मैं वापस आऊंगा... जवानाचं गाणं ऐकून नेटकरी भारावले, लष्कराच्या धैर्याला केला सलाम!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2019 06:05 PM2019-01-14T18:05:40+5:302019-01-14T18:09:04+5:30

भारतीय जवान अहोरात्र सीमेवर उभे राहून आपलं रक्षण करतात म्हणूनच आपण घरामध्ये शांतपणे झोपू शकतो. जवान आपल्या रक्षणासाठी अनेक गोष्टींचा त्याग करत असतात.

Watch viral video bsf soldier singing sandese aate hain twitter reactions | मैं वापस आऊंगा... जवानाचं गाणं ऐकून नेटकरी भारावले, लष्कराच्या धैर्याला केला सलाम!

मैं वापस आऊंगा... जवानाचं गाणं ऐकून नेटकरी भारावले, लष्कराच्या धैर्याला केला सलाम!

googlenewsNext

भारतीय जवान अहोरात्र सीमेवर उभे राहून आपलं रक्षण करतात म्हणूनच आपण घरामध्ये शांतपणे झोपू शकतो. जवान आपल्या रक्षणासाठी अनेक गोष्टींचा त्याग करत असतात. हेही तितकचं सत्य आहे. आर्मीचे जवान आपल्या घरापासून दूर असतात. सीमेवर असताना त्यांचं देशप्रेमच त्यांच्यासाठी सर्वस्व असतं. सध्या इंटरनेटवर एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. सिमा सुरक्षा दलाचे (बीएसएफ) सुरेंद्र सिंग हे या व्हिडीओमध्ये एक गाणं गात आहेत. त्यांच्या आवाजातील गाणं ऐकून नेटकरी मंत्रमुग्ध झाल्याचे पाहायला मिळत आहे. 



 

सुरेंद्र सिंग गात असलेलं गाणं 'बॉर्डर' चित्रपटातील 'संदेसे आते है, हमें तडपाते है' हे गाणं आहे. त्यांचा हा व्हिडीओ बीएसएफच्या कॅन्टीनमध्ये शूट करण्यात आला आहे. सुरेंद्र सिंग यांच्यावर सोशल मीडियातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. सुरेंद्र सिंग यांनी गेल्या वर्षीच 'इंडियन आयडॉल'च्या 10 व्या पर्वासाठी ऑडिशन दिले होते. त्यावेळीही त्यांनी हेच गाणं गायले होते. 

तसं पाहायला गेलं तर चित्रपटामध्ये तर 'बॉर्डर' चित्रपटातील हे गाणं आपण बऱ्याचदा ऐकलं आहे. पण या व्हिडीओमध्ये स्वतः एक जवान हे गाणं गात असल्यामुळे त्यांच्या भावना फारच प्रभावीपणे सर्वांपर्यंत पोहोचत आहेत. सुरेंद्र सिंग यांच्या गाण्याने मंत्रमुग्ध झालेल्या नेटकऱ्यांनी कौतुकास्पद प्रतिक्रिया दिल्या आहेत. पाहूयात काही प्रतिक्रीया :



 



 



 



 

ओरिजनल गाणं :

Web Title: Watch viral video bsf soldier singing sandese aate hain twitter reactions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.