करवसुली विशेष मोहिमेत सोलापूर महानगरपालिकेच्या तिजोरीत १५ कोटी जमा, दंडमाफीची सवलत संपली, वसुली सुरूच राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क on Tue, January 02, 2018 1:26pm

मनपाने थकीत मिळकतकर वसुलीसाठी राबविलेल्या विशेष मोहिमेत १४ कोटी ९८ लाख रुपये मनपाच्या तिजोरीत जमा झाले आहेत.

आॅनलाइन लोकमत सोलापूर सोलापूर दि २  : मनपाने थकीत मिळकतकर वसुलीसाठी राबविलेल्या विशेष मोहिमेत १४ कोटी ९८ लाख रुपये मनपाच्या तिजोरीत जमा झाले आहेत.  १५ डिसेंबरपासून मिळकतकराची थकबाकी वसुली मोहीम सुरू करण्यात आली होती. यात पाच प्रमुख विभागीय पथकांमध्ये ४५८ कर्मचाºयांनी कर वसुलीची मोहीम राबविली. हे कर्मचारी ५२ छोट्या गटांमार्फत झोनमध्ये जाऊन वसुलीच्या कामाला लागले होते. शेवटच्या दिवशी कोणतीही विश्रांती न घेता कर्मचाºयांनी वसुली मोहीम राबविली. यात शहर विभागात ९५ लाख १७ हजार ६९0 रुपये रोख तर ३४ लाख ६९ हजार २५१ रुपये धनादेशाद्वारे जमा करण्यात आले. हद्दवाढ विभागात ८७ लाख ४४ हजार ८२0 रुपये रोख तर १२ लाख ७२ हजार ९९६ रुपये धनादेशाद्वारे जमा करण्यात आले. थकबाकी न भरणाºयांचे ९ नळ तोडण्यात आले तर १ मिळकत सील करण्यात आली.    १५ ते ३0 डिसेंबरच्या कालावधीत राबविलेल्या मोहिमेत शहर विभागातून रोख ५ कोटी ५२ लाख २७ हजार ९0४ रुपये तर २ कोटी ३७ लाख ७४ हजार ३0२ रुपये धनादेशाद्वारे जमा झाले. हद्दवाढ भागातून ५ कोटी ४३ लाख ७३ हजार १८७ रुपये रोख तर १ कोटी ६४ लाख ६८ हजार ९७२ रुपये धनादेशाद्वारे जमा झाले. अशाप्रकारे शहरातून ७ कोटी ९0 लाख २ हजार २0६ तर हद्दवाढ विभागातून ७ कोटी ८ लाख ४२ हजार १५९ रुपये असे एकूण १४ कोटी ९८ लाख ४४ हजार ३६५ रुपये मनपाच्या तिजोरीत जमा झाले. मोहिमेत थकबाकी न भरणाºयांचे शहरी विभागात १७९ व हद्दवाढमध्ये ८३ असे २६२ जणांचे नळ तोडण्यात आले तर दोन्ही विभागात मिळून ३८ मिळकती सील करण्यात आल्या.    ----------------- दंड,व्याजाची सवलत संपली - मोहीम काळात दंड व व्याज आकारणीत एक टक्का सवलत देण्यात आली होती. १ जानेवारीपासून ही सवलत बंद करण्यात आल्याचे उपायुक्त त्रिंबक ढेंगळे—पाटील यांनी सांगितले. विविध विषयांच्या बैठकांसाठी आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे हे मुंबईत आहेत. करवसुलीसाठी मोहिमेसाठी घेण्यात आलेले २00 कर्मचारी त्यांच्या कामाच्या ठिकाणी आजपासून रुजू झाले आहेत. त्यामुळे त्यांच्या विभागातील खोळंबलेली कामे मार्गी लागणार आहेत; मात्र करसंकलन विभागाच्या कर्मचाºयांवर वसुली मोहीम कायम ठेवण्यात येणार आहे. 

संबंधित

सोलापूर जिल्ह्यात पाणलोटच्या कामास कृषी खात्याचा निरुत्साह, दोन वर्षात दोन कोटी खर्च तर साडेचार कोटी शिल्लक: खर्च होत नसल्याने दुसरीकडे वर्ग 
रविवारपासून सोलापूर शहराला चार दिवसाआड पाणीपुरवठा, उजनीतून पाणी सोडले
सोलापूर जिल्हा न्यायालयातील फौजदारी खटल्यात शिक्षेचे प्रमाण वाढले, माहिती अधिकारात सत्यता उघड
 ६९२ कोटी पाणीपुरवठा योजना लावणार मार्गी, महापौर शोभा बनशेट्टी यांची माहिती, मंत्र्यांसाठी बेरिया यांनी हार तयार ठेवावेत !
सोलापूरातील मार्कंडेय जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम, शनिवारी पालखी सोहळा, आठवडाभर धार्मिक उत्सव

सोलापूर कडून आणखी

सोलापूर जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेसचा जीएसटी कार्यालयावर मोर्चा
प्रत्येक भाविक विठ्ठला समान, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांचे मत, पंढरपूरातील विठ्ठलासह संत चोखांबाचे दर्शन घेतले
पंढरपूर शहरात १० हजार कापडी पिशव्या वाटपाचा शुभारंभ, स्वच्छ सर्वेक्षण अभियानासाठी सहकार्य करा, आ़ प्रशांत परिचारक यांचे आवाहन
 ६९२ कोटी पाणीपुरवठा योजना लावणार मार्गी, महापौर शोभा बनशेट्टी यांची माहिती, मंत्र्यांसाठी बेरिया यांनी हार तयार ठेवावेत !
सोलापूरातील मार्कंडेय जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम, शनिवारी पालखी सोहळा, आठवडाभर धार्मिक उत्सव

आणखी वाचा