In the bank of Pandharpur, nine lakh rupees have been deposited | पंढरपूर स्टेट बँकेत नऊ लाख रुपयांची रक्कम पळवली
पंढरपूर स्टेट बँकेत नऊ लाख रुपयांची रक्कम पळवली

ठळक मुद्देसी एम एस ही कंपनी रोज पंढरपूर शहरातील बँकांशी रुपयांची देवाण-घेवाण करतेदररोज प्रमाणे सीएमएस कंपनीचे कर्मचारी सौरभ सतीश हैंदरे (वय २६,रा. पंढरपूर) हे १८ लाख रुपये बॅगमध्ये घेऊन स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये भरण्यासाठी आले होते

पंढरपूर : भारतीय स्टेट बँकेच्या पंढरपूर शाखेतून अज्ञात चार ते सहा इसमांनी हात सफाई दाखवत ९ लाख रुपयांची रक्कम पळवल्याची घटना मंगळवारी दुपारी बारा वाजता घडली आहे.

सी एम एस ही कंपनी रोज पंढरपूर शहरातील बँकांशी रुपयांची देवाण-घेवाण करते. दररोज प्रमाणे सीएमएस कंपनीचे कर्मचारी सौरभ सतीश हैंदरे (वय २६,रा. पंढरपूर) हे १८ लाख रुपये बॅगमध्ये घेऊन स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये भरण्यासाठी आले होते.

१८ लाख पैकी ९ लाख रुपये बँकेच्या एका ट्रेमध्ये भरले व उर्वरित नऊ लाख रुपये बॅगमध्ये होते. ती बॅग अज्ञात चोरट्यांनी गर्दीचा फायदा घेत हातसफाई ने पळवून नेहली आहे. ही बाब लक्षात येताच सौरभ हैंदरे व स्टेट बँकेतील अधिकाऱ्यांनी व  कर्मचारी यांनी पोलिसांना खबर दिली. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत गोसावी, पोलीस उपनिरीक्षक रियाज मुलानी व पोलीस कर्मचारी बँकेत तपास करत आहेत.


Web Title: In the bank of Pandharpur, nine lakh rupees have been deposited
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.