सोलापूर - सोलापूर विद्यापीठाला शिवयोगी श्री सिद्धेश्वर विद्यापीठ नाव देण्यासंबंधीचा मागील 15 वर्षांपासून सर्व प्रथमपासून व प्रभावी लढा चालू आहे. सिद्धेश्वर भक्तांच्या भावनेचा विचार न करता धनगर आणि वीरशैव-लिंगायत समाजात भांडणे लावण्याच्या हेतूने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी दुपारी नागपूर येथील कार्यक्रमात विद्यापीठाला श्री सिद्धेश्वर नाव देण्याऐवजी अहिल्यादेवी होळकर नाव देण्याची घोषणा केली.

महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील सर्व शिवा संघटनेच्या मावळे या निर्णयाचा जाहीर निषेध करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे राज्यात ठिक ठिकाणी प्रतीकात्मक पुतळे जाळण्यात येणार आहेत. येणाऱ्या कालावधीत भाजपा सरकारला या निर्णयाची किंमत मोजावी लागेल, असे मत शिवा संघटनेचे संस्थापक प्रा. मनोहर धोंडे यांनी व्यक्त केले आहे.