आष्टीची नरभूमी आजही दुर्लक्षित, आष्टीच्या लढाईला २०० वर्षे पूर्ण, आष्टीकर जोपासताहेत खुणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2018 12:55 PM2018-02-20T12:55:37+5:302018-02-20T13:01:09+5:30

छत्रपती शिवाजी महाराज यांनी निर्माण केलेल्या स्वराज्याचे त्यांच्या मृत्यूनंतरही रक्षण करण्यासाठी अनेक शूर मावळे, सेनापती यांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले. इंग्रज व मराठे यांच्यात मोहोळ तालुक्यातील आष्टीत लढाई झाली.

Ashti's nephew still ignored, 200 years full of Ashti's war, marking Ashtikar | आष्टीची नरभूमी आजही दुर्लक्षित, आष्टीच्या लढाईला २०० वर्षे पूर्ण, आष्टीकर जोपासताहेत खुणा

आष्टीची नरभूमी आजही दुर्लक्षित, आष्टीच्या लढाईला २०० वर्षे पूर्ण, आष्टीकर जोपासताहेत खुणा

googlenewsNext
ठळक मुद्देइंग्रज व मराठे यांच्यात मोहोळ तालुक्यातील आष्टीत लढाई२० फेब्रुवारी १८१८ रोजी झालेल्या या लढाईला २०० वर्षे पूर्ण१६ नोव्हेंबर १८१७ च्या येरवडा येथील लढाईत  निष्क्रिय व उदासीन श्रीमंत दुसरे बाजीराव पेशवा यांचा पराभव झाला होता


महेश कोटीवाले
आॅनलाइन लोकमत सोलापूर
वडवळ दि २० : छत्रपती शिवाजी महाराज यांनी निर्माण केलेल्या स्वराज्याचे त्यांच्या मृत्यूनंतरही रक्षण करण्यासाठी अनेक शूर मावळे, सेनापती यांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले. इंग्रज व मराठे यांच्यात मोहोळ तालुक्यातील आष्टीत लढाई झाली. ही लढाई अजरामर करणाºया नरवीर बापू गोखले यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. २० फेब्रुवारी १८१८ रोजी झालेल्या या लढाईला २०० वर्षे पूर्ण झाली. आज या लढाईतील खुणा आष्टीकर ग्रामस्थ जोपासताना दिसतात; मात्र आष्टीची ही नरभूमी आजही दुर्लक्षित आहे.  
 अनेक इतिहासकार व संशोधकांनी आष्टीच्या लढाईचे वर्णन केले आहे. १६ नोव्हेंबर १८१७ च्या येरवडा येथील लढाईत  निष्क्रिय व उदासीन श्रीमंत दुसरे बाजीराव पेशवा यांचा पराभव झाला होता. तेथून त्यांचे पलायन सुरु होते; मात्र राजा खचला तरी त्यांचे सैन्य व सेनापती मात्र खचले नव्हते. मूठभर सैन्य घेऊन नरवीर बापू गोखले त्यांच्या सोबत होते. या सैन्याचा तळ मोहोळ तालुक्यातील आष्टी येथे पडल्यानंतर इंग्रज सैन्य जनरल स्मिथ येथे धडकले. प्रसंग बाका होता. पेशवे अजूनही संभ्रमात व गोंधळलेले होते; मात्र नरवीर बापू गोखले यांनी पेशव्यांना मी एकटाच इंग्रजांना सामोरे जाणार असून, लढताना मरण आले तर बहुमान, याउपर श्रीमंतांचे दर्शन झाले तर उत्तम; अन्यथा हे अंतिम दर्शन असे सांगून जनरल स्मिथच्या सैन्याशी मूठभर मराठे प्राणाची बाजी लावून लढले. घनघोर लढाई झाली. यात नरवीर बापू गोखले धारातीर्थी पडले.  त्यांच्यासोबत गोविंदराव घोरपडे, बहिरजी शितोळे, बाबर आदी मोहरे देखील गळून पडले.
आष्टी हे गाव पंढरपूरपासून २२ कि. मी. अंतरावर आहे. कैकाड्याची,बापू गोखल्यांची आष्टी या नावाने परिचित आहे. धूर्त इंग्रजांनी या लढाईनंतर येथील भूमीस महत्त्व प्राप्त होऊ नये व ऐतिहासिक महत्त्व कमी व्हावे म्हणून १८८८ मध्ये मोठे तळे खोदले. ही युद्धभूमी ओळखू येऊ नये याची काळजी घेतली. याच भूमीवर नरवीर बापू गोखले यांची समाधी होती का नाही याबाबत  निश्चित पुरावा अजून मिळाला नसला तरी येथे युद्ध संबंधी अनेक तलवारी, शस्त्रे यापूर्वी  सापडली असल्याचे येथील ग्रामस्थ सांगतात.
--------------------------
नरवीर बापू गोखलेंवर पुस्तक
- आष्टी येथील बुजुर्ग व अभ्यासू मंडळींनी येथील खुणा जपण्याचा प्रयत्न केला आहे आणि करताहेत. नूतन विद्यालय येथील उपक्रमशील शिक्षक व लेखक  संजय पाटील यांनी स्वत: संशोधन करून ‘अजरामर योद्धा: नरवीर बापू गोखले’ हे पुस्तक लिहिले आहे.  देवानंद पाटील, मदनसिंह पाटील, बाळासाहेब पाटील,राजाबापू  पाटील,खासेराव पाटील, शंकर माने,महादेव व्यवहारे, शाम कांबळे, वसुदेव व्यवहारे,सरपंच शैलेंद्र पाटील,  पं. स. सदस्य डॉ. प्रतिभा व्यवहारे,भीमराव पाटील,सज्जनराव पाटील, भजनदास व्यवहारे,काकासाहेब पाटील,संजय क्षीरसागर, जे. के. गुंड, विजय गुंड, तुकाराम माने, विलास पाटील आदी ग्रामस्थांनी विविध उपक्रम, कार्यक्रम आयोजित करुन या स्मृति तेवत ठेवण्यासाठी प्रयत्न केला आहे. आज गावात नूतन विद्यालयाचे नरवीर वसतिगृह, नरवीर तरुण मंडळ, नरवीर वाचनालय, नरवीर व्याख्यानमाला, नरवीर क्रीडा मंडळ  सुरु आहे. इतकेच नाही तर येथे बँक आॅफ इंडिया शाखा-नरवीर बापू गोखले आष्टी असे नाव आहे.
-----------------
आष्टीची लढाई
नरवीर बापू गोखले आणि इंग्रज यांच्यात आष्टीत येथे झालेल्या लढाईच्या ठिकाणी इंग्रजांनी इ. स. १८८८ साली खोदलेले तळे. 

Web Title: Ashti's nephew still ignored, 200 years full of Ashti's war, marking Ashtikar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.