मायकल जॅक्सनचं ४५ डिग्री झुकण्याचं गुपित, शूजमध्ये होती ही व्यवस्था!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2018 04:16 PM2018-08-31T16:16:21+5:302018-08-31T16:19:44+5:30

जेव्हा पहिल्यांदा तुम्ही मायकल जॅक्सनला डान्स करताना पाहिला असेल तेव्हा अनेकांना वाटलं असेल की, यात काही Visual Effect चा वापर केला असावा.

Secret behind Michael Jackson's gravity-defying dance move | मायकल जॅक्सनचं ४५ डिग्री झुकण्याचं गुपित, शूजमध्ये होती ही व्यवस्था!

मायकल जॅक्सनचं ४५ डिग्री झुकण्याचं गुपित, शूजमध्ये होती ही व्यवस्था!

जेव्हा पहिल्यांदा तुम्ही मायकल जॅक्सनला डान्स करताना पाहिला असेल तेव्हा अनेकांना वाटलं असेल की, यात काही Visual Effect चा वापर केला असावा. असं कसं कुणी पुढच्या बाजून ४५ डिग्रीच्या अॅंगलपर्यंत वाकू शकतं. पण नंतर हे याबाबत खुलासा झाला की, मायकल खरंच ४५ डिग्रीच्या अॅंगलपर्यंत वाकतो. 

मायकल जॅक्सनला त्याच्या गाण्यांमुळे किंग ऑफ पॉप म्हटलं जात होतं आणि डान्सच्या माध्यमातून त्याने चाहत्यांच्या मनात घर केलं होतं. मायकल जॅक्सनने दिलेला 'Moon Walk'  आणि 'Anti-Gravity' डान्स स्टेप आज मिसाल बनली आहे. तुम्हीही कधीना कधी पाय मागच्या बाजूने घासत Moon Walk करण्याचा प्रयत्न केला असेल. पण Anti-Gravity स्टेप करण्याची हिंमत झाली नसेल.

Anti Gravity चं गुपित

१९८७ मध्ये रिलीज झालेल्या स्मूथ क्रिमिनल मध्ये मायकल जॅक्सन पहिल्यांदा ४५ डिग्रीच्या अशांत वाकताना दिसला. एक सर्वसामान्य माणून फार फार २० डिग्री वाकू शकतो. ज्यांच्या पायांच्या मांसपेशी फार जास्त मजबूत आहेत ते जास्तीत जास्त ३० डिग्री वाकू शकतील. ४५ डिग्रीत वाकणे सर्वसामान्यांसाठी कठीणच.

पण याचं गुपित लपलं होतं मायकल जॅक्सनच्या शूजमध्ये. जेव्हा तुम्ही ही डान्स स्टेप करण्याचा प्रयत्न कराल तेव्हा तुम्हाला असेल लक्षात येईल की, पूर्ण भार पायांच्या मागच्या बाजूच्या मांसपेशींवर पडतो, पाठिच्या मणक्यावर काहीच भार नसतो. 

मायकल जॅक्सनच्या शूजच्या खालच्या बाजूस V आकाराचा एक तुकडा लावलेला असायचा. जो जमिनीवर लावलेल्या खिळ्यामध्ये फिक्स होत होता. याने मायकलला पुढे वाकण्यास मदत होत होती. सुरक्षेसाठी कमरेवर दोरीही बांधलेली असायची. मायकल जॅक्सनचे शूज हे Astronauts च्या शूजने प्रेरित होते. जे शून्य गुरुत्वाकर्षण असलेल्या जागांवरही त्यांना व्यवस्थित उभे राहण्यास मदत करत होते. 

भलेही असे करण्यात मायकल जॅक्सन याला शूजची मदत मिळत होती. पण तरीही केवळ त्या आधारे असे करणे सोपे नाही. यात त्याची मेहनत, सराव आणि कला याचाही तितकाच वाटा आहे. 

Web Title: Secret behind Michael Jackson's gravity-defying dance move

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.