सोलापुरातील डान्सबारमध्ये पश्चिम बंगाल, कोलकत्ता, मुंबईच्या मुली डान्सर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2018 11:00 AM2018-11-15T11:00:09+5:302018-11-15T11:02:33+5:30

सोलापूर : आॅर्केस्ट्रा बारमध्ये ग्राहक जर कमी असतील, कलेक्शन होत नसेल तर मॅनेजर बारबालांना आपल्या खास लोकांना बोलावून घेण्यास ...

Dancers from West Bengal, Kolkata, Mumbai, dance bars in Solapur | सोलापुरातील डान्सबारमध्ये पश्चिम बंगाल, कोलकत्ता, मुंबईच्या मुली डान्सर

सोलापुरातील डान्सबारमध्ये पश्चिम बंगाल, कोलकत्ता, मुंबईच्या मुली डान्सर

googlenewsNext
ठळक मुद्देशहर व जिल्ह्यातील आॅर्केस्ट्रा बारच्या नावाखाली चालणाºया डान्सबारबारबालांचा फोन येताच तरुणांच्या गाड्या डान्सबारकडे सुसाटप्रेमाचा ज्वर चढलेल्या तरुणासमोर नृत्याचा आविष्कार होताच पैशांची बरसात

सोलापूर : आॅर्केस्ट्रा बारमध्ये ग्राहक जर कमी असतील, कलेक्शन होत नसेल तर मॅनेजर बारबालांना आपल्या खास लोकांना बोलावून घेण्यास सांगतात. बारबालांचा फोन येताच तरुणांच्या गाड्या डान्सबारकडे सुसाट वेगाने निघतात. प्रेमाचा ज्वर चढलेल्या तरुणासमोर नृत्याचा आविष्कार होताच पैशांची बरसात होते. 

शहर व जिल्ह्यातील आॅर्केस्ट्रा बारच्या नावाखाली चालणाºया डान्सबारमध्ये सध्या पश्चिम बंगाल, कोलकाता, मुंबई आदी भागातून आलेल्या मुली डान्सर म्हणून काम करतात. एक बँड असतो त्याचा प्रमुख सर्व मुलींचे आणि वादकांचे नेतृत्व करतो. आॅर्केस्ट्रा बारमध्ये ग्राहक आला की मुलींची पेपर नॅपकीनवर लिहून ओळख करून दिली जाते. पेपर नॅपकीन किंवा साध्या पांढºया कागदावर फरमाईश विचारली जाते. फरमाईशप्रमाणे गाणे आणि त्यावर नृत्य सुरू झाले की, ग्राहकाला खिशातून पैसे बाहेर काढण्यास भाग पाडले जाते. ग्राहकाला मद्याची झिंग चढली की तो शराबीमधील अमिताभ बच्चन होतो. शंभर रुपये दिले की दहा-दहा रुपयांची एक माळ दिली जाते. ती माळ नर्तिकेच्या गळ्यात घातली जाते. १00, २00 आणि ५00 रुपयांच्या माळा कॅशिअरकडे असतात. ग्राहक पैसे दिले की त्याच्या बदल्यात माळा दिल्या जातात. ही माळ ग्राहक स्वत:हून नर्तिकेच्या गळ्यात घालतो किंवा कामगारामार्फत घालण्यास सांगतो. नर्तिकेवर पैसे उडवायचे असतील तर त्यासाठी १0 रुपयांच्या नोटांचा ५00 चा एक बंडल असतो. मागणीनुसार पैशांचे बंडल टेबलवर ठेवून तो नर्तिकेवर उडवत असतो. लाखो रुपयांची उधळण होते, फक्त पैसे गोळा करायला २ ते ४ माणसे असतात.


प्रत्येक ग्राहकाची एक खास नर्तिका असते, तो फक्त तिच्यावरच पैसे उडवत असतो. जेव्हा पैसे संपतात तेव्हा ग्राहक आॅर्केस्ट्रा बारमधून काढता पाय घेतो आणि सरळ आपल्या घरचा रस्ता धरतो. रात्री धुंदीत असलेला तरुण जेव्हा सकाळी शुद्धीवर येतो तेव्हा बारबालाचा गुडमॉर्निंगचा मेसेज त्याच्या मोबाईलवर आलेला असतो. दिवसभर चॅटिंग, फोन करून पुन्हा रात्रीची तयारी ग्राहक करतो. डान्सबारचा नाद लागलेला तरुण कधी कंगाल होतो हे कळत नाही. 

जोपर्यंत पैसा तोपर्यंत बारबाला...
- ग्राहकाजवळ जोपर्यंत उडवण्यासाठी पैसे असतात तोपर्यंत ती त्याच्या समोरून हटत नसते. जेव्हा पैसा संपतो तेव्हा ती दुसºया ग्राहकाचा शोध घेते. वास्तविक पाहता हा तिचा व्यवसाय आहे; मात्र तिथे ग्राहकाच्या भावना दुखावतात आणि मग सुरू होतो वाद. याचा बंदोबस्त करण्यासाठी हॉटेल चालकाकडून नेमण्यात आलेले गार्ड येतात आणि संबंधित ग्राहकाला हॉटेलच्या बाहेरचा रस्ता दाखवतात. बारबाला आपल्याला पहिल्यासारखे बघत नाही, बोलत नाही असे लक्षात आल्याने काही महाशय ग्राहक हात कापून घेणे, हातावर पेट्रोल ओतून पेटवून घेणे आदी प्रकार करीत असतो. बाहेर रुबाबात असणारा ग्राहक बारबालेसाठी पायरीवर बसून लहान मुलांप्रमाणे रडतात. काही कालावधीनंतर बारबाला एकदा हॉटेलमधून निघून गेली की ती पुन्हा येत नाही. तिचा बँडप्रमुख तिला दुसºया हॉटेलमध्ये पाठवून इकडे नवीन बारबालेला बोलावून घेतो. 

Web Title: Dancers from West Bengal, Kolkata, Mumbai, dance bars in Solapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.