आपल्यापैकी प्रत्येकाचीच इच्छा असते की आपल्याकडेही लग्जरी कार असावी. पण प्रत्येकाचीच इच्छा पूर्ण होतेच असं नाही. फार कमी लोक असतात ज्यांच्याकडे स्वतः कमावलेल्या पैंशांनी विकत घेतलेली लग्जरी कार असते. आता सांगा की, कोणाकडे स्वतःच्या पैशांनी विकत घेतलेली BMW लग्जरी कार आहे, ते पण वयाच्या अवघ्य 12व्या वर्षी घेतलेली... हो वयाच्या 12व्या वर्षी कोणी स्वतःलाच अशी लग्जरी कार गिफ्ट करू शकतं का? अशक्य आहे ना? पण ही अशक्य गोष्ट एका 12 वर्षांच्या मुलीने शक्य करून दाखवली आहे. अनेक लोक वयाच्या 30 किंवा 40व्या वर्षी आपल्यासाठी गाडी खरेदी करण्याचा विचार करतात. पण या चिमुरडीने मात्र ही लग्जरी कार स्वतःच्या वाढदिवसाच्या दिवशी स्वतःलाच गिफ्ट केली आहे.

थायलँडमधील चँटाबुरी (Chanthaburi) येथे राहणाऱ्या या 12 वर्षांच्या मुलीचं नाव आहे नेतहनान (Natthanan). जी व्यावसायाने मेकअप आर्टिस्ट आहे, आणि तेही प्रोफेशनल. एवढचं नाही लंडन फॅशन वीक 2018 (London Fashion Week) मध्ये नेतहनानने एक प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट म्हणून पार्टिसिपेट केलं होतं. नेतहनान लंडन फॅशन वीकमध्ये मेकअप करणारी सर्वात कमी वयाची मेकअप आर्टिस्ट आहे. नेतहनान (Natthanan) च्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकवर 80 हजारांहून अधिक फॉलोवर्स आहेत. 

नेतहनान ने आपल्या 12व्या वाढदिवशी स्वतःला BMW Sedan गिफ्ट केली आहे. फेसबुकवर आपली पोस्ट शेअर करताना तिने लिहिले की, ''Happy birthday to me. i will be 12 years old this year. i am very grateful for everything I have so far and i'm thankful to my fans for supporting me. Thanks for all the well wishes, i wish everyone the same as well!'' (मला माझ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा. मी आज माझ्या वयाची 12 वर्ष पूर्ण केली. मी तुमचं प्रेम आणि सपोर्टसाठी आभारी आहे. तुमच्या शुभेच्छांसाठी धन्यवाद, माझ्याकडून सर्वांना खूप शुभेच्छा.)

सोशल मीडियावर या पोस्टला नेटकऱ्यांनी तुफान प्रतिसाद दिला आहे. कोणी म्हणतयं की त्यांनी आतापर्यंत लग्जरी काय साधी कारदेखील खरेदी केलेली नाही. तर कोणी म्हणतयं, जेव्हा ते 12 वर्षांचे होते तेव्हा बाहुल्यांशी खेळत होते. 

दरम्यान, नेतहनान ने वयाच्या अवघ्या तिसऱ्या वर्षीच यूट्यूबच्या मदतीने मेकअप करणं शिकली. आता हिची चर्चा पूर्ण जगभरात होत आहे. 

पाहूयात या 12 वर्षांच्या प्रोफेशनल मेकअप आर्टिस्टचे काही फोटो...


Web Title: 12 years old makeup artist natthanan buys bmw on her birthday
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.