ. अश्विनी डोके यांनी रुग्णांची तपासणी केली़ 

मागच्या चुका पुन्हा होऊ नयेत : राजन पाटील
च्- सामान्य माणसांच्या हिताचे बोलण्याऐवजी उद्रेक कसा होईल मागच्यावेळी चुका केल्या त्या चुका पुन्हा होऊ नयेत एवढीच आता खबरदारी घ्यावी लागेल, असे त्यांनी सांगितले़ यावेळी भगीरथ भालके यांनी मनोगत व्यक्त केले़

Web Title: Do not be fooled by the nostalgia; Advice from Sushilkumar Shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.