कांदा अनुदान कालावधी वाढीच्या निर्णयावर आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत शिक्कामोर्तब होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2019 10:50 AM2019-01-22T10:50:53+5:302019-01-22T10:53:18+5:30

सोलापूर : कार्यक्रम सुरू असताना प्रास्ताविकात कांदा अनुदानाचा कालावधी वाढविण्याची मागणी झाली. सहकार मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना लागलीच मोबाईलवरुन कांदा अनुदानाचा ...

The decision to increase the onion grant period will be in the Cabinet meeting today | कांदा अनुदान कालावधी वाढीच्या निर्णयावर आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत शिक्कामोर्तब होणार

कांदा अनुदान कालावधी वाढीच्या निर्णयावर आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत शिक्कामोर्तब होणार

googlenewsNext
ठळक मुद्देआजपर्यंत कांद्याला कधीही प्रति क्विंटल ५० रुपयांपेक्षा अधिक अनुदान मिळाले नाही२०१४ प्रमाणेच २०१९ च्या निवडणुकीतही यांना बाजूला फेका, असे सहकार मंत्री देशमुख यावेळी म्हणाले. 

सोलापूर: कार्यक्रम सुरू असताना प्रास्ताविकात कांदा अनुदानाचा कालावधी वाढविण्याची मागणी झाली. सहकार मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना लागलीच मोबाईलवरुन कांदा अनुदानाचा कालावधी वाढविण्याचा एसएमएस पाठविला अन् मुख्यमंत्र्यांनी ओके असा रिप्लाय दिला. 

विविध शासकीय योजनेतून निधी व साहित्य वाटपाचा कार्यक्रम उत्तर तालुक्यातील मार्डी येथे झाला. त्या कार्यक्रमात भाजपाचे तालुकाध्यक्ष काशिनाथ कदम यांनी कांदा अनुदानाचा कालावधी वाढविण्याची मागणी केली. याशिवाय तालुक्यातील २४ गावांचा विकास खुंटल्याची खंत व्यक्त केली.

रस्ते खराब झाले, २५: १५ योजनेचा निधी मिळत नाही व अन्य समस्या मांडल्या. हाच धागा पकडून खा. अमर साबळे यांनी प्रास्ताविकात उपस्थित होणारे मुद्दे शेतकºयांशी संबंधित असल्याने सहकार मंत्री सुभाष देशमुख हे लागलीच मुख्यमंत्र्यांना एसएमएस पाठवून समस्या मांडत आहेत असे सांगितले. त्यानंतर सहकार मंत्र्यांनी भाषणात मुख्यमंत्र्यांना पाठविलेला मेसेज वाचून दाखविला. कांद्याचे दर आणखीन वाढलेले नाहीत, जानेवारी अखेरपर्यंत कांदा अनुदानाची मुदत वाढविणे गरजेचे आहे असा हा एसएमएस होता. त्याचे उत्तर मुख्यमंत्र्यांनी ओके असे पाठविल्याचेही सहकार मंत्र्यांनी सांगितले. उद्या होणाºया मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब होईल, असेही सहकार मंत्री देशमुख म्हणाले. 

आजपर्यंत कांद्याला कधीही प्रति क्विंटल ५० रुपयांपेक्षा अधिक अनुदान मिळाले नाही. आम्ही प्रति क्विंटल १०० रुपये व नोव्हेंबर महिन्यात विक्री झालेल्या कांद्याला अनुदान देण्याचा प्रस्ताव पाठविला होता. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रति क्विंटल २०० रुपये व १५ फेब्रुवारीपर्यंतच्या कांदा विक्रीवर अनुदान देण्याचा निर्णय घेतला, असेही सहकार मंत्र्यांनी सांगितले.

तिजोरीच्या चाव्यावाल्यांनी काय केले?
राज्याच्या तिजोरीच्या चाव्या १४ वर्षे उत्तर सोलापूर तालुक्याच्या हातात होत्या, त्यांनी काय कामे केली?,असा प्रश्न सुशीलकुमार शिंदे यांचे नाव न घेता सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी उपस्थित केला. हेच आता विष पेरण्याचे काम करीत आहेत, २०१४ प्रमाणेच २०१९ च्या निवडणुकीतही यांना बाजूला फेका, असे सहकार मंत्री देशमुख यावेळी म्हणाले. 

Web Title: The decision to increase the onion grant period will be in the Cabinet meeting today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.