शाळेच्या पहिल्याच दिवशी ११ स्कूलबसवर झाली कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2019 01:20 PM2019-06-18T13:20:20+5:302019-06-18T13:22:14+5:30

सोलापूर उपप्रादेशिक परिवहन विभागाची मोहिम; मुले शाळेला सोडून बसचा घेतला ताबा

Action on 11 school buses on the first day of school | शाळेच्या पहिल्याच दिवशी ११ स्कूलबसवर झाली कारवाई

शाळेच्या पहिल्याच दिवशी ११ स्कूलबसवर झाली कारवाई

Next
ठळक मुद्दे७0 बसची तपासणी करण्यात आली, यात दोषी आढळलेल्या ११ बसवर कारवाईउपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय डोळे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर आणि जिल्हा अशा दोन पथकामार्फत अचानकपणे स्कूल बसची तपासणी करण्यात आलीसहा बसचालकांवर जागेवर दंड करून सोडून देण्यात आले तर ११ बस विविध ठिकाणी अडवून ठेवण्यात आल्या

सोलापूर : शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना शाळेत पोहचण्याची घाई झालेली असताना आरटीओच्या गाडीमुळे बसला ब्रेक लागला. विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासासाठी आरटीओने उघडलेल्या मोहिमेत सोमवारी ७0 बसची तपासणी करण्यात आली, यात दोषी आढळलेल्या ११ बसवर कारवाई करण्यात आली. 

आरटीओ कार्यालयाने गेल्या महिन्यात स्कूलबस तपासणी मोहीम राबविली होती. यात शाळांकडे असलेल्या बस नियमाप्रमाणे आहेत की नाहीत याची तपासणी करून प्रमाणपत्र देण्यात आले होते. तरीही अनेक चालकांनी बस तपासणी केलेली नव्हती. त्यामुळे परिवहन विभागाने शालेय समितीकडे बसच्या तपासणीबाबत कळविले होते. शाळेच्या पहिल्या दिवशी अघटीत घटना घडू नये यासाठी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय डोळे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर आणि जिल्हा अशा दोन पथकामार्फत अचानकपणे स्कूल बसची तपासणी करण्यात आली. शाळेकडे जाणाºया ७0 बस अडवून तपासणी केल्यावर १७ बस दोषी आढळल्या. सहा बसचालकांवर जागेवर दंड करून सोडून देण्यात आले तर ११ बस विविध ठिकाणी अडवून ठेवण्यात आल्या. 

शहरासाठी मोटार वाहन निरीक्षक यु. बी. राठोड, एस. डी. खाडे, जे. एम. मोरे, व्ही. आर. चौधरी, आशिश पराशर, एस. पी. पाटील, ए. बी. खेनट, सहायक एस. एस. चव्हाण, एम. टी. हजारे, एस. बी. पाटील. पी. एल. यादव यांच्या पथकाने ठिकठिकाणी थांबून बसची तपासणी केली. भरारी पथकाचे मोटार वाहन निरीक्षक ए. डी. गुरव, अजित ताम्हणकर, सहायक  एन. बी. शिंदे, एन. आर. जगदाळे, एस. एन. डुकरे, एस. एस. ठोंबरे, ए. एम. भागवत, विजय लोखंडे, प्रशांत भांगे यांच्या पथकाने पंढरपूर, मोहोळ, मंगळवेढा, मंद्रुप, बार्शी, अक्कलकोट येथे तपासणी केली. 

स्कूलबससाठीही सुरक्षा आवश्यक
- स्कूलबस नियमानुसार आहे की नाही याची आरटीओच्या पथकाने तपासणी केली. कागदपत्रांमध्ये बसचे फिटनेस, विमा, चालकाचा वाहन परवाना, स्कुल बसची नियमावली: बसचा रंग पिवळा आहे की नाही, बसमध्ये विद्यार्थी सुरक्षेसाठी सहायक आहे काय, परमीट भरलेले आहे काय, बसच्या पायरीची उंची, बाहेर पडण्याचा मार्ग, सेफ्टी बार, रिफ्लेक्टर, प्रथमोपचार पेटी, आग प्रतिबंधक यंत्राची व्यवस्था या बाबी तपासण्यात आल्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी डोळे यांनी सांगितले. स्कूलबस व रिक्षातून होणारी वाहतूक तपासण्यात आली. अचानकपणे अशी मोहीम सुरू राहणार आहे. 

Web Title: Action on 11 school buses on the first day of school

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.