सारे जमले मामांच्या मळ्यावर... बारामतीला आणायचं ताळ्यावर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2018 10:01 AM2018-11-05T10:01:06+5:302018-11-05T10:04:14+5:30

माढा लोकसभेला अकलूजकर अन् फलटणकरांच्या विरोधात आली खूप मोठी फौज एकत्र.

Baramati is in the process of bringing all the gathered maids ... | सारे जमले मामांच्या मळ्यावर... बारामतीला आणायचं ताळ्यावर !

सारे जमले मामांच्या मळ्यावर... बारामतीला आणायचं ताळ्यावर !

Next
ठळक मुद्देदिवाळीच्या पूर्वसंध्येला सुरुवात झाली राजकीय नेत्यांच्या आतषबाजीमाढा लोकसभेला अकलूजकर अन् फलटणकरांच्या विरोधात आली खूप मोठी फौज एकत्र

सचिन जवळकोटे 
सोलापूर : रविवारी वसूबारस. दिवाळीची सुरुवात जाहली. घरा-घरात पेटल्या पणत्या. अंगणा-अंगणात रंगल्या रांगोळ्या... पण याच दिवाळीच्या पूर्वसंध्येला सुरुवात झाली राजकीय नेत्यांच्या आतषबाजीला. माढा लोकसभेला अकलूजकर अन् फलटणकरांच्या विरोधात आली खूप मोठी फौज एकत्र. या राजनाट्याची मैफल रंगली रविवारी मध्यरात्री उशिरापर्यंत. तेही टेंभुर्णीत संजयमामांच्या मळ्यावर... त्यात ठरलं थोरले काका बारामतीकर अन् थोरले दादा अकलूजकर यांना आणायचं ताळ्यावर.

शनिवारी दुपारी म्हसवड, फलटण, सांगोला, बार्शी अन् माळशिरसच्या आलिशान गाड्या टेंभुर्णीच्या दिशेनं निघाल्या. सुरुवातीला म्हसवडमधली ‘जयाभाव’ची गाडी शिंगणापूर घाटातून खाली उतरून फलटणच्या गाडीची वाट पाहू लागली. तिकडून आली निंबाळकरांच्या ‘रणजितदादां’ची गाडी. यात होते दिगंबरही. (नेहमीप्रमाणं..)

यानंतर ‘जयाभाव’नी त्यांची गाडी स्वत: चालवत रणजितदादांशी केली माढा लोकसभेची चर्चा. रस्त्यातले खड्डे चुकवत केली राजकीय अडथळ्यांची चर्चा. बोलत बोलत दोघे टेंभुर्णीत पोहोचले. तिथं संजयमामा भेटले. बाकीची मंडळी यायला वेळ होता. तोपर्यंत बारामतीकरांना ताळ््यावर आणण्यासाठी सर्व ‘घड्याळ’ विरोधक एक झाले पाहिजेत, यावर या तिघांचं ठाम एकमत झालं अन् हाच सूर पकडून जवळपास सहा तास बैठक रंगली. 

पंढरपूरचे प्रशांतपंत वगळता बाकीच्यांची बैठक रंगली...

  • - इतर मंडळी येईपर्यंत जयाभाव अन् रणजितदादांना घेऊन संजयमामा इथल्याच जलाशयावर गेले. तिथल्या त्यांच्या आलिशान अन् महागड्या बोटीत या चौघांनी मस्त सफर केली. बोटीचं सारथ्य स्वत: मामांनी केलं. दोन रथी-महारथी मागं बसले. हे पाहून अनेकांना ‘कृष्णनीती’चीही आठवण आली. ‘कुणाला कसं बुडवायचं.. कुणाला कसं पाणी पाजायचं?’ याचीही छानपैकी या सर्वांनी पाण्यावरच्या सफरीत चर्चा केली. 
  • - अंधार झाला. सारे मामांच्या फार्म हाऊसवर आले. तोपर्यंत बाकीचीही मंडळी तिथं जमलेली. सांगोल्याचे शहाजीबापू, माळशिरसचे उत्तमराव अन् बार्शीचे राजाभाऊ आलेले. फक्त पंढरपूरचे प्रशांतपंत पालकमंत्र्यांच्या कार्यक्रमात अडकल्याने इच्छा असूनही येऊ शकले नाहीत. झालं... या साºयांची गुप्त मिटिंग सुरू झाली. चर्चेला वेगवेगळे विषय पुरविले जाऊ लागले. सोबतीला झणझणीत रस्साही ओढला जाऊ लागला. रात्री उशिरापर्यंत खलबतं रंगली. 

शहाजीबापू, उत्तमराव किंवा रणजितदादाच उमेदवार...

  • - संजयमामा, शहाजीबापू, उत्तमराव अन् राजाभाऊंच्या डोक्यात एकच नाव भिनलेलं.. ओन्ली अकलूजकर... तर जयाभाव अन् रणजितदादांच्या डोळ्यासमोर होते केवळ फलटणकर... कारण, शनिवारीच फलटणमध्ये दूध उत्पादकांच्या सोहळ्यात अनेकांनी ‘संजूबाबां’च्या नावाची माढ्यासाठी जाहीर वाच्यता केलेली. यात सोलापूर जिल्ह्यातीलही बरीच मंडळी जमलेली.
  • - ‘फलटणचे थोरले राजे विधान परिषदेत, तर संजूबाबा म्हणे आता लोकसभेत...,’अशी व्यवस्थित जुळणी फलटण पालिकेतल्या ‘पिटूबाबां’नी केलेली. हे ऐकून फलटणचे रणजितदादा दचकलेले, तर जयाभाव सटकलेले. काहीही करून यंदा अकलूज अन् फलटणच्या मनसबदारांची घराणेशाही सत्तेपासून दूर ठेवायचीच, याचा निर्धार संजयमामांच्या फार्म हाऊसवर केला गेला. 
  • - माढा लोकसभेला विजयदादा असतील किंवा रणजितदादा... रामराजे असतील किंवा संजीवराजे... पण आपल्याकडून एकच खमक्या उमेदवार देण्यावर या साºयांचं एकमत झालं. सुरुवातीला शहाजीबापू अन् उत्तमरावांच्या नावावर चर्चा झाली. या दोघांशिवाय फलटणच्या ‘रणजितदादां’च्या उमेदवारीवरही बरीच गणितं मांडली गेली. अखेर या तिघांपैकीच एक उमेदवार फायनल करायचं, यावर साºयांचं शिक्कामोर्तब झालं. ‘या ग्रुपचा पक्ष कोणता अन् चिन्ह कोणतं.. हे मात्र शेवटच्या क्षणी ठरवू या,’ म्हणत सारे बैठकीतून उठले. 
  • - रस्सा संपला, चर्चाही संपली. मामांच्या मळ्यातून बाहेर पडले. यावेळी कुणीतरी एक जण हळूच गुणगुणला, ‘मामाच्या मळ्यामंदी राजकारणाचं पाणी वाहतं... घड्याळाचे काटे मोडायला नवा गट फुलतो!’

Web Title: Baramati is in the process of bringing all the gathered maids ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.