‘नीट’ परीक्षेचे आता सोलापुरात केंद्रास मान्यता , माहितीपत्रक जारी, लातूर, नांदेड, बीडमध्येही सेंटर मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2018 12:29 PM2018-02-10T12:29:54+5:302018-02-10T12:36:09+5:30

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) घेण्यात येणाºया वैद्यकीय प्रवेश परीक्षा अर्थात ‘नीट’ (एईईटी) परीक्षेचे केंद्र सोलापूरला मंजूर झाले असून यासंदर्भातील सूचना सीबीएसईच्या माहितीपत्रकात आज प्रसिद्ध झाली आहे.

Center clears center for 'NET' exams in Solapur; issue of brochure, Center approved in Latur, Nanded, Beed | ‘नीट’ परीक्षेचे आता सोलापुरात केंद्रास मान्यता , माहितीपत्रक जारी, लातूर, नांदेड, बीडमध्येही सेंटर मंजूर

‘नीट’ परीक्षेचे आता सोलापुरात केंद्रास मान्यता , माहितीपत्रक जारी, लातूर, नांदेड, बीडमध्येही सेंटर मंजूर

Next
ठळक मुद्देमराठवाड्यातील लातूर, नांदेड आणि बीड या शहरांमध्येही हे केंद्र मंजूरसोलापुरात केंद्र सुरू होण्यासाठी ‘लोकमत’ने पाठपुरावा केला होता, त्याला यश आले बॅचलर आॅफ मेडिसिन अ‍ॅन्ड बॅचलर आॅफ सर्जरी (एमबीबीएस) आणि बॅचलर आॅफ डेंटल सर्जरी (बीडीएस) या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ही परीक्षा


आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि १० : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) घेण्यात येणाºया वैद्यकीय प्रवेश परीक्षा अर्थात ‘नीट’ (एईईटी) परीक्षेचे केंद्र सोलापूरला मंजूर झाले असून यासंदर्भातील सूचना सीबीएसईच्या माहितीपत्रकात आज प्रसिद्ध झाली आहे. मराठवाड्यातील लातूर, नांदेड आणि बीड या शहरांमध्येही हे केंद्र मंजूर झाले आहे. सोलापुरात केंद्र सुरू होण्यासाठी ‘लोकमत’ने पाठपुरावा केला होता. त्याला यश आले आहे.
बॅचलर आॅफ मेडिसिन अ‍ॅन्ड बॅचलर आॅफ सर्जरी (एमबीबीएस) आणि बॅचलर आॅफ डेंटल सर्जरी (बीडीएस) या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ही परीक्षा दरवर्षी देशभरातील १५० शहरांतील सुमारे २००० केंद्रांमधून घेतली जाते. सोलापुरातून दरवर्षी ३० हजार विद्यार्थी या परीक्षेला बसतात; पण त्यांना परीक्षा देण्यासाठी पुणे, मुंबईची केंद्रे मिळतात. विद्यार्थी आणि पालकांसाठी दूरची केंद्रे सोयीची नसल्यामुळे सन २०१७ मध्ये ‘लोकमत’ने ही समस्या ठळकपणे मांडली होती. यंदा ‘नीट’ ६ मे रोजी होणार  आहे. गतवर्षी राज्यात ‘नीट’ परीक्षेची ९ केंद्रे होती. यंदा त्यामध्ये ८ नवीन केंद्रांची भर पडली आहे. सोलापूर आणि मराठवाड्यात परीक्षा केंद्राचे जाळे झाल्यामुळे विद्यार्थ्यांना नजीकचे केंद्र निवडता येणार असून प्रवासाचा वेळ वाचल्यामुळे त्यांना अभ्यासासाठी एक-दोन दिवस अधिक मिळणार आहेत.
----------------------
नीट परीक्षेची नवीन केंद्रे
या परीक्षेसाठी मुंबईबरोबरच मुंबई उपनगर तसेच सोलापूरसह नांदेड, नाशिक, लातूर, जळगाव, बुलडाणा, बीड ही नवीन केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. शेजारच्या कर्नाटक राज्यात ९; तर आंध्र प्रदेशात ८ केंद्रे आहेत.

Web Title: Center clears center for 'NET' exams in Solapur; issue of brochure, Center approved in Latur, Nanded, Beed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.