सोलापूरातील ६८ लिंगांच्या दर्शनाने भाविक होतात धन्य !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2018 11:36 AM2018-08-13T11:36:58+5:302018-08-13T11:52:54+5:30

श्रावणी सोमवार : अष्टविनायकने येऊ दिले नाही सोलापूरवर संकट

Blessed are devotees of 68 lingas in Solapur. | सोलापूरातील ६८ लिंगांच्या दर्शनाने भाविक होतात धन्य !

सोलापूरातील ६८ लिंगांच्या दर्शनाने भाविक होतात धन्य !

Next
ठळक मुद्दे१२ व्या शतकात महात्मा बसवेश्वरांनी समतेचा संदेश दिलाभक्ती मार्गावरुन वाटचाल केल्यास जीवन आनंदी बनतेसिद्धरामेश्वरांनी सोलापूरच्या पंचक्रोशीत ६८ लिंगांची स्थापना केली

रेवणसिद्ध जवळेकर
सोलापूर : श्रावण महिना अन् त्यातला प्रत्येक सोमवार हा पवित्र दिवस समजला जातो. श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी कपिलसिद्ध श्री मल्लिकार्जुन, ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर अन् सिद्धरामेश्वरांनी प्रतिष्ठापना केलेल्या ६८ लिंगांचे दर्शन घेताना भाविक धन्य-धन्य होतात. ९०० वर्षांपूर्वी सिद्धरामेश्वरांनी पंचक्रोशीत प्रतिष्ठापना केलेल्या अष्टविनायकामुळे आजवर सोलापूरवर जेणेकरुन सोलापूरकरांवर कसलेच नैसर्गिक संकट आले नाही.

१२ व्या शतकात महात्मा बसवेश्वरांनी समतेचा संदेश दिला. तोच संदेश ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांनी आपल्या धर्म अन् सामाजिक कार्यातून दिला. भक्ती मार्गावरुन वाटचाल केल्यास जीवन आनंदी बनते. म्हणूनच शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांनी सोलापूरच्या पंचक्रोशीत ६८ लिंगांची स्थापना केली. शिव म्हणजे शंकर, शिव म्हणजे ईश्वर अन् शिव म्हणजे तारणहार... म्हणूनच प्रत्येक लिंगात ईश्वरी नाम असल्याचे पाहावयास मिळते.

दरवर्षी जानेवारी महिन्यात शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांची यात्रा भरते. यात्रेतील पहिल्या दिवशी तैलाभिषेक, दुसºया दिवशी अक्षता सोहळा पार पडतो. या दोन्ही दिवशी भाविक नंदीध्वज मिरवणुकीने ६८ लिंगांचे दर्शन घेतात. श्रावण महिन्यात बहुतांश भाविक सिद्धरामेश्वरांचे दर्शन घेऊन ६८ लिंगांच्या दर्शनासाठी मार्गस्थ होतात. 

तिसºया सोमवारी पालख्या एकवटतात
यंदाच्या श्रावणात चार सोमवार आले आहेत. श्रावणातल्या तिसºया सोमवारी गावागावांमधील १०० हून अधिक पालख्या सिद्धरामेश्वर मंदिरात येतात. योग समाधीला फेºया मारल्यावर विधिवत पूजा होते आणि त्यानंतर प्रसाद वाटपानंतर पालख्या परतीच्या प्रवासाला निघतात. तिसºया श्रावणी सोमवारी मंदिरात जणू भाविकांचा मेळाच भरलेला असतो. 

Web Title: Blessed are devotees of 68 lingas in Solapur.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.