अकलूजच्या ८ वर्षीय राजनंदिनीने सर केले "कलावंतीण" डोंगर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2019 10:50 AM2019-02-26T10:50:15+5:302019-02-26T10:51:14+5:30

अकलूज :- अत्यंत कठीण चढाई असलेले व सराईतानाही घाम फोडणारे कलावंतीण डोंगराचे शिखर अकलूजच्या राजनंदिनी जाधव या केवळ ८ ...

Akaluzz's 8-year-old Rajanandini sang "Kalavantin" mountain | अकलूजच्या ८ वर्षीय राजनंदिनीने सर केले "कलावंतीण" डोंगर

अकलूजच्या ८ वर्षीय राजनंदिनीने सर केले "कलावंतीण" डोंगर

Next
ठळक मुद्देबघता बघता राजनंदिनीने सुमारे २३५० फुटावरील त्या ध्वजाला हात लावून उभी राहिलीकेवळ ८ वर्षांच्या हिरकणीने सर केल्याने तेथे उपस्थित अनेक गियार्रोहकांच्या भुवया उंचावल्या

अकलूज :- अत्यंत कठीण चढाई असलेले व सराईतानाही घाम फोडणारे कलावंतीण डोंगराचे शिखर अकलूजच्या राजनंदिनी जाधव या केवळ ८ वर्षांच्या हिरकणीने सर केल्याने तेथे उपस्थित अनेक गियार्रोहकांच्या भुवया उंचावल्या.

 येथील विविध क्षेत्रात काम करणारे मात्र सकाळी मॉर्निंगओकच्या निमित्ताने काही मंडळीनी एकत्र येत मॉर्निंग ग्रुपची निर्मिती केली. त्या माध्यमातून ते दररोज सकाळी एकत्र येतात. त्यातून ते एकमेकांचे सुखदु:खाचे सहभागी होतात.सहकुटुंब ट्रिप,सह भोजने असे कार्यक्रम करतात.यातूनच त्यांनी आत्तापर्यंत कळसूबाई शिखरापासून ते सुमारे २० गडकिल्ले पाहिले आहेत. त्यांना आता या गडकिल्ल्यांचा छंद जडल्याने ते सतत नवीन काहीतरीच्या शोधात असताना त्यांना पनवेलशेजारी असणाऱ्या "कलावंतीण"डोंगराची माहिती मिळाली.   शिवाय या डोंगराची चढण अतिशय कठीण असल्याचे व शेवटच्या २० ते २५ फुटाच्या सुळक्यावर जाणे तर सहज शक्य नसल्याचे समजले.

त्यामुळे त्यांनी या डोंगराकडे आपला मोर्चा वळवला. या टीमसोबत राजेंद्र जाधव यांची केवळ ८ वर्षे वयाची मुलगी राजनंदिनी ही हट्ट करून निघाली. अखेर नाईलाज म्हणून सर्वांनी तिला बरोबर घेतले खरे परंतू तिने हा डोंगरही चढण्याचा हट्ट धरला. शेवटच्या २०/२५ फुटावरचा सुळकाही चढण्याचा व त्यावरील ध्वजाला हात लावून फोटो काढण्याचा तिने हट्ट धरलेला होता. वास्तविक त्या टप्प्यापर्यंत जाऊन अनेकजण थांबले असताना या चिमुकलीने असा हट्ट धरल्याने सगळेच अचंबित झाले. शेवटी नाईलाजाने तिला पुढील चढाईला परवानगी दिली आणि बघता बघता राजनंदिनीने सुमारे २३५० फुटावरील त्या ध्वजाला हात लावून उभी राहिली. तिचे हे साहस पाहुन पुण्या-मुंबईचे ट्रेकर हवालदिल झाले. पटापट फोटोसाठी त्यांचे मोबाईल कॅमेरे सरसावले. सगळ्यांनी तिचे कौतुक ही केले.

 ही बातमी समजताच अकलूजमधील अनेकांनी राजनंदिनीच्या घरी जाऊन तिचे कौतुक केले. शेवटी मॉर्निंग ग्रुपच्या वतीनेही शुभेच्छा देण्याचा कार्यक्रम झाला. यावेळी एस.के.कांबळे, बादशहा शेख, बाळासाहेब जाधव, संतोष जाधव, अमोल जवंजाळ, राहुल पवार, समीर देशमुख, डॉ.शिरीष रणवरे, डॉ.सुनील राऊत, महेश सूर्यवंशी, आप्पा अवघडे, कांतीलाल एकतपुरे, सुनील गायकवाड, सचीन एकतपुरे, बाबासाहेब फडके, सतीश वडतीले, हरिश्चंद्र पाटील, विश्वास शिनगारे, समाधान देशमुख, राहुल पवार, शंकर नायकुडे, आप्पा आवताडे, शेखर सावंत आदी उपस्थित होते.

Web Title: Akaluzz's 8-year-old Rajanandini sang "Kalavantin" mountain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.