Video : पहिल्यांदा एअरपोर्टवर गेल्यावर तुमच्यासोबतही असंच झालं होतं का?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2019 01:33 PM2019-07-17T13:33:40+5:302019-07-17T13:34:33+5:30

अनेकांना कुठे काय करायचं किंवा कुठून कुठे जायचं हे माहीत नसतं. असाच एक मजेदार व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे.

Video : Women flyer boards airport conveyor belt thinking it will take her to the aircraft | Video : पहिल्यांदा एअरपोर्टवर गेल्यावर तुमच्यासोबतही असंच झालं होतं का?

Video : पहिल्यांदा एअरपोर्टवर गेल्यावर तुमच्यासोबतही असंच झालं होतं का?

googlenewsNext

पहिल्यांदाच एअरपोर्टवर गेल्यावर काही लोकांसोबत काही विचित्र घटना घडतात. तुमच्यासोबतही काहीना काही घडलं असेलच. म्हणजे चेंजिंगपासून ते विमानापर्यंत पोहोचेपर्यंत वेगवेगळ्या गोष्टींचा सामना करावा लागतो. अनेकांना कुठे काय करायचं किंवा कुठून कुठे जायचं हे माहीत नसतं.

असाच एका व्हिडीओ सध्या सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला तुमच्यासोबत असं काही घडू नये असंच वाटेल. हा व्हिडीओ इस्तांबुल एअरपोर्टचा आहे. एक महिला प्रवाशी विमानापर्यंत पोहोचण्यासाठी चक्क सामान घेऊन जाणाऱ्या कन्वेअर बेल्टवर चढली.


असे सांगितले जात आहे की, महिलेला वाटले की, कन्वेअर बेल्ट हा विमानापर्यंत जाण्यासाठीच आहे. त्यामुळे ती त्यावर चढली. पण जशी ती त्या बेल्टवर चढली, तिचा तोल गेला आणि ती पडली. हे पाहून लगेच एअरपोर्ट स्टाफने तिची मदत केली. यावर सोशल मीडियातून अनेक मजेदार रिप्लाय मिळत आहेत. 






Web Title: Video : Women flyer boards airport conveyor belt thinking it will take her to the aircraft

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.