मुख्यमंत्र्यांनी विठ्ठल-रूक्मिणीच्या व्हीआयपी दर्शन पास विक्रीची चौकशी करावी; अन्यथा अधिवेशनात प्रश्न मांडू, काँग्रेसचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2018 10:45 AM2018-09-04T10:45:09+5:302018-09-04T10:49:16+5:30

The Chief Minister should inquire into Vipal-Rukmini's VIP visit pass sale; Otherwise, ask the question in session, Congress's warning | मुख्यमंत्र्यांनी विठ्ठल-रूक्मिणीच्या व्हीआयपी दर्शन पास विक्रीची चौकशी करावी; अन्यथा अधिवेशनात प्रश्न मांडू, काँग्रेसचा इशारा

मुख्यमंत्र्यांनी विठ्ठल-रूक्मिणीच्या व्हीआयपी दर्शन पास विक्रीची चौकशी करावी; अन्यथा अधिवेशनात प्रश्न मांडू, काँग्रेसचा इशारा

Next
ठळक मुद्देराज्यातील कॉग्रेसची जनसंघर्ष यात्रा सोलापूर दौºयावरदर्शन पास विक्री प्रकरणात मोठी सोनेरी टोळी असणारपास विक्री प्रकरणात कारवाई न करणे म्हणजे महाराष्ट्रातील वारकºयांचा अपमान

सोलापूर : पंढरपूरच्या विठ्ठल-रूक्मिणी  दर्शन पास विक्री प्रकरणात मोठी सोनेरी टोळी असणार आहे़ या टोळीची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून चौकशी झाली पाहिजे अन्यथा येत्या अधिवेशनात प्रश्न उपस्थित करून सरकारला धारेवर धरणार असल्याचा इशारा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पंढरपूरात पत्रकारांशी बोलताना दिला

राज्यातील कॉग्रेसची जनसंघर्ष यात्रा सोलापूर दौºयावर आहे़ या दौºयानिमित्त या यात्रेतील प्रमुख नेत्यांनी पंढरपूरातील विठ्ठल-रूक्मिणी मातेचे दर्शन घेतले़ त्यानंतर आमदार भारत भालके यांच्या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते़ यावेळी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील आदी मान्यवर उपस्थित होते़ 

पुढे बोलताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, विठ्ठल रूक्मिणी दर्शनाचे व्हीआयपी पास विक्री प्रकरणात कारवाई न करणे म्हणजे महाराष्ट्रातील वारकºयांचा अपमान आहे़ सनातनवर बंदी घालण्यासाठी २०११ मध्ये प्रस्ताव पाठविला होता़ त्यावेळी पी चिदंबरम हे केंद्रीय गृहमंत्री होते़ याबाबत सुशिलकुमार शिंदे यांना काहीच माहिती नाही़ कारण ते नंतर केंद्रीय गृहमंत्री झाले़ मात्र यानंतर बंदीचा प्रस्ताव का अडकला हे समजले नाही़ यानंतर राज्यातील काँग्रेसचे सरकारही गेले याबाबत भाजप सरकारने कारवाई करणे गरजेचे होते मात्र ते झाले नाही त्यामुळे ही वेळ आली असेही चव्हाण यांनी सांगितले़ 

Web Title: The Chief Minister should inquire into Vipal-Rukmini's VIP visit pass sale; Otherwise, ask the question in session, Congress's warning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.