भाजपा सरकारवरही शेतकºयांचा विश्वास राहिला नाही म्हणून देशात शेतकºयांचा दबाव गट निर्माण करणार, खासदार राजू शेट्टी यांची सोलापूरात माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2018 12:50 PM2018-02-17T12:50:06+5:302018-02-17T12:52:49+5:30

भाजपा सरकारवरही शेतकºयांचा विश्वास राहिला नाही, २०१९ पर्यंत देशात शेतकºयांचा दबाव गट तयार करावा लागेल. आगामी लोकसभा निवडणुकीत संपूर्ण कर्जमाफी देणाºयासोबत शेतकरी संघटना राहील असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

In the absence of farmers' faith in the BJP government, the pressure group of farmers in the country will be formed, MP Raju Shetty has information in Solapur. | भाजपा सरकारवरही शेतकºयांचा विश्वास राहिला नाही म्हणून देशात शेतकºयांचा दबाव गट निर्माण करणार, खासदार राजू शेट्टी यांची सोलापूरात माहिती

भाजपा सरकारवरही शेतकºयांचा विश्वास राहिला नाही म्हणून देशात शेतकºयांचा दबाव गट निर्माण करणार, खासदार राजू शेट्टी यांची सोलापूरात माहिती

googlenewsNext
ठळक मुद्देदेशभरातील १९१ शेतकरी संघटना प्रथमच शेतकºयांच्या प्रश्नावर एकत्र आल्याकारखानदार व व्यापारी शेतकºयाला टोपी घालत असताना सरकार गप्प असल्याचा आरोप त्यांनी केला.मागील दोन महिन्यात साखर विक्री करणाºयांची व साखर खरेदी करणाºयांची चौकशी केली तर सत्य समोर येईल असे खा. शेट्टी म्हणाले.


आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि १७ : भाजपा सरकारवरही शेतकºयांचा विश्वास राहिला नाही, २०१९ पर्यंत देशात शेतकºयांचा दबाव गट तयार करावा लागेल. आगामी लोकसभा निवडणुकीत संपूर्ण कर्जमाफी देणाºयासोबत शेतकरी संघटना राहील असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
देशभरातील १९१ शेतकरी संघटना प्रथमच शेतकºयांच्या प्रश्नावर एकत्र आल्या असून कारखानदार व व्यापारी शेतकºयाला टोपी घालत असताना सरकार गप्प असल्याचा आरोप त्यांनी केला. साठा मर्यादा उठविल्यानंतर साखरेचे भाव पडण्यास सुरुवात झाली, साखर दराचा ऊस उत्पादकांना ना ग्राहकांना फायदा झाला, केवळ दलालांना फायदा झाला, दुबळ्या सरकारने अशा दलालांना सहकार्य केले, या साखळीचा शोध घेण्यासाठी सखोल चौकशीची  मागणी करणार असल्याचे स्वाभिमानीचे खा. राजू शेट्टी यांनी पत्रकारांशी बोलताना केला. देशाच्या उत्तर भागातील कारखानदार व महाराष्टÑातील कारखानदार दर कमी करण्याच्या प्रश्नावर एकमेकांकडे बोट करतात, साखर मर्यादा उठविल्यानंतर दर स्थिर राहण्याऐवजी ५०० रुपयाने कोसळल्याचा आरोप खा. शेट्टी यांनी केला. शासनावर साखर व्यवहाराबाबत संशय असल्याचे त्यांनी सांगितले.  मागील दोन महिन्यात साखर विक्री करणाºयांची व साखर खरेदी करणाºयांची चौकशी केली तर सत्य समोर येईल असे खा. शेट्टी म्हणाले.
-------------------
मतदारसंघ आमचाच...
- जिल्हाध्यक्ष महामुद पटेल व अन्य नेत्यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून रविकांत तुपकर यांना उमेदवारी देण्याची मागणी केली होती, यावर खा. शेट्टी यांनी माढा मतदारसंघ आमचाच राहणार असल्याचे सांगितले. 

Web Title: In the absence of farmers' faith in the BJP government, the pressure group of farmers in the country will be formed, MP Raju Shetty has information in Solapur.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.