पंढरपुरातील सेंट्रल बँक ऑफ इंडियाला लागली आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2018 06:29 AM2018-12-05T06:29:16+5:302018-12-05T06:30:47+5:30

पंढरपूर : शहरातील महत्त्वाच्या चौकात असणाऱ्या सेंट्रल बँक ऑफ इंडिया ला मंगळवारी रात्री अकराच्या सुमारास आग लागली. या आगीमध्ये ...

Central Bank of India took fire from Pandharpur | पंढरपुरातील सेंट्रल बँक ऑफ इंडियाला लागली आग

पंढरपुरातील सेंट्रल बँक ऑफ इंडियाला लागली आग

googlenewsNext
ठळक मुद्देबँके शेजारी असलेल्या दुकानं लागली आगलाखो रुपयाचे नुकसान

पंढरपूर : शहरातील महत्त्वाच्या चौकात असणाऱ्या सेंट्रल बँक ऑफ इंडिया ला मंगळवारी रात्री अकराच्या सुमारास आग लागली. या आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेसमोरील असणाऱ्या दोन मजली इमारती मध्ये दुसऱ्या मजल्यावर सेंट्रल बँक आहे. व पहिल्या मजल्यावर अनेक व्यवसायिक दुकाने आहेत. बँकेच्या बरोबर खाली कपडे शिवणकाम करणाऱ्या टेलर चे दुकान आहे. या दुकानात अचानक अज्ञात कारणाने आग लागली. या आगीने विश्वरूप घेतले यामुळे सेंट्रल बँक ऑफ इंडिया व बाजूचे शेतीचे बी बियाणे विक्रीच्या दुकानाला देखील आग लागली.

ही माहिती पंढरपूर नगरपरिषदेच्या अग्निशमन विभागाला समजताच अग्निशमन ची गाडी घटनास्थळी तत्काळ पोहोचली. यानंतर आग आटोक्यात आली. याबाबत पोलिस ठाण्यास उशीरा माहिती देण्यात आली.

Web Title: Central Bank of India took fire from Pandharpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.