सोलापूरातील रे नगरच्या घरांमध्ये क्रश सँडचा वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2018 01:57 PM2018-05-16T13:57:21+5:302018-05-16T13:57:21+5:30

दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुंभारी येथे बांधण्यात येणाºया ३० हजार घरकुलांमध्ये कृत्रिम वाळूचा (क्रश सँड) वापर करण्यात आला असून, याद्वारे आठवड्यात १२ घरांचे बांधकाम पूर्ण होणार आहे.

Crush Sand use in Ray Nagar's house in Solapur | सोलापूरातील रे नगरच्या घरांमध्ये क्रश सँडचा वापर

सोलापूरातील रे नगरच्या घरांमध्ये क्रश सँडचा वापर

googlenewsNext
ठळक मुद्देसोलापुरातील पहिला प्रयोगभारतातील अद्ययावत तंत्रज्ञान

मिलिंद राऊळ
सोलापूर : महाराष्टÑात सध्या वाळूच्या टंचाईमुळे लाखो बांधकामे रखडली आहेत. या पार्श्वभूमीवर सोलापुरातील रेनगर फेडरेशनच्या वतीने पंधे कन्स्ट्रक्शनच्या वतीने दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुंभारी येथे बांधण्यात येणाºया ३० हजार घरकुलांमध्ये कृत्रिम वाळूचा (क्रश सँड) वापर करण्यात आला असून, याद्वारे आठवड्यात १२ घरांचे बांधकाम पूर्ण होणार आहे.

देशात सर्वत्र वाळूटंचाईचा सामना बांधकाम व्यावसायिकांना करावा लागत असताना सोलापुरातील रेनगर फेडरेशनच्या घरांना आंतरराष्टÑीय पातळीवर सर्वांत आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे ३० हजारे घरे बांधण्यात येत आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणावर बांधण्यात येत असलेल्या या घरांना क्रश सँड वापरण्यात येत आहे. हे तंत्रज्ञान भारतात केवळ याआधी एल अ‍ॅण्ड टी या कंपनीने वापरलेले आहे.

श्रमिकांना लवकरात लवकर आणि स्वस्तात घरे मिळावीत म्हणून पंधे कन्स्ट्रक्शनने मोठ्या प्रमाणावर येथे काम सुरू केले आहे. 
या तंत्रज्ञानाद्वारे किमान १०० वर्षे टिकणार असे घर बनविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून, नैसर्गिक संकटाने घराची हानी होऊ नये, असे तंत्रज्ञान या पद्धतीत आहे. 

संकटापासूनसुद्धा या श्रमिकांचे घर वाचावे, अशी काळजी बांधकाम करताना घेण्यात येत आहे. युद्धपातळीवर घर उभारणीचे काम सुरू असून, ठरविल्याप्रमाणे कामगारांना हक्काच्या घराची चावी देण्यात येणार आहे.

दरम्यान, मंगळवारी या आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे साकार होणाºया गृहप्रकल्पाला माजी आमदार नरसय्या आडम, ‘लोकमत’चे संपादक राजा माने, अ‍ॅड. धनंजय माने, अ‍ॅड. विजय मराठे, नगरसेविका कामिनी आडम, पंधे कन्स्ट्रक्शनचे अंकुर पंधे, मेहुल मुळे, दाऊद शेख यांनी भेट देऊन या नवीन तंत्रज्ञानाची माहिती घेतली.

क्रश सँड म्हणजे काय?
महाराष्टÑात सध्या वाळूची अभूतपूर्व टंचाई आहे. या पार्श्वभूमीवर क्रश सँडद्वारे बांधकामाचा प्रयोग उपयुक्त आहे. बांधकामाला वापरली जाणारी खडी मशीनद्वारे घासायची. घासल्यानंतर त्याचे वाळूसारखे कण निर्माण होतात. या कणाचा वापर करून संपूर्ण बांधकाम करायचा, असा हा क्रश सँडचा प्रकार आहे. यामुळे नद्यांमधून बेसुमार उपसा होणाºया वाळूला लगाम बसेल आणि मोठ्या प्रमाणावर पर्यावरण संवर्धनासाठी मदत होईल.

घरांचे काम सुरू केले आहे. महिनाअखेर केंद्र आणि राज्य शासनाचे अनुदान मिळेल. यानंतर दोन महिन्यांत २० मशीनचा वापर करून महिन्याला ८०० घरे बांधून पूर्ण करण्यात येणार आहेत. येत्या चार वर्षांत कामगारांना घरे देण्याचा संकल्प सोडला आहे.
- नरसय्या आडम, संस्थापक, रे नगर फेडरेशन


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे ३० हजार घरांच्या बांधकामाचे काम सुरू आहे. जगातील आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे बांधलेली ही घरे संपूर्ण देशात ‘मॉडेल’ ठरावीत, असा आमचा प्रयत्न आहे.
- अंकुर पंधे, विकासक

Web Title: Crush Sand use in Ray Nagar's house in Solapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.