ऑनलाइन लोकमत

सोलापूर, दि. 3 - सोलापूर-हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गावर ट्रक आणि बाईकच्या झालेल्या भीषण अपघातात केत दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाला. मंगळवारी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास विडी घरकुल परिसरात ही दुर्दैवी घटना घडली.  नागनाथ केत (वय ६२) व निर्मला केत (वय ४८) हे दाम्पत्य मुळेगावातील रहिवासी आहेत.
 
हे दाम्पत्य सोलापूर शहरात बाजार करुन आपल्या गावी दुचाकीहून परतत असताना काळाने त्यांच्यावर घाला घातला. समोरुन भरधाव वेगाने येणा-या ट्रकने केत दाम्पत्याला चिरडले. यात दोघांचाही जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर सोलापूर-हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी खोळंबली होती.