भिमा कोरेगाव प्रकरणाचे सोलापूरात पडसाद, दगडफेक, लिलाव बंद पाडले, रास्ता रोको आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2018 11:46 AM2018-01-02T11:46:38+5:302018-01-02T11:56:49+5:30

भीमा कोरे गाव इथं घडलेल्या दुदेर्वी घटनेचा निषेध करत  माथाडी हमाल तोलर संघटनांनी बाजार समिती मध्ये कांदा ट्रक अनलोड न करण्याचा निर्णय घेतला. या निर्णया मुळे शेतकºयांनी संतप्त प्रतिक्रिया घेत स्वत:त  गाडी अनलोड करण्याचा निर्णय घेतला आहे.

Bhima Koregaon case lodged in Solapur, pelted stones, auctioned off, road blockade | भिमा कोरेगाव प्रकरणाचे सोलापूरात पडसाद, दगडफेक, लिलाव बंद पाडले, रास्ता रोको आंदोलन

भिमा कोरेगाव प्रकरणाचे सोलापूरात पडसाद, दगडफेक, लिलाव बंद पाडले, रास्ता रोको आंदोलन

Next
ठळक मुद्देदयानंद कॉलेज परिसरात दगडफेक, रिक्षा फोडलीशहरात ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढविलासोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत लिलाव बंद पाडले


आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि २ : भीमा कोरेगाव प्रकरणाचे पडसाद राज्यभरात उमटताना दिसत असतानाच त्याचे लोण आता सोलापूरात पसरू लागले आहे़ मंगळवारी पहाटेपासून हमाल तोलारांनी शेतकºयांचा माल उतरवून घेण्यास विरोध केला, तर सोलापूरातील काही भागात दगडफेकीचा प्रकार घडला़ लिलावासाठी माल घेऊन आलेल्या संतप्त शेतकºयांनी लिलाव सुरू करण्याच्या मागणीसाठी बाजार समितीसमोर रास्ता रोको आंदोलन केले़ 
भीमा कोरे गाव इथं घडलेल्या दुदेर्वी घटनेचा निषेध करत  माथाडी हमाल तोलर संघटनांनी बाजार समिती मध्ये कांदा ट्रक अनलोड न करण्याचा निर्णय घेतला. या निर्णया मुळे शेतकºयांनी संतप्त प्रतिक्रिया घेत स्वत:त  गाडी अनलोड करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या प्रशासक इमारती मध्ये शेतकºयांनी गोळा होत मागणी लावून धरलीय. तर दुसरीकडे कामगार संघटना आपल्या काम न करण्याचा निर्णयावर ठाम आहे. यामुळे बाजार समिती मध्ये तणाव निर्माण झाला असून पोलिसांची कुमक मागवली आहे. पोलीस अधिकारी, सचिव विनोद पाटील, कामगार संघटना यांच्यातील चर्चांना यश येतं नाहीय. कामगारांनी आपला निर्णय काहीवेळा न जाहीर करणं असून तो पर्यंत शेतकरी थांबण्यास तयार नाही. वाहन धारक वाहनांचा भाडे मागत आहेत ते कोण देणार असा सवाल उपस्थित केला जात आहे.अनेक घटनांनी बाजार समितीची शांतता भंग झाली असून पोलिसांची मदत घेऊन शेतकरी व प्रशासन कांदा उतरवण्यास सज्ज झालीय. शेतकरी व कामगार दोघेही आपल्या भूमिकेवर ठाम असल्यानं प्रशासनासमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. आडत व्यापारीही काळ्या फिती लावून काम करण्यास तयार आहे. विशेष म्हणजे स्वत: सचिव विनोद पाटील यांनी काळी फित लावून काम करण्याचा नारा दिलाय. 

Web Title: Bhima Koregaon case lodged in Solapur, pelted stones, auctioned off, road blockade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.