सोलापूर जिल्ह्यातील २६ साखर कारखाने सुरू, यंदाच्या हंगामात ५ लाख ६२ हजार लाख मे़टन ऊसाचे झाले गाळप

By लोकमत न्यूज नेटवर्क on Fri, November 10, 2017 1:14pm

ऊसदराची निश्चिती अद्याप झाली नसली तरी सोलापूर जिल्ह्यातील २६ साखर कारखाने आता पूर्ण क्षमतेने सुरू झाले असून, त्यांनी गुरुवारपर्यंत एकूण ५ लाख ६२ हजार ३६७ लाख मेट्रिक टन गाळप केले आहे.

आॅनलाइन लोकमत सोलापूर सोलापूर दि १० : ऊसदराची निश्चिती अद्याप झाली नसली तरी सोलापूर जिल्ह्यातील २६ साखर कारखाने आता पूर्ण क्षमतेने सुरू झाले असून, त्यांनी गुरुवारपर्यंत एकूण ५ लाख ६२ हजार ३६७ लाख मेट्रिक टन गाळप केले आहे.  तीन साखर कारखाने सुरू होणे बाकी आहेत. सध्या ऊसदराचा विषय ऐरणीवर असला तरी सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी धाडसाने कारखाने सुरू केले आहेत. एकीकडे शेतकरी संघटना आंदोलनाची भाषा करीत आहे तर दुसरीकडे शेतकºयांना ऊस घालण्याची चिंता आहे. याशिवाय शेतकरी संघटनेचे नेते खा. राजू शेट्टी यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील ऊसदराचा प्रश्न मार्गी लावल्याने व सदाभाऊ खोत मंत्री असल्याने आंदोलनाची धार पूर्वीसारखी राहिली नसल्याचे दिसून येत आहे. सोलापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर ऊस असल्याने व यावर्षी जून महिन्यात चांगला पाऊस पडल्याने उसाची वाढ चांगली झाल्याने यावर्षी एकरी अधिक उतारा पडू लागल्याने शेतकºयांनाही ऊस घालण्याची चिंता आहे. यावर्षी जवळपास १० साखर कारखाने बंदच राहण्याची शक्यता आहे. गुरुवारपर्यंत २६ साखर कारखान्यांनी ५ लाख ६२ हजार ३६७ लाख मेट्रिक टन गाळप झाले होते. ---------------- मेट्रिक टन गाळप कारखाने... लोकमंगल बीबीदारफळ- १० हजार ५११ लाख मे.टन, लोकमंगल भंडारकवठे- ४ हजार ८८५ लाख मे.टन, लोकनेते- ४३ हजार ७१४ मे.टन., भीमा- १८ हजार ८८० मे.टन., चंद्रभागा- १५,५०२ मे.टन., विठ्ठल गुरसाळे- ६१५५ मे.टन., विठ्ठलराव शिंदे- एक लाख ४ हजार ४७७ मे.टन., सासवड माळी शुगर- २५ हजार ६० मे. टन., सहकार महर्षी- ६१,७५७ मे.टन., पांडुरंग श्रीपूर- ५००० मे.टन., सिद्धेश्वर- ३,५०० मे.टन., मकाई करमाळा- ७ हजार ५६० मे.टन., आदिनाथ- ९,४१९ मे.टन., संत दामाजी- १०,६७० मे.टन., विठ्ठल शुगर म्हैसगाव- १०,२९२, सिद्धनाथ तिºहे- ११,६९० मे.टन., जकराया शुगर- १३,९०० मे.टन., इंद्रेश्वर बार्शी- ३१ हजार ५० मे.टन., भैरवनाथ विहाळ- ३१, ३७० मे.टन., फॅबटेक शुगर- १७,८८५ मे.टन., युटोपियन- २७,८५० मे.टन., भैरवनाथ लवंगी- १४,९२० मे.टन., बबनराव शिंदे शुगर- १८,१६० मे.टन., जयहिंद शुगर- २५ हजार मे.टन., शंकररत्न आलेगाव- २४,५७० मे.टन., गोकुळ शुगर धोत्री- ७७९० मे.टन. 

संबंधित

जाती नष्ट करा, आम्ही आरक्षण मागणार नाही- रामदास आठवले
बारावीचा इंग्रजीचा पेपर तासाभरातच फुटला; माहिती देणाऱ्या तरुणाचे अपहरण
शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांची विमानातून सहल; शाळेचा अभिनव उपक्रम
पुणे-सोलापूर हायवेवर अपघात; 11 जण जखमी, चौघांची प्रकृती गंभीर
दशक्रिया विधीसाठी निघालेल्या आई - मुलाचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

सोलापूर कडून आणखी

कुर्डूृवाडीत रेल्वे प्रवासी कोच बनविण्याचा कारखाना सुरू करण्याची आ़ बबनराव शिंदे यांची मागणी, शरद पवार यांच्या मध्यस्थीने रेल्वे मंत्र्यांना भेटणार
पंढरपूरातील चंद्रभागेतील मैलामिश्रित पाणी प्रकरणावरून हिंदुत्ववादी संघटना आक्रमक, मुख्याधिकाºयांना घातला घेराव 
रेडिरेकनर दर मनपा हिताविरोधी असल्यामुळे सोलापूर महापालिका सभेने गाळ्याबाबत केलेला ठराव फेटाळला
शेतकºयांच्या कर्जमाफीसाठी सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेला मिळाले ३२१ कोटी, ‘यलो’ यादीतील पात्र २३३४ शेतकºयांची यादी यापूर्वीच शासनाकडे
सांगोला तालुक्यातील १८ बंधारे कोरडे ठणठणीत, पाण्याची गळती रोखण्यात प्रशासनाला आले अपयश

आणखी वाचा