भारत भालके, प्रशांत परिचारक, गोडसे यांची एक मशागत पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2019 10:17 AM2019-04-29T10:17:51+5:302019-04-29T10:25:07+5:30

निवडणूक लोकसभेची समीकरणे पंढरपूर विधानसभा निवडणुकीची; परिचारक गटाचे कार्यकर्ते संभ्रमात, आनंदराज आंबेडकरांच्या नावाची चर्चा 

Bharat Bhalake, Prashant Parivarak, Godse's one complete farming | भारत भालके, प्रशांत परिचारक, गोडसे यांची एक मशागत पूर्ण

भारत भालके, प्रशांत परिचारक, गोडसे यांची एक मशागत पूर्ण

Next
ठळक मुद्देपंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघ हा सेनेकडे आहे. त्यामुळे या जागेवर शैला गोडसे यांची दावेदारी पक्की मानली जात आहेकाँग्रेस-राष्ट्रवादीकडून विद्यमान आ. भारत भालके यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहेआता परिचारक गटाने काय करायचे? याबाबत कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमावस्था आहे

पंढरपूर : लोकसभेच्या निवडणुकीत सुशीलकुमार शिंदे यांच्यासाठी आ़ भारत भालके यांनी तर डॉ़ जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांच्यातर्फे आ़ प्रशांत परिचारक, शिवसेनेच्या शैला गोडसे यांनी विधानसभानिवडणूक डोळ्यासमोर ठेवून साखर पेरणी करीत एक मशागत पूर्ण केली आहे. 

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघ हा सेनेकडे आहे. त्यामुळे या जागेवर शैला गोडसे यांची दावेदारी पक्की मानली जात आहे़ काँग्रेस-राष्ट्रवादीकडून विद्यमान आ. भारत भालके यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे त्यामुळे आता परिचारक गटाने काय करायचे? याबाबत कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमावस्था आहे़ वंचित आघाडीतर्फे प्रकाश आंबेडकर यांचे बंधू आनंदराज आंबेडकर यांच्या नावाची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये सुरू आहे.

डॉ़ जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांची प्रचाराची धुरा पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या नेतृत्वाखाली आ़ प्रशांत परिचारक, सेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख तानाजी सावंत, शैला गोडसे, जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे यांनी सांभाळली़ परिचारक यांना गेल्या विधानसभा निवडणुकीत निसटत्या मतांनी पराभव स्वीकारला होता़ त्यानंतरही त्यांनी विधानपरिषद, साखर कारखाने व अर्बन बँकेच्या माध्यमातून मतदारांशी संपर्क कायम ठेवला आहे़ सत्ताधारी पक्षाशी असलेले त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध यामुळे काही विकासाच्या योजना मार्गी लावल्याचा दावा करीत त्यांनी विधानसभेसाठी परिचारक कुटुंबातील कोण लढेल? हे सांगितले नसले तरी डॉ़ जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांच्या प्रचाराबरोबर स्वत:च्या प्रचाराची एक फेरीही पूर्ण केली.

भाजपच्या उमेदवाराचा प्रचार करीत असताना शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख शैला गोडसे यांनी अख्खा मतदारसंघ पिंजून काढला़ याचा फायदा भाजपला जेवढा होणार आहे, त्यापेक्षा कितीतरी पटीने त्यांना विधानसभेसाठी होणार आहे़ प्रचार लोकसभेचा असला तरी त्यांनी विधानसभा समोर ठेवूनच पंढरपूरसह मंगळवेढा तालुक्यातील गावागावांमध्ये शिवसेना-भाजप युती सरकारने गेल्या पाच वर्षांत राबविलेल्या विकास योजना, पाण्यासाठी केलेली आंदोलने व भविष्यात मार्गी लागणार असलेल्या योजना याची माहिती घराघरात पोहोचविली.

सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रचाराची धुरा आ़ भारत भालके यांनी एकहाती सांभाळली़ प्रचारादरम्यान सुशीलकुमार शिंदे लोकसभेसाठी तर विधानसभेसाठी आपण रिंगणात असल्याचे गृहीत धरून त्यांनी प्रचार केला़.

धनश्री परिवाराचे प्रमुख व दामाजीचे माजी चेअरमन शिवाजीराव काळुंगे यांनी मंगळवेढा तालुक्यात सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रचारासाठी आपली स्वतंत्र यंत्रणा राबवित आपणही विधानसभेसाठी काँग्रेसकडून इच्छुक असल्याचा संदेश मतदारांमध्ये दिला आहे़ त्यापूर्वी त्यांनी पंढरपूर येथील काही कार्यक्रमांना भेटी देत साखर पेरणी केली आहे.

मंगळवेढा तालुक्यात धनगर समाजाचे प्राबल्य जास्त असले तरी प्रकाश आंबेडकर, गोपीचंद पडळकर यांना मानणाºया बहुजन, मुस्लीम, धनगर समाजाची संख्या लक्षणीय आह़े़ या सर्व घटकातील प्रमुख नेत्यांनी प्रचाराची धुरा सांभाळल्याने विधानसभेला मात्र प्रकाश आंबेडकर यांचे बंधू आनंदराव आंबेडकर यांच्या नावाचीच सर्वाधिक चर्चा आहे.

मनसेच्या वतीने दिलीप धोत्रे हे सुद्धा शड्डू ठोकून तयार आहेत़ त्यांनी जरी लोकसभेसाठी स्वतंत्र यंत्रणा राबविली नसली तरी काँग्रेसचा अप्रत्यक्षपणे प्रचार केला आहे.

काळे यांचा डोळा माढा मतदारसंघावर
- सहकार शिरोमणी कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे यांनी माढा विधानसभेसाठीच भाजपमध्ये दाखल झाल्याची चर्चा कार्यकर्त्यांमधून आहे़ गत निवडणुकीत अपक्ष असतानाही त्यांना चांगले मताधिक्य मिळाले होते़ आता भाजपकडून उमेदवारी मिळाली तर त्यांचे प्राबल्य वाढण्याची शक्यता आहे़ त्यामुळे त्यांनी शेवटच्या क्षणी काँग्रेसला रामराम ठोकत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला़

Web Title: Bharat Bhalake, Prashant Parivarak, Godse's one complete farming

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.