शेतीचं सोडा, आम्हाला प्यायलाबी पाणी नाय; केंद्रीय दुष्काळ पथकासमोर शेतकºयांनी मांडली व्यथा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2018 03:53 PM2018-12-07T15:53:26+5:302018-12-07T15:55:30+5:30

मंगळवेढा : सततच्या दुष्काळाने येथील शेतकरी पूर्णपणे खचला आहे, खरीप-रब्बी दोन्ही हंगाम वाया गेले आहेत, चाºयाअभावी जनावरे कत्तलखान्याला जात ...

Agricultural Seed, We Do not Drink Water; The grievances raised by the farmer in front of the Central Drought Squad | शेतीचं सोडा, आम्हाला प्यायलाबी पाणी नाय; केंद्रीय दुष्काळ पथकासमोर शेतकºयांनी मांडली व्यथा

शेतीचं सोडा, आम्हाला प्यायलाबी पाणी नाय; केंद्रीय दुष्काळ पथकासमोर शेतकºयांनी मांडली व्यथा

googlenewsNext
ठळक मुद्दे खरिपाची पिके पूर्णपणे संपुष्टात आली आहेत़ पाण्याअभावी फळबागा, दुग्धव्यवसाय अडचणीतजनावरांना चारा व पिण्याचे पाणी देण्याबाबत शेतकºयांची मागणी रोजगार हमी योजना, शेततळी, जलयुक्त शिवार योजना याबाबतही माहिती नोंदवली

मंगळवेढा : सततच्या दुष्काळाने येथील शेतकरी पूर्णपणे खचला आहे, खरीप-रब्बी दोन्ही हंगाम वाया गेले आहेत, चाºयाअभावी जनावरे कत्तलखान्याला जात आहेत़ लाखो रुपये खर्चून उभारलेल्या बागा पाण्याअभावी जळून जात आहेत, शेती व्यवसाय धोक्यात आला आहे़ साहेब़़़ शेतीचे सोडा, प्यायलाबी पाणी मिळेनासे झाले आहे, अशी व्यथा शेतकºयांनी केंद्रीय समितीच्या पथकासमोर मांडली.

मंगळवेढा तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय समितीचे पथक आंधळगाव येथे पोहोचले. दुष्काळी समिती पथकाच्या अहवालानुसार सरकारी मदत मिळणार म्हणून अनेक शेतकरी सकाळी ७ वाजल्यापासून रस्त्याकडे टक लावून बसले होते़
पथकाने आंधळगाव येथे सीताराम वेळापुरे यांच्या खरिपातील जळालेल्या भुईमूग, ज्वारी या पिकांची पाहणी केली़ खरीप जळून गेले, रब्बी पेरणी झाली नाही़ शेतीला जोडधंदा असणारा दुग्धव्यवसाय चारा व पाण्याअभावी कोलमडला आहे़ पुढील पावसाळा येईपर्यंत पशुधन जगणे मुश्कील आहे, अशी व्यथा शेतकरी वेळापुरे यांनी पथक प्रमुखाकडे मांडली.

 केंद्रीय दुष्काळी पथकाचे प्रमुख सुभाषचंद्र मीना, सदस्य एम. जी. टेंभुर्णे, विजय ठाकरे यांनी सर्व शेतकºयांचे म्हणणे ऐकून घेतले. यावेळी पुणे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ़ राजेंद्र भारुड, कृषी सहसंचालक दिलीप झेंडे, अतिरिक्त जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, प्रांताधिकारी प्रमोद गायकवाड, उपजिल्हाधिकारी किशोर पवार, अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज बिराजदार, कृषी उपसंचालक रवींद्र माने, तहसीलदार आप्पासाहेब समिंदर, पं स. सभापती प्रदीप खांडेकर, प्रा़ शिवाजीराव काळुंगे, प्रा़ येताळा भगत, झेडपी सदस्या शैला गोडसे, तालुका कृषी अधिकारी नामदेवराव गायकवाड, शिवाजीराव नागणे, पांडुरंग भाकरे आदी उपस्थित होते़

पथकप्रमुखांनी प्रश्नोत्तरासह घेतली नोंद
- पथकप्रमुख मीना यांनी आंधळगाव येथे पाहणी करताना प्रश्नोत्तरासह मुद्दे नोंदविले़ खरिपाची पिके पूर्णपणे संपुष्टात आली आहेत़ पाण्याअभावी फळबागा, दुग्धव्यवसाय अडचणीत आला आहे जनावरांना चारा व पिण्याचे पाणी देण्याबाबत शेतकºयांची मागणी आहे. रोजगार हमी योजना, शेततळी, जलयुक्त शिवार योजना याबाबतही माहिती नोंदवली आहे. दरम्यान, शेतकºयांनी मांडलेल्या व्यथा अत्यंत भीषण आहेत़ शासनस्तरावर ही माहिती पोहोचवू शेतकºयांप्रति आपण अत्यंत संवेदनशील आहोत, असे केंद्रीय पथकातील सदस्यांनी सांगितले़

Web Title: Agricultural Seed, We Do not Drink Water; The grievances raised by the farmer in front of the Central Drought Squad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.