आप्पासाहेब पाटील : आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि २१ : सोलापूरातील इंदिरा गांधी स्टेडियमवर सुरू झालेल्या अंध-अपंगांच्या राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेत सातारा संघाचा पराभव करीत सांगली संघाने ८८ धावांनी विजय संपादन करून राज्यस्तरीय स्पर्धेत विजयी सलामी दिली़ या सामन्याचा सामनावीर अजिनाथ घोडके हा ठरला़
जैन सोशल गु्रप, सोलापूर व मफतलाल इंडस्ट्रीज लि यांच्या संयुक्त विद्यमाने सोलापूरातील इंदिरा गांधी स्टेडियमवर अंध व अपंगाच्या राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन सहकारमंत्री सुभाष देशमुख व महापौर शोभा बनशेट्टी यांच्या हस्ते करण्यात आले़ यावेळी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन फॉर द ब्लार्इंड, मुंबईचे अध्यक्ष रमाकांत साटम, मफतलाल इंडस्ट्रीजचे मार्केटिंग अध्यक्ष एम़ बी़ रघुनाथ, एमआरसीचे चेअरमन प्रविण चोपडा, उद्योगपती गणेश छल्लाणी, दिपक आहेरकर, प्रकाशचंद डाकलिया, किरण पवार, नगरसेवक आनंद चंदनशिवे, नगरसेविका संगिता जाधव, श्रीनिवास करली, नागेश वल्याळ, प्रोग्राम चेअरमन परिमल भंडारी, रमेश डाकलिया, अमित कवाड, जैन सोशल ग्र्रुपचे संजय सेठिया, चेतन सुराणा, अभय गांधी, पिंकी कवाड, अंध, अपंग प्रगती सोसायटी ट्रस्टचे अध्यक्ष प्रकाश दर्शनाळे, प्रभाकर कदम, राजू शेळके, राजेश दमाणी, अंकित दमाणी आदी मान्यवर उपस्थित होते़
प्रारंभी प्रारंभी सातारा व सांगली संघात सामना खेळविला गेला़ यात सातारा संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला़ सांगली संघाने ८ षटकात दोन बाद १३६ धावा केल्या़ या धावाचा पाठलाग करताना सांगली संघ दोन बाद ४८ एवढे रन काढू शकले़ त्यामुळे सांगली संघ ८८ धावांनी विजयी झाला़ सांगली संघाकडून अविनाश घोडके नाबाद ५६ तर सुरज जाधव या खेळाडूंनी नाबाद ४० धावा केल्या़ अविनाश घोडके यांनी नाबाद ५६ धावा काढून १ विकेट घेतल्याबद्दल त्यास सामनावीर घोषित करण्यात आले़ दुसरा सामना हा लातूर व सोलापूर यांच्यात खेळविण्यात आला़
या सामन्यांसाठी गणेश छल्लाणी, श्री हिराचंद नेमचंद जैन मंगल कार्यालय, सोलापूर, जैन सोशल गु्रप संगिनी फोरम, सोलापूऱ जैन सोशल गु्रप युवा फोरम, सोलापूर यांच्यासह ललितकुमार वैद, चेतन संघवी, उन्मेश करनावट, भद्रेश शहा, प्रविण भंडारी, हर्षल कोठारी, रमेश डाकलिया, राजेश शहा, वंदना शहा, विनोद सेठिया, किरीट शहा, संदीप वेद, भव्या शहा, रितेश मेहता, परिमल भंडारी, महिपाल ओसवाल, भैरू संकलेचा, प्रेरणा बददोटा, योगेश मेहता, शिखा बंब, नंदकिशोर शहा, बाबुभाई मेहता, संजीव पाटील, मनमोहन वेद, सुनिल छाजेड हे परिश्रम घेत आहेत़
------------------------------------
या स्पर्धेत सोलापूर, पुणे, सांगली, सातारा, औरंगाबाद, कोल्हापूर या ८ संघानी सहभाग नोंदविला आहे़ या स्पर्धेचे प्रथम परितोषिक ११ हजार व चषक तर व्दितीय परितोषिक ७ हजार व चषक असे आहे़२१ व २२ एप्रिल या दोन दिवसात सात सामने खेळविण्यात येणार आहेत़ सामने बाद पध्दतीने खेळविले जात आहेत़ म्युझिकल बॉलचा यामध्ये वापर करण्यात येत आहे़