विकासासाठी योगदान द्या; गाव डोक्यावर घेईल ; यजुर्वेद महाजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2018 02:46 PM2018-07-12T14:46:35+5:302018-07-12T14:49:22+5:30

सोलापूर जिल्हा परिषदेच्या वतीने सांडपाणी, घनकचरा व्यवस्थापन, प्लास्टिक व थर्माकॉल निर्मूलन या विषयावर जिल्हास्तरावर कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले़

Contribute to the development; The village will take on the heads; Yajurveda Mahajan | विकासासाठी योगदान द्या; गाव डोक्यावर घेईल ; यजुर्वेद महाजन

विकासासाठी योगदान द्या; गाव डोक्यावर घेईल ; यजुर्वेद महाजन

Next
ठळक मुद्दे प्लास्टिकमुळे मुक्या प्राण्यांचे जीव धोक्यात - सीईओ डॉ. भारुड सोलापूर जिल्ह्यात १३०० गाव वाड्या-वस्त्या - सीईओ डॉ. भारुड गावचा विकास करण्यासाठी मनापासून योगदान द्या - महाजन

सोलापूर :  सरपंच आणि पदाधिकाºयांनी आयुष्यात मिळालेल्या संधीचा फायदा घेऊन गावाचे खºया अर्थाने नेतृत्व करावे. गावचा विकास करण्यासाठी मनापासून योगदान द्या. निश्चितच गाव तुम्हाला डोक्यावर घेईल, असे प्रतिपादन दीपस्तंभ फाउंडेशन (जळगाव)चे संस्थापक यजुर्वेद महाजन यांनी केले. 

जिल्हा परिषदेच्या वतीने सांडपाणी, घनकचरा व्यवस्थापन, प्लास्टिक व थर्माकॉल निर्मूलन या विषयावर जिल्हास्तरावर कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले आहे. पहिली कार्यशाळा  जुळे सोलापुरातील जामगुंडी मंगल कार्यालयात घेण्यात आली, यावेळी ते बोलत होते. 

जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते बळीराम साठे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड, ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक अनिल नवाळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) विजय लोंढे, जि. प. सदस्या विद्युल्लता कोरे, दक्षिण सोलापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रशांतसिंह मरोड, उत्तर सोलापूर पंचायत समितीच्या उपसभापती रंजना कांबळे, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव, दक्षिण सोलापूरचे गटशिक्षणाधिकारी धनंजय चोपडे, उत्तर सोलापूरचे मल्हारी बनसोडे आदी उपस्थित होते. या कार्यशाळेला दक्षिण व उत्तर सोलापूर तालुक्यातील सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, विस्तार अधिकारी, शाळा केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, ग्रामसेवक, अंगणवाडी पर्यवेक्षक, पर्यवेक्षिका, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष आदी उपस्थित होते.
महाजन म्हणाले, आज जे स्वप्न बघत नाहीत ते काहीच करू शकत नाहीत. गावचे सरपंच, उपसरपंच व पदाधिकारी यांनी आपल्या गावाच्या विकासाचे स्वप्न पाहावे आणि गावातील सांडपाणी व घनकचºयाचे सुयोग्य व्यवस्थापन करून आपले गाव स्वच्छ, सुंदर ठेवण्याचा ध्यास घ्यावा.  सूत्रसंचालन सहशिक्षक जीवराज खोबरे यांनी केले.

वडाळ्याचा आदर्श घ्या : भारुड 
सीईओ डॉ. भारुड म्हणाले, पदाधिकाºयांनी गावात सांडपाणी व घनकचºयाचे व्यवस्थापन चांगले करून प्लास्टिक बंदीची सुरुवात करायला हवी. कारण प्लास्टिकमुळे मुक्या प्राण्यांचे जीव धोक्यात आले आहेत. सोलापूर जिल्ह्यात १३०० गाव वाड्या-वस्त्या आहेत. यामध्ये सांडपाण्यासाठी ३० हजारांपेक्षा जास्त शोषखड्डे घेण्यात आले आहेत. ५० गावे गटार व डासमुक्त झाली आहेत. विशेषत: विरोधी पक्षनेते बळीरामकाका साठे यांच्या नेतृत्वाखाली वडाळा गावात एकूण १०१० कुटुंबांकडे १०३० इतके शोषखड्डे तयार करण्याचे अद्भुत काम केले आहे. या कामाचाही आदर्श समोर ठेवा. सोलापूर जिल्ह्यात एकही डास न दिसण्यासाठी गाव स्वच्छ व सुंदर असले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. 

Web Title: Contribute to the development; The village will take on the heads; Yajurveda Mahajan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.