हा बोका बघू शकत नाही, पण त्याच्या डोळ्यांनीच सर्वांना केलंय घायाळ!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2019 01:25 PM2019-06-26T13:25:39+5:302019-06-26T13:27:27+5:30

सोशल मीडियात नेहमीच वेगवेगळ्या प्राण्यांचे फोटो शेअर केले जातात. त्यात मांजरीचा वरचा क्रमांक लागतो. आता हीच मांजर बघा ना...हिचं नाव आहे लुई.

Meet the louie blind cat which is famous in Instagram | हा बोका बघू शकत नाही, पण त्याच्या डोळ्यांनीच सर्वांना केलंय घायाळ!

हा बोका बघू शकत नाही, पण त्याच्या डोळ्यांनीच सर्वांना केलंय घायाळ!

googlenewsNext

सोशल मीडियात नेहमीच वेगवेगळ्या प्राण्यांचे फोटो शेअर केले जातात. त्यात मांजरीचा वरचा क्रमांक लागतो. आता हीच मांजर बघा ना...हिचं नाव आहे लुई. या मांजराला दिसत नाही. इंटरनेटवर या मांजरीचा मोठा फॅन वर्ग आहे. मुळात हा एका बोका आहे, पण त्याच्या क्यूटनेसचे लोक फॅन झाले आहेत. 

हा बोका इन्स्टाग्रामवर चांगला लोकप्रिय आहे. Louie Blind Cat नावाने त्याचं पेज असून त्यावर त्याला ३० हजार लोक फॉलो करतात. 
Kerry Denman ने या बोक्याला दत्तक घेतलं आहे. तिनेच या बोक्याची कहाणी इन्स्टाग्रामवर शेअर केली होती. तेव्हा ती व्हायरल झाली होती. तिने सांगितले होते की, या मांजरीचे आधीचे मालक याच्याकडे दुर्लक्ष करत होते. पण मला हा आवडला.

डोळे फार सुंदर असतात. पण लुईला तर दिसत नाही, पण त्याच्या डोळ्यांनी सर्वांनाच भुरळ घातली आहे. कॅरीने सांगितले की, लुईच्या डोळ्यांनी तिला फार आकर्षित केलं. 

लुई केवळ अंधच नाही तर त्याचे काही हेल्थ प्रॉब्लेमही आहेत. पण तरीही हा बोका नेहमी कूल राहतो. त्याच्या वागण्यातून कॅरीही खूपकाही शिकली आहे. इतरांनीही या बोक्याकडून शिकावं असं तिला वाटतं.

लुईला किडनीची समस्या आहे. तसेच त्याच्या पाठीच्या कण्यातही समस्या आहे. इतकेच नाही तर त्याचे पायही अनेकदा योग्यप्रकारे काम करत नाहीत.

कॅरीने लुईला २०१८ मध्ये दत्तक घेतलं होतं. कॅरी सुद्धा २०१८ मध्ये पार्टनरसोबत राहत होती. कॅरी आणि तिचा पार्टनर लुईला त्यांच्या घरातच ठेवतात आणि आपल्या बाळाप्रमाणे त्याला जपतात.

लुईचे सेंस फार वेगवान असल्याचे सांगितले जाते. तो बघू शकत नाही, पण हुंगू शकतो. त्याचे कान फार शार्प आहेत. 

Web Title: Meet the louie blind cat which is famous in Instagram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.