गणिताच्या 'या' समीकरणाने नेटकरी झाले हैराण; तुम्ही सांगू शकता प्रश्नाचं उत्तर?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2019 04:50 PM2019-07-16T16:50:17+5:302019-07-16T16:51:08+5:30

काही दिवसांपूर्वी असचं एक कोडं सोशल मीडियावर व्हायरल झालं होतं. हे कोडं पाहून भल्याभल्यांची भंबेरी उडाली होती. कसलं होतं हे कोडं माहीत आहे? हे कोडं म्हणजे, गणितातील एक समीकरण होतं.

Viral maths equation has left netizens scratching their heads can you solve it | गणिताच्या 'या' समीकरणाने नेटकरी झाले हैराण; तुम्ही सांगू शकता प्रश्नाचं उत्तर?

गणिताच्या 'या' समीकरणाने नेटकरी झाले हैराण; तुम्ही सांगू शकता प्रश्नाचं उत्तर?

googlenewsNext

इंटरनेवर प्रत्येक सेकंदाला काहीना काही व्हायरल होत असतं. त्यामध्ये अनेक व्हिडीओ, फोटो, पझल्स किंवा काही कोडी व्हायरल होत असतात. काही दिवसांपूर्वी असचं एक कोडं सोशल मीडियावर व्हायरल झालं होतं. हे कोडं पाहून भल्याभल्यांची भंबेरी उडाली होती. कसलं होतं हे कोडं माहीत आहे? हे कोडं म्हणजे, गणितातील एक समीकरण होतं. आपल्यापैकी बऱ्याचजणांचा गणिताशी छत्तीसचा आकडा असतो. अशातच अशी कोडी म्हणजे, डोक्याला तापचं, असं म्हणायला हरकत नाही. सोशल मीडियावर व्हायरल होणारा गणिताचा फॉर्म्युला केजी चीथम नावाच्या एका ट्विटर यूजरने समीकरण लोकांसमोर मांडून त्याचं उत्तर मागितलं. यूजरने सांगितलेलं हे समीकरण सोडवताना नेटकऱ्यांची अगदी दैना झाली होती. 


तुम्हीही हैराण झालात ना?, जर तुम्हाला गणितातील 'BODMAS'चा नियम माहित असेल तर तुम्ही हे गणित चुटकीसरशी सोडवू शकाल. ट्विटर यूजरने मांडलेल्या समिकरणामध्ये गणिताच्या नियमानुसार सर्वात आधी गुणाकार आणि त्यानंतर आलेल्या उत्तरातून वजाबाकी करायची आहे. म्हणजेच, '230 - 220 x 0.5 =?' या समीकरणात सर्वात आधी '220 x 0.5 =110' गुणाकार करून त्याचं आलेलं उत्तराला 230 मधून वजा करायचं आहे. '230 - 110 = 120' म्हणजेच, गणिताच्या नियमांनुसार, या समीकरणाचं उत्तर 120 आहे. पण हे समीकरण ट्विट करणाऱ्या यूजरने त्यामध्ये सांगितलं की, याचं उत्तर '5!' असणं गरजेचं आहे. यूजरच्या या वाक्यामुळे अनेकजण हैराण झाले. सर्व उपाय करून कंटाळले पण उत्तर काही मिळेना. 

दरम्यान, ही पोस्ट आतापर्यंत 30 हजार पेक्षा जास्त लोकांना रिट्विट केली आहे. तर यापेक्षा दुप्पट लाइक्स मिळाले आहेत. एवढचं नाही तर काही लोकांनी या पोस्टवर काही कमेंट्सही केल्या आहेत...

काही यूजर्सच्या कमेंट्स : 




पण काही गणितातील किड्यांना याचं उत्तर शोधायला फारसा वेळ लागला नाही. खरं तर याचं उत्तर अगदी सोपं होतं, ते समजून घेण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला 5 या नंबरपुढे असलेल्या चिन्हावर लक्ष केंद्रित करावं लागेल. अनेकांना हे exclamation mark वाटेल पण गणितात हे चिन्ह फॅक्‍टोरियल (factorial) म्हणून वापरतात. म्हणजेच, ज्या संख्येपुढे हे चिन्ह दिलेलं असेल त्या संख्येपुढिल सर्व संख्यांचा उतरत्या क्रमाने गुणाकार करावा. म्हणजेच,  '5 x 4 x 3 x 2 x 1=120' 




वाचा आणखी काही व्हायरल स्टोरी : 

Web Title: Viral maths equation has left netizens scratching their heads can you solve it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.