नोकरीच्या अमिषाने मोहोळच्या मुख्याध्यापकाने केली १५ लाखांची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2017 04:59 PM2017-07-24T16:59:04+5:302017-07-24T16:59:04+5:30

-

Amishesh Mohall's headmaster hacked 15 lakhs fraud | नोकरीच्या अमिषाने मोहोळच्या मुख्याध्यापकाने केली १५ लाखांची फसवणूक

नोकरीच्या अमिषाने मोहोळच्या मुख्याध्यापकाने केली १५ लाखांची फसवणूक

Next


आॅनलाइन लोकमत सोलापूर
मोहोळ दि २४ : मोहोळ येथील नामांकित असलेल्या नागनाथ विद्यालयातील मुख्याध्यापकाने नोकरी लावण्याचे अमिष दाखवून १५ लाख रुपये घेऊन मागासवर्गीय महिलेची फसवणूक केल्याप्रकरणी मोहोळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत मोहोळ पोलिसांकडून मिळालेल्या माहिती नुसार मनीषा मनोहर केवळे (वय ३३ रा. सौंदने हल्ली राहणार मोहोळ) यांना मोहोळ येथील नागनाथ विद्यालयात शिक्षिका म्हणून कामाला लावतो व कायम करतो असे म्हणून मुख्याध्यापक बशीर बागवान यांनी १४ जून २०१० रोजी पासून त्यांच्याकडून रक्कम १५ लाख रुपये घेऊन १६ जून २०१७ पर्यंत मागील ७ वर्षे त्यांना कामावर घेऊन विना वेतन काम करण्यास भाग पाडून नोकरी (काम) करण्यास लावले व नंतर नोकरीवर येऊ नका असे सांगून कामावरून कमी करून त्यांची फसवणूक केल्या प्रकरणी नागनाथ विद्यालयाचे मुख्याध्यापक बशीर बागवान यांचे विरुद्ध गुन्हा मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि विक्रांत बोधे करीत आहेत.

Web Title: Amishesh Mohall's headmaster hacked 15 lakhs fraud

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.