Barabhugaon - Tempo collapsed in Agalgaon border on Barshi road, 14 workers injured | बाभुळगाव - बार्शी रोडवरील आगळगाव हद्दीत टेम्पो पलटी, १४ कामगार जखमी

ठळक मुद्दे जखमींना उपचारासाठी बार्शी येथील जगदाळे मामा रूग्णालयात दाखल याबाबत पांगरी पोलीसात नोंद करण्यात आलीटेम्पोवरील चालकाचा ताबा सुटल्याने अपघात झाला़


आॅनलाइन लोकमत सोलापूर
कुसळंब दि १ : बाभुळगाव बार्शी रोडवर आगळगाव हद्दीतून कामगारांना घेऊन जाणार टेम्पो चालकाने अतिवेगाने चालवून रोडच्या खड्यात आदळून टेम्पो पलटी होऊन १४ कामगार जखमी झाल्याची घटना ३१ डिसेंबर रोजी घडली़
        दिलीप नाना शिंदे यांनी याबाबत फिर्याद दिली आहे़ बाभुळगावहुन बार्शी येथे नायलन दोरी तयार करण्याच्या कारखान्यात कामासाठी निघालेल्या टेम्पोचा अपघात झाला आहे़ यात सुलन प्रभाकर माने, संगिता दत्तात्रय शिंदे (वय ४५), राजेंद्र बाबुराव शिंदे  (वय ३९) ,अश्विनी कुंदन गांधले (वय २५) ,शिल्पा मच्छिंद्र शिंदे  (वय ३५), लता सुनील धावारे ( वय ४०), सारिका तानाजी मोरे (वय ३०),उषा राजेंद्र शिंदे (वय ३५) ,पुनम दिनकर शिंदे (वय २५), पद्ममिनी दिलीप शिंदे  (वय ३०), रोहिनी भालचंद्र आडसुळ (वय ३०), प्रभाकर गोरबा माने (वय ५५), चंद्रकांत बिभीषण माने (वय ४०), जिजाबाई चंद्रकांत माने (वय ३४) सर्व रा.बाभुळगाव ता. बार्शी हे जखमी झाले आहेत़ बाभुळगांवहुन बार्शीकडे निघालेल्या टाटा कंपनीचा ४०७ मॉडेलचा टेम्पो क्रमांक एमएच १३ आर ०४८९ हे कामगार घेऊन जात होता़ यावेळी झिने वस्तीपासून दोन किमी अंतरावर आगळगांव शिवारात टेम्पोवरील चालकाचा ताबा सुटल्याने अपघात झाला़ या घटनेनंतर जखमींना उपचारासाठी बार्शी येथील जगदाळे मामा रूग्णालयात दाखल करण्यात आले़  याबाबत पांगरी पोलीसात नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोहेकॉ शैलेश चौगुले हे करीत आहेत.