रोज फ्रीजमधून गायब होत होता महिलेचा जेवणाचा डबा, चोराला मिळाली लक्षात राहील अशी शिक्षा!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2019 01:27 PM2019-03-12T13:27:01+5:302019-03-12T13:33:48+5:30

लंच टाइममध्ये जेव्हा तुम्ही जेवणाचा डबा घेण्यासाठी फ्रीजजवळ जाता आणि तुम्हाला कळतं की, तुमचा डबा कुणीतरी चोरी केलाय.

Pregnant woman whose lunch keeps getting stolen company fired the thief | रोज फ्रीजमधून गायब होत होता महिलेचा जेवणाचा डबा, चोराला मिळाली लक्षात राहील अशी शिक्षा!

रोज फ्रीजमधून गायब होत होता महिलेचा जेवणाचा डबा, चोराला मिळाली लक्षात राहील अशी शिक्षा!

Next

(Image Credit : Daily Burn)

विचार करा की, रोज तुम्ही ऑफिसला जेवणाचा डबा घेऊन जाता. लंच टाइममध्ये जेव्हा तुम्ही जेवणाचा डबा घेण्यासाठी फ्रीजजवळ जाता आणि तुम्हाला कळतं की, तुमचा डबा कुणीतरी चोरी केलाय. बरं एक दिवस नाही तर असं रोज होतं. अर्थातच तुमची तळपायाची आग मस्तकात गेल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही एचआरकडे तक्रार कराल. पण तरीही चोर वठणीवर येत नसेल तर....

हॉटेलमध्ये शेफ आहे महिलेचा पती

metro.co.uk ने दिलेल्या वृत्तानुसार, एका गर्भवती महिलेसोबत ही घटना घडली आहे. या महिलेचा पती शेफ आहे. पत्नी गर्भवती असल्याने पती प्रेमाने तिच्यासाठी पौष्टीक आहार देत होता. पण चोर दररोज हा डबा लंपास करत होता. त्यानंतर या महिलेने सुरूवातीला त्रासून लंच बॉक्समध्ये एक नोट सोडली. त्यावर तिने लिहिले की, 'जर तुम्हाला माझं लंच इतकं पसंत आहे तर माझा पती तुमच्यासाठीही लंच पॅक करून देईल. फक्त तुम्हाला त्यासाठी पैसे द्यावे लागतील'.

...चोराने काय केलं असावं?

महिलेने इतक्या सभ्य भाषेत एक नोट लिहिल्यावरही चोर काही वठणीवर आला नाही. चोर दररोज डबा चोरी करत होता. चोर तर मिळाला नाही पण ऑफिसमधील अनेकांनी महिलेची ऑफर घेतली. त्यांनी तिच्या पतीकडून लंच मागवणे सुरू केले. अडचण ही होती की, चोर काही सुधारला नाही. आता पाणी डोक्यावरून गेल्यावर हा विषय एचआर डिपार्टमेंटमध्ये गेला. एचआरने एक नोटीस जारी केली. जे कुणी हे करत असेल त्याला खडसावले. नोटीसमध्येही हे लिहिण्यात आलं की, महिला गर्भवती आहे तिला वेळेवर पौष्टीक आहार मिळणे गरजेचे आहे. पण चोर इतका निर्लज्ज होता की, या नोटीसला देखील त्याने पाणी घातलं नाही. 

यावर्षी होणार होतं प्रमोशन, गेली नोकरी

ऑफिस व्यवस्थापनाने चोराचा पत्ता लावण्यासाठी फ्रीजजवळ कॅमेरे लावले. आता चोर पकडला गेला होता. याच ऑफिसमध्ये काम करणारी एक महिला हे काम करत होती. ही महिला सीनिअर पोस्टवर होती. इतकंच नाही तर यावर्षी या महिलेचं प्रमोशन होणार होत. पण साधारण महिनाभरापासून एचआर आणि अॅडमिन या महिला चोरामुळे हैराण झाले होते. त्यामुळे या महिलेवर कडक कारवाई करत या महिलेला नोकरीवरून काढून टाकण्यात आले. 

गर्भवती महिला काय म्हणाली?

हा सगळा किस्सा 'रेडिट'वर सांगण्यात आला आहे. पीडित महिला म्हणाली की, 'मी रोज या चोरासाठी काहीना काही छोटी नोट लिहित होते. पण ती थांबली नाही. मी हरले होते. त्यामुळे मी एचआरशी संपर्क केला. पण तिला नोकरीवरून काढावे असं मला कधीच वाटलं नाही. मला केवळ माझा टिफिन बॉक्स सुरक्षित करायचा होता. आता मला वाईट वाटत आहे'.

Web Title: Pregnant woman whose lunch keeps getting stolen company fired the thief

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.