दीपक साळुंखे यांच्या स्पष्टीकरणानंतर राष्ट्रवादी घेणार निर्णय ! 'आॅडिओ क्लिप'प्रकरणी पक्षाकडून नोटीस जारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2018 04:06 PM2018-10-23T16:06:44+5:302018-10-23T16:09:45+5:30

मोतीराम चव्हाण यांचा शोध पोलिसांनी घ्यावा; दीपक आबांची मागणी.

After the clarification of Deepak Salunkhe Nationalist will decide! Issue of 'audio clips' notice issued by party | दीपक साळुंखे यांच्या स्पष्टीकरणानंतर राष्ट्रवादी घेणार निर्णय ! 'आॅडिओ क्लिप'प्रकरणी पक्षाकडून नोटीस जारी

दीपक साळुंखे यांच्या स्पष्टीकरणानंतर राष्ट्रवादी घेणार निर्णय ! 'आॅडिओ क्लिप'प्रकरणी पक्षाकडून नोटीस जारी

googlenewsNext
ठळक मुद्देपक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल,' असे खासदार सुप्रिया सुळेअद्याप तरी माझ्यापर्यत नोटीस पोहोचली नाही - दीपक साळुंखेमला बदनाम करणाºयांचे पितळ उघडे पाडेन - दीपक साळुंखे

सोलापूर  : अक्कलकोट तालुका राष्ट्रवादी महिला अध्यक्षांबद्दल  अश्लील भाषेत शिवीगाळ केल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे यांना पक्षाने नोटीस जारी केली आहे. 'याप्रकरणी साळुंखे यांच्याकडून स्पष्टीकरण आल्यानंतर पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल,' असे खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले आहे.  

दरम्यान, दिपक आबा 'लोकमत'शी बोलताना म्हणाले की, 'अद्याप तरी माझ्यापर्यत नोटीस पोहोचली नाही. ती मिळाल्यानंतर मी माझी बाजू सक्षमपणे मांडेन. मला बदनाम करणाºयांचे पितळ उघडे पाडेन. 

'ज्याच्या मोबाईलमधून ही आॅडिओ क्लिप व्हायरल झाली, तो मोतीराम चव्हाण कुठे आहे? हे विचारले असता दिपक आबा उसळून म्हणाले, 'ज्यांनी सोलापुरात पत्रकार परिषद घेऊन माज्यावर टीका केली, त्यांनाच विचारा. त्यांनीच कुठेतरी त्याला नेऊन ठेवले असेल. मोतीरामचा शोध आता पोलिसांनीच घ्यावा. वेळ पडली तर या प्रकरणाची सीआयडी चौकशीही व्हायला हवी.'

पुण्यात काय म्हणाल्या सुप्रिया सुळे ?

 महिला पदाधिकाºयाबद्दल अश्लील भाषा वापरल्याचे आॅडिओ क्लिप व्हायरल झाल्यावर राष्ट्रवादीचे सोलापूर जिल्ह्याध्यक्ष आणि माजी आमदार दीपक साळुंखे यांना पक्षाने नोटीस पटवून स्पष्टीकरण मागवल्याची माहिती खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे. महिला अत्याचाराच्या संदर्भात 'मी टू' मोहीम सोशल मीडियावर जोर झरत असताना राजकीय पक्षांचेही बुरखे फाटताना दिसत आहेत. त्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाही समावेश होण्याची शक्यता आहे.  
  
याबाबत अधिक माहिती अशी की, साळुंखे यांच्या नावाने एक आॅडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. त्यात अक्कलकोट भागातील पदाधिकाºयांच्या निवडीविषयी प्रश्न उपस्थित करण्यात आला, त्यावर बोलताना अत्यंत हिणकस भाषा वापरली गेली आहे. त्यात शरद पवार, स्थानिक नेते आणि महिला पदाधिकाºयांचा उल्लेख करत आपली मते मांडली आहेत. या क्लिपमुळे सोलापूरसह राष्ट्रवादीच्या गोटातही खळबळ उडाली आहे. मात्र आजपर्यंत पक्षातर्फे त्यावर काहीही प्रतिक्रिया देण्यात येत नव्हती. 

सुळे यांना पुण्यातील पत्रकार परिषदेत विचारले असता त्यांनी 'या विषयावर मी स्वत: प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासोबत बोलले आहे. त्यांचे स्पष्टीकरण आल्यावर निर्णय घेतला जाईल' अशी माहिती दिली. या विषयावर अधिक काहीही बोलण्यास त्यांनी असमर्थता दर्शवली. त्यामुळे या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या पावित्र्याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे .

Web Title: After the clarification of Deepak Salunkhe Nationalist will decide! Issue of 'audio clips' notice issued by party

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.